पत्नीवर वाईट नजर, अश्लील संवाद, वर्ध्यात पतीकडून मित्राची दगडाने ठेचून हत्या

स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या 48 तासांच्या आत दोन जणांना बेड्या ठोकल्या आहेत

पत्नीवर वाईट नजर, अश्लील संवाद, वर्ध्यात पतीकडून मित्राची दगडाने ठेचून हत्या

वर्धा : पत्नीवर वाईट नजर ठेवणाऱ्या मित्राचा पतीने दुसऱ्या मित्राच्या मदतीने दगडाने (Friend Murdered Friend) ठेचून खून केला. वर्धा जिल्ह्यातील सोनेगाव शिवारात ही धकाकदायक घटना घडली. दोन दिवसांपूर्वी येथे अनोळखी मृतदेह सापडलेल्या प्रकरणाच्या तपासात ही बाब पुढे आली. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या 48 तासांच्या आत दोन जणांना बेड्या ठोकल्या आहेत (Friend Murdered Friend).

मृताचं नाव अविनाश फुलझेले असं आहे. तर सुधीर जवादे आणि निखील ढोबळे अशी अटक केलेल्यांची नावं आहेत. मृतक आणि मारेकरी हिंगणघाटचे रहिवासी असून ते मजुरी करतात.

दोन दिवसांपूर्वी हिंगणघाट रस्त्यालगत सोनेगाव (स्टेशन) शिवारातील शेतात अनोळखी इसमाचा दगडाने ठेचून विद्रुप केलेला मृतदेह आढळला होता. प्रकरणाच्या तपासादरम्यान हिंगणघाट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शास्त्री वॉर्डातील अविनाश फुलझेले हा बेपत्ता असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. सोनेगाव शिवारातील मृतदेह हा अविनाश फुलझेलेचा असल्याची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्र वेगानं फिरवली.

तपासादरम्यान सुधीर जवादे आणि निखील ढोबळे या दोघांनी अविनाशची दगडान ठेचून हत्या केल्याचं उघडकीस आलं. अविनाशन सुधीरच्या पत्नीवर वाईट नजर ठेवायचा, अश्लील संवाद साधायचा, या कारणातून ही हत्या घडल्याचं तपासात उघडकीस आलं. मद्य प्राशन केल्यानंतर सुधीरने निखीलच्या मदतीने अविनाशची हत्या केली.

पत्नीवर वाईट नजर ठेवल्यानं घडलेल्या या हत्याकांडाने परिसरात खळबळ उडाली आहे. विद्रूप चेहरा असलेल्या मृताची ओळख पटवत अवघ्या 48 तासांच्या आत पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.

Friend Murdered Friend

संबंधित बातम्या :

राकेश पाटील हत्या प्रकरण; बाळा नांदगावकरांनी घेतली राकेश यांच्या कुटुंबीयांची भेट; राज ठाकरेंकडूनही कुटुंबीयांचे फोनवरुन सांत्वन

सुनेच्या विवाह बाह्य संबंधाला वैतागून सासऱ्याचे टोकाचे पाऊल, सून आणि प्रियकराला ट्रॅक्टरखाली चिरडलं

विक्रोळीत भांडणातून सुरक्षा रक्षकाला बांबूने जबर मारहाण, उपचारादरम्यान मृत्यू

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *