झोमॅटोमध्ये डिलिव्हरी पार्टनर कसे बनता येते, किती होते कमाई, कशी असते प्रोसिजर?
तरुण आजकाल झोमॅटो डिलिव्हरी पार्टनर बनून चांगली कमाई करताना दिसत आहेत. अखेर तरुणांना झोमॅटोत डिलिव्हरी पार्टनर बनून नेमकी किती कमाई होते. आणि यात अर्ज किंवा नोंदणी कशी करायची हे पाहूयात.

तरुणांना शिकता शिकता कमाई करायची असेल तर झोमॅटो डिलिव्हरी पार्टनर बनण्याचा चांगला पर्याय आहे. झोमॅटोत डिलिव्हरी पार्टनर होण्यासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करता येते. कंपनीच्या ऐप्सद्वारे अर्जाची प्रक्रिया पूर्ण करता येते. परंतू अर्ज करताना काही कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. अनेक तरुणांच्या मनात हा प्रश्न असतो की रजिस्ट्रेशनला किती फी आकारली जाते? काय अटी असतात, चला जाऊयात काय असते प्रोसीजर..
झोमॅटोत नोकरीसाठी अर्ज कसा करावा ?
झोमॅटोत डिलिव्हरी पार्टनर बनण्यासाठी सर्वात आधी कंपनीचे अधिकृत ऐप्स डाऊनलोड करावे लागते. यानंतर रजिस्ट्रेशनची प्रक्रिया पूर्ण करावी लागते.
गुगल प्ले स्टोरमध्ये जाऊन झोमॅटो डिलिव्हरी पार्टनर ऐप्स इंस्टॉल करा
ऐप्समध्ये मागितलेली व्यक्तिगत माहिती आणि मोबाईल नंबर नोंदवा
ओळखपत्र,बँक खाते आणि गाडीशी संबंधित सर्व माहिती भरावी
कंपनीच्या वतीने दिलेली माहिती आणि कागदपत्रांची तपासणी करावी लागते.
आवश्यक प्रक्रिया पूर्ण आणि अर्ज स्वीकारल्यानंतर डिलिव्हरीचे काम सुरु केली जाऊ शकते.
रजिस्ट्रेशनसाठी कोणती कागदपत्रे आहेत?
डिलीव्हरी पार्टनर बनण्यासाठी खालील कागदपत्रे मागितले जातात
पॅन कार्ड
ओळख आणि पत्त्याचे प्रमाणपत्र
बँक खात्याची माहिती
स्मार्टफोन
बाईक वा अन्य वाहनातून डिलिव्हरीसाठी वाहन परवाना
वाहनाचे रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट ( RC )
वाहनाचा विमा उतरवलेली कागदपत्रे
डिलीवरी पार्टनर बनण्यासाठी काय योग्यता ?
या कामासाठी स्मार्टफोन चालवणे आणि ऐप्सचा वापर करता आला पाहिजे. डिलिव्हरी गाडीवरुन करायची असेल तर ड्रायव्हींग लायसन्स आणि वाहनांशी संबंधित नियमांचे पालन करावे लागेल. वय आणि अन्य पात्रता अटींची माहिती रजिस्ट्रेशनच्या वेळी अधिकृत ऐप्समधून तपासा, अर्जानंतर कंपनीच्या वतीने कागदपत्रांची पडताळणी केली जाऊ शकते.
झोमॅटोतून दर महिना किती कमाई होते ?
झोमॅटोच्या डिलिव्हरी पार्टनर ऐप्सवर दर महिन्याला ३० हजाराच्या कमाईचा दावा केला जात आहे. मात्र, याचा अर्थ प्रत्येत डिलिव्हरी पार्टनरला इतकी कमाई होईलचे असे नाही. कमाई तुम्ही किती तास काम करता. डिलिव्हरी किती करता ? कोणत्या शहरात काम करता आणि त्यावेळी किती अतिरिक्त पैसे मिळतात. याशिवाय पेट्रोल, वाहनाची देखभाल दुरुस्ती आणि देखभाल, इलक्ट्रीक वाहन असेल तर चार्जिंगचा खर्च, त्यामुळे वेगवेगळी कमाई होऊ शकते.
अर्ज करण्यासाठी फि किती ?
डिलिव्हरी पार्टनरच्या रजिस्ट्रेशन दरम्यान ऑनबोर्डिंग, ट्रेनिंग वा डिलिव्हरी किटशी संबंधित काही शुल्क असू शकते. यामुळे रजिस्ट्रेशन करण्याआधी कंपनीच्या अधिकृत टीमकडून माहिती ध्यावी
