AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

EPFO: कर्मचाऱ्यांसाठी आनंदवार्ता, PF खात्यावर आता मोठं व्याज, सरकारकडून लवकरच गिफ्ट

EPFO PF Interest: ईपीएफओच्या कोट्यवधी सदस्यांना जास्त व्याज मिळण्याची शक्यता आहे. ईपीएफओ जवळपास 30 कोटींहून अधिक सदस्यांच्या जवळपास 31 लाख रुपयांचा निधी व्यवस्थापन करतो. ईपीएफओने तांत्रिक बाजूवर कात टाकत अनेक सुविधा देण्याचं आश्वासन दिलं आहे.

EPFO: कर्मचाऱ्यांसाठी आनंदवार्ता, PF खात्यावर आता मोठं व्याज, सरकारकडून लवकरच गिफ्ट
ईपीएफओ व्याजImage Credit source: टीव्ही ९ नेटवर्क
| Updated on: Feb 20, 2026 | 2:36 PM
Share

EPFO PF Interest: ईपीएफओच्या कोट्यवधी सदस्यांसाठी आनंदवार्ता आहे. त्यांना ईपीएफ खात्यावर मोठं व्याज मिळण्याची शक्यता आहे. TIO च्या वृत्तानुसार, ईपीएफओ गुंतवणुकीविषयी चांगला पर्याय शोधत आहे. त्यासाठी एक उच्चस्तरीय समिती गठीत करण्यात येणार आहे. ही समिती ईपीएफओच्या गुंतवणुकीची समीक्षा करेल. ईपीएफओ जवळपास 30 कोटींहून अधिक सदस्यांच्या जवळपास 31 लाख रुपयांचा निधी व्यवस्थापन करतो. गेल्या बैठकीत याविषयीची चर्चा झाली होती. बैठकीत इक्विटी मार्केट आणि ईटीएफमध्ये गुंतवणूक करावी की नाही याविषयी चर्चा झाली होती. जर या गुंतवणुकीच्या माध्यमातून अधिक फायदा मिळाला तर व्याजासह अतिरिक्त रक्कम सदस्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे.

सरकारचे तज्ज्ञही समितीत

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यापूर्वीची जी बैठक झाली. त्यात सरकारी प्रतिनिधी सुद्धा सहभागी झाला होता. त्यानेच समिती स्थापन करण्याची शिफारस केली होती. या समितीत इतर सरकारी विभागाचे अधिकारी पण सहभागी करुन घेण्याचा प्रस्ताव आहे. ईपीएफओ आता एप्रिल 2015 च्या नोटिफिकेशननुसार गुंतवणूक करत आहे. यामध्ये 45 ते 65 टक्के गुंतवणूक ही सरकारी सुरक्षा ठेव आणि योजनांमध्ये गुंतवल्या जातो. तर 20 ते 25 टक्के निधी हा कॉर्पोरेट डेट पेपर्समध्ये गुंतवला जातो. केवळ 5% पर्यंतचा निधी हा कमी कालावधीच्या योजनांमध्ये गुंतवण्यात आला आहे .त्यातूनच इंडेक्स फंड्समध्ये 5 ते 15% फंड इक्विटीजमध्ये गुंतवणूक करण्यात आली आहे.

उत्पन्न वाढवण्याचे काम

अधिकार्‍यांनी माहिती दिली आहे की, 31 डिसेंबरच्या आकड्यांनुसार, ईपीएफओने एकूण निधीपैकी जवळपास 88% वाटा हा सरकारी बाँड्स आणि 10.6% टक्के रक्कम इक्विटिजमध्ये गुंतवली आहे. खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी पीएफ ही एक अनिवार्य सरकारी बचत योजना आहे. यामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांच्या मूळ पगारातील 12% वाटा देण्यात येतो. तर कंपनी पण इतकेच योगदान देते. कर्मचाऱ्याच्या योगदानातील 8.33% वाटा हा कर्मचारी पेन्शन योजनेत (EPS) जातो आणि ईपीएफ खात्यातील रक्कमेवर व्याज देण्यात येते.

आता ईपीएफओकडून एप्रिल महिन्यापासून युपीआयद्वारे पीएफ रक्कम काढण्याची सुविधा देत आहे. तर लवकरच एटीएम सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासोबतच फेस ऑथेटिंकेशनद्वारे आता उमंगमध्ये लॉग-इन करण्याची सुविधा मिळणार आहे. त्यामुळे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ईपीएफओ सदस्यांना सोयी-सुविधा उपलब्ध करून देणार आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...