AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

EPFO : नोकरदारांसाठी सर्वात मोठी बातमी! पीएफ व्याजदराबाबत मोठा निर्णय, वाचा अपडेट

EPFO Interest Rate : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) 2025-26 या आर्थिक वर्षासाठी व्याजदर जाहीर केले आहेत. आगामी याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

EPFO : नोकरदारांसाठी सर्वात मोठी बातमी! पीएफ व्याजदराबाबत मोठा निर्णय, वाचा अपडेट
EPFO Interest RateImage Credit source: Google
| Updated on: Mar 02, 2026 | 6:51 PM
Share

देशभरातील नोकरदारांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. दरमहा देशातील 7.5 कोटी नोकरदारांचा पीएफ कट होतो. अशातच आता कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) 2025-26 या आर्थिक वर्षासाठी व्याजदर जाहीर केले आहेत. संस्थेची सर्वोच्च संस्था सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीज (सीबीटी) ने यंदा पीएफ ठेवींवरील व्याज 8.25 टक्के ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याचा अर्थ आता तुमच्या ठेवींवरील परताव्यात कोणतीही कपात होणार नाही. याबाबत सविस्तर माहिती जाणून

ईपीएफओचे दर सलग दुसऱ्या वर्षासाठी स्थिर राहणार

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने मागील आर्थिक वर्ष 2024-25 साठी पीएफवरील व्याजदर 8.25 टक्के निश्चित केवा होता. त्याआधी 2023-24 मध्ये संस्थेने दर 8.15 वरून 8.25 टक्के पर्यंत किंचित वाढवला होता. आता संघटनेने 2024-25 प्रमाणेच 2025-26 वर्षासाठी 8.25 टक्के व्याजदर देण्याचा निर्णय घेतला आहे. तज्ञांनी असे म्हटले की, गुंतवणूकदारांना कोणत्याही जोखीमशिवाय स्थिर आणि सुरक्षित उत्पन्न देण्याच्या हेतूने हा निर्णय घेण्यात आला आहे. आता हा CBT प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी अर्थ मंत्रालयाकडे पाठवला जाणार आहे. त्यानंतर मंजुरी मिळाल्यानंतर, देशभरातील ग्राहकांच्या खात्यांमध्ये हा दर लागू केला जाणार आहे.

कधी आणि किती व्याज मिळाले?

गेल्या काही वर्षांच्या आकडेवारीनुसार, पीएफ व्याजदरात लक्षणीय चढ-उतार दिसून आले आहेत. 2021-22 मध्ये व्याजदर 8.10 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आला होता. जो 1977-78 नंतरच्या गेल्या चार दशकांमधील सर्वात कमी होता. त्यावेळी कर्मचाऱ्यांच्या चिंता स्वाभाविकपणे वाढल्या होत्या. याआधी 2015-16 मध्ये कर्मचाऱ्यांना 8.80 टक्क्यांपर्यंत उत्कृष्ट परतावा मिळाला होता. 2020-21 आणि 2019-20 मध्ये हा दर 8.50 टक्के होता.

पीएफ रिटर्न कसा ठरवला जातो?

पीएफ रिटर्न दर कसा ठरवला जातो असा प्रश्न अनेकांना पडलेला आहे. ईपीएफओ तुमचे पैसे बाँड, सरकारी सिक्युरिटीज आणि इक्विटीसह विविध ठिकाणी गुंतवते. संपूर्ण वर्षभरात या संपूर्ण गुंतवणूक मिळालेल्या परताव्याचे मूल्यमापन केले जाते आणि त्यांनतर आगामी वर्षासाठी नवीन व्याजदर ठरवला जातो. सध्याची बाजार परिस्थिती या प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावतात. मागील उत्पन्नाचे पूर्णपणे हिशोब केल्यानंतर सीबीटी नवीन दर निश्चित करते, त्यानंतर अर्थ मंत्रालय त्याला अंतिम मंजुरी देते.

एफडी पेक्षा जास्त व्याजदर

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने व्याजदर वाढवले नसले तरी 8.25 हा व्याजदर बाजारात उपलब्ध असलेल्या अनेक पारंपारिक बचत पर्यायांपेक्षा खूप चांगला आहे. सामान्य बँक एफडी च्या तुलनेत, पीएफकडून जास्त व्याजदर दिला जात आहे. त्यामुळे दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी पीएफ हा चांगला पर्याय आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...