नोकरी गेली तरी नो टेन्शन! सरकारी तिजोरीतले हजारो रुपये येणार कामी; वाचा तुमचे पैसे कसे काढायचे?
कर्मचाऱ्यांना विड्रॉलची रक्कम काढताना कर्मचाऱ्याचे योगदान, कंपनीचे योगदान आणि दोन्हींवर मिळालेले व्याज अशा तिन्हींचा लाभ मिळणार आहे.

कर्मचारी भविष्य निधी संघटना अंतर्गत कामगारांसाठी अनेक नियम तयार केले आहे. खास करुन पीएफ काढण्यासंदर्भात काही विशेष नियम आहेत. यातील एक नियम नोकरी गेल्यानंतर पैसे काढण्या संदर्भात आहे. जर तुमची नोकरी केली किंवा तुम्ही नोकरी सोडली तर ७५ टक्के रक्कम काढण्यास तातडीने मंजूरी मिळते. अनेकदा पीएफचे पैसे काढण्यासंदर्भात कर्मचाऱ्यांना अनेक प्रकारच्या अडचणी असतात. परंतू आता ईपीएफओच्या वतीने अनेक नियमांत बदल केलेले आहेत. ज्यामुळे पीएफचे पैसे काढणे सोपे झालेले आहे.
जर तुम्हाला काही मेडिकल इमर्जन्सी, मुलांचे शिक्षण, लग्न वा घर दुरुस्तीसाठी पैसे काढायचे असतील. तर तुम्ही तुमच्या पीएफ अकाऊंटमधील आंशिक रक्कम काढू शकता. ईपीएफओ आपल्या सदस्यांना त्यांच्या पीएफचे पैसे देण्यासाठी सोपे आणि लवचिक नियम तयार केले आहेत.
श्रम आणि रोजगार मंत्रालयाने नवीन जारी केलेल्या नियमांनुसार आता नोकरपेशा कर्मचाऱ्यांना त्यांच्या इमर्जन्सीत आपल्या पीएफ बॅलन्समधून ७५ टक्के रक्कम सहजपणे काढण्याची मुभा दिलेली आहे.
केवळ तीन कॅटगरीत पीएफचे पैसे काढता येणार
EPFO ने पैसे काढण्याची कठीण प्रक्रिया एकदम सोपी केली आहे. आधी आंशिक रक्कम काढण्यासाठी १३ वेगवेगळ्या अटी आणि शर्ती ठेवल्या होत्या. आता त्यांना घटवून केवळ तीन कॅटगरी तयार केल्या आहेत.
इमर्जन्सी – यात गंभीर आजाराचा उपचार, मुलांचे उच्च शिक्षण आणि कुटुंबातील लग्न आदी खर्च
घराची गरज – घर खरेदी, नवीन घर बांधणे, घर दुरुस्ती वा होम लोन चुकवण्यासाठी पैसे काढता येतात
विशेष परिस्थिती – या सर्वात खास कॅटगरीअंतर्गत सदस्य विना कोणत्याही कारणाशिवाय देखील पीएफ बँलन्सची ७५ टक्के रक्कम काढू शकतो.
या नियमात देखील बदल
आधी वेगवेगळ्या कारणाने पीएफचे पैसे काढण्यासाठी ३ ते सात वर्षांच्या सेवेची अट होती. नव्या नियमानुसार बहुतांशी एडव्हान्स पैसे काढण्यासाठी किमान सदस्यत्व घटवून केवळ १२ महिने म्हणजे एक वर्षे केले आहे. याशिवाय आता विड्रॉलची रक्कमेत केवळ तुमचे ( कर्मचाऱ्याचे ) योगदान, कंपनीचे योगदान आणि दोन्हींवर मिळालेले व्याज अशा तिन्हींचा समावेश असेल. त्यामुळे सदस्याला पीएफ काढताना जास्त रक्कम मिळण्याची संधी मिळते.
नोकरी गेली तर किती पैसे काढू शकता ?
जर तुमची नोकरी गेली किंवा तुम्ही राजीनामा दिला, किंवा बेरोजगार झाला तर तुमच्या एकूण पीएफ बॅलन्सचा ७५ टक्के हिस्सा लागलीच काढू शकता. उर्वरित २५ टक्के बॅलन्स सलग १२ महिन्यापर्यंत बेरोजगार राहिले तर काढता येतील.
जुन्या नियमांनुसार २ महिने बेरोजगार राहिल्यानंतर संपूर्ण १०० टक्के पीएफ काढण्याची तरतूद होती. ज्यामुळे आता भविष्यात आर्थिक सुरक्षेच्या दृष्टीने बदल केला आहे.
