AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Amazon आणि Flipkart वर इतक्या स्वस्तात वस्तू कशा मिळतात? अशी आहे इनसाईड स्टोरी

Flipkart आणि Amazon सेलवर मोठी सूट मिळूनही या कंपन्या कोट्यवधींचा नफा कामविल्याचा दावा करतात. हे त्यांच्यासाठी कसे शक्य आहे जाणून घेऊया.

Amazon आणि Flipkart वर इतक्या स्वस्तात वस्तू कशा मिळतात? अशी आहे इनसाईड स्टोरी
ऑनलाईन शॉपिंग Image Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Oct 28, 2022 | 3:04 PM
Share

मुंबई, ऑनलाइन विक्रीमुळे (Online Shopping) लोकांची खरेदी करण्याची पद्धत बदलली आहे. पूर्वी दुकानात जाऊन खरेदी करण्याला पहिली पसंती राहत असे. आता व्यवहारापासून ते खरेदीपर्यंत सर्व काही ऑनलाइन झाले आहे. मात्र आता ऑनलाईन खरेदीला प्राधान्य देण्यात येत आहे.  याचे मुख्य कारण म्हणजे ऑनलाइन मार्केट प्लेसवर मिळणारी सवलत आणि विकत घेतलेल्या वस्तूंची रिटर्न पॉलिसी आहे. आयफोनबद्दलच बोलायचे झाले तर, आयफोन 13 फ्लिपकार्ट-अमेझॉनवर 50 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत विकला गेला आहे. (Online Business Model)

कमी किमतीत विकू शकणारे उत्पादन या कंपन्या कुठून आणतात, हा प्रश्न आहे. एखादे उत्पादन कमी किमतीत विकून ते नफा कसा मिळवतात? या संपूर्ण प्रक्रियेची व्यावसायिक संकल्पना काय आहे ते जाणून घेऊया.

लहान व्यवसायांना प्रोत्साहन देऊन

MSMEs ला प्रोत्साहन देऊन, Amazon आणि Flipkart अधिक वस्तू स्वस्तात विकू शकतात. एमएसएमई म्हणजे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग. यामुळे ई-मार्केट प्लेसवर उत्पादने स्वस्तात मिळतात.

दोन्ही ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म स्वस्तात वस्तू विकण्यासाठी स्थानिक व्यवसाय मालक आणि इतर एमएसएमईशी संपर्क साधतात. अलीकडेच ॲमेझॉनने सांगितले होते की, कोट्यवधी ग्राहक एमएसएमई आणि स्थानिक व्यवसायांची उत्पादने पसंत करत आहेत.

कंपन्या स्वस्तात वस्तू का विकतात?

कोणत्याही कंपनीच्या वेबसाइटवर पाहिल्यास तेथील उत्पादनाची किंमत Amazon-Flipkart पेक्षा जास्त आहे. मग प्रश्न येतो की या कंपन्या आपली उत्पादने ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर स्वस्तात का विकतात? याचे कारण म्हणजे जास्तीत जास्त माल विकून  नफा मिळवणे. हा एका प्रकारे होलसेलचा व्यवसायासारखाच प्रकार आहे.

येथे ब्रँड त्यांचे मार्जिन कमी करून अधिक उत्पादने विकल्या जाते. दुसरे, त्यांना ॲमेझॉन किंवा फ्लिपकार्टवर ग्राहकांचा मोठा गट मिळतो. ब्रँड्सना प्रत्येक उत्पादनावर कमी नफा असू शकतो मात्र मोठ्या प्रमाणात विक्री झाल्याने त्यांचा एकूण नफा मोठ्या प्रमाणात मिळतो.

बँक ऑफरचे फायदे

क्रेडिट कार्ड वर खरेदी केल्यास इलेक्ट्रिक उपकरणाच्या खरेदीवर सवलत मिळते याशिवाय इएमआयचा पर्याय देखील उपलब्ध असतो. याचा फायदा कंपन्यांनाही मिळतो. वास्तविक, विक्रीमध्ये दर्शविलेली किंमत सर्व सवलतींनंतर असते. यामध्ये बँक ऑफर्सचाही समावेश आहे. यामुळे कंपन्या आपला माल स्वस्तात विकू शकतात.

Follow Us
My Home Construction Group ने 2026 मध्येही उमटवली यशाची मोहोर...
गोल्डनंतर आता प्लॅटिनम अवॉर्ड; My Home Construction Group ने 2026 मध्येही उमटवली यशाची मोहोर
महायुतीत पुन्हा नाराजीचा सूर? फडणवीसांच्या बैठकीला शिंदेंची अनुपस्थिती
Mahayuti : Eknath Shinde : महायुतीत पुन्हा नाराजीचा सूर? मुख्यमंत्री फडणवीसांच्या बैठकीला शिंदेंची अनुपस्थिती, नेमकं कारण काय?
राहुल गांधींच्या निवासस्थानी इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक....
Rahul Gandhi : राहुल गांधींच्या निवासस्थानी इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक; ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी पुढची रणनीती ठरणार?
भाजपने उमेदवारीचा शब्द दिला, पण... शेखर भोयर नेमकं काय म्हणाले?
Shekhar Bhoyar : भाजपने उमेदवारीचा शब्द दिला, पण... शेखर भोयर नेमकं काय म्हणाले?
शिवसेना पक्ष-चिन्हाची सुप्रीम कोर्टातील आजची सुनावणी पुढे ढकलली...
Shivsena : शिवसेना पक्ष-चिन्हाची सुप्रीम कोर्टातील आजची सुनावणी पुढे ढकलली; ठाकरे-शिंदे गटाचं लक्ष नव्या तारखेकडे
जळगावच्या सराफा बाजारात दर घसरले, आजचे भाव किती?
Gold-Silver Rate Update : सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी; जळगावच्या सराफा बाजारात दर घसरले, आजचे भाव किती?
सणासुदीत सर्वसामान्यांना महागाईचा झटका; ताटातील भाजीपासून डाळीपर्यंत..
Price Rate Hike : सणासुदीत सर्वसामान्यांना महागाईचा झटका; ताटातील भाजीपासून डाळीपर्यंत सर्वच महाग, काय आहेत नवे दर?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात नवीन अपडेट समोर; तपासाबाबत शिंदेंनी दिली.....
Eknath Shinde On Thane Purneker Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात नवीन अपडेट समोर; तपासाबाबत एकनाथ शिंदेंनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
ज्ञानेश कुमारांविरोधात पाटण्यात आंदोलनाचा भडका; गांधी मैदानात....
Bihar Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात पाटण्यात आंदोलनाचा भडका; गांधी मैदानात विद्यार्थी संघटनांची जोरदार घोषणाबाजी
बेलापूर वॉर्ड ऑफिसच्या पत्त्यावर तब्बल एवढी बोगस मतदारांची नावे....
Navi Mumbai : बेलापूर वॉर्ड ऑफिसच्या पत्त्यावर तब्बल एवढी बोगस मतदारांची नावे; गजानन काळेंचा खळबळजनक दावा