मुंबईतून मुलीला फूस लावून पळवून नेलं; तरुणाला आठ महिन्यांनी नांदेडमधून अटक

अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेणाऱ्याला माटुंगा पोलिसांनी आठ महिन्यांनी अखेर अटक केली.

मुंबईतून मुलीला फूस लावून पळवून नेलं; तरुणाला आठ महिन्यांनी नांदेडमधून अटक

मुंबई : अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेणाऱ्याला माटुंगा पोलिसांनी आठ महिन्यांनी अखेर अटक केली (Matunga Minor Girl Kidnaping). मार्च महिन्यात या तरुणाने अल्पवयीन मुलीला पळवून नेलं होतं (Matunga Minor Girl Kidnaping).

मुंबईच्या माटुंगा मधल्या एका कॉलेजमध्ये शिक्षण घेत असलेली अल्पवयीन मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार 13 मार्च 2020 रोजी माटुंगा पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. मुलगी बदलापूर येथील रहिवासी होती आणि ती माटुंगा येथे कॉलेजला शिकायला येत असतं.

13 मार्चला सकाळी ती मुलगी घरातून निघाली, मात्र ती घरी परत आलीच नाही. यावर तिच्या वडिलांनी माटुंगा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला. पोलिसांच्या तपासात आदित्य नलावडे याने त्या अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याचे निष्पन्न झाले.

मात्र, त्यांचे मोबाईल बंद होते. कोणताही संपर्क त्यांच्याशी होत नव्हता. मात्र, पोलिसांनी विविध मार्गाने तपास करत आरोपीला नांदेड येथून अटक करुन मुलीची सुटका केली आहे. या प्रकरणात पुढील तपास सुरु आहे.

Matunga Minor Girl Kidnaping

संबंधित बातम्या :

मुंबईत मेट्रो क्रेनचा भीषण अपघात, क्रेन अंगावर पडून महिलेचा मृत्यू

पत्नीवर वाईट नजर, अश्लील संवाद, वर्ध्यात पतीकडून मित्राची दगडाने ठेचून हत्या

अकोल्यात कुख्यात आरोपीची दगडाने ठेचून हत्या, पूर्ववैमनस्यातून खून झाल्याची शक्यता

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *