AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Petrol Diesel Price : स्वस्त क्रूड ऑईलला कोणाची लागली नजर, आयात घसरली, पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढणार?

Petrol Diesel Price : आंतरराष्ट्रीय बाजारात युरोपियन संघ आणि अमेरिकेने रशियाची कोंडी केल्यानंतर भारत हा चीन खालोखाल सर्वात मोठा आयातदार देश ठरला. भारताला रशिया स्वस्तात क्रूड ऑईलचा पुरवठा करत आहे. पण गेल्या महिन्यात आयातीत मोठी घसरण दिसून आली. त्याचा तुमच्या खिशावर तर परिणाम होणार नाही ना?

Petrol Diesel Price : स्वस्त क्रूड ऑईलला कोणाची लागली नजर, आयात घसरली, पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढणार?
| Updated on: Mar 02, 2023 | 8:42 AM
Share

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बाजारात युरोपियन संघ आणि अमेरिकेने रशियाची कोंडी केल्यानंतर भारत हा चीन खालोखाल सर्वात मोठा कच्चा तेलाचा (Crude Oil) आयातदार देश ठरला. गेल्या वर्षभरात भारताने रशियाकडून स्वस्तात कच्चे तेल आयात केले आहे. 0.01 टक्क्यांहून हा आकडा 35 टक्क्यांच्या घरात गेला आहे. भारताने प्रत्येक दिवशी रशियाकडून 1.6 दशलक्ष बॅरल कच्चे तेल आयात केले आहे. रशियानंतर इराक आणि सौदी अरब हे अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत. पण गेल्या महिन्यात आयातीत मोठी घसरण दिसून आली. त्याचा तुमच्या खिशावर तर परिणाम होणार नाही ना? पेट्रोल-डिझेलच्या किंमती (Petrol-Diesel Price) भडकणार तर नाही ना?

परंतु, गेल्या महिन्यात जानेवारीच्या तुलनेत 28 टक्के कमी कच्चे तेल आयात करण्यात आले. फेब्रुवारी 2023 मध्ये भारताने रशियाकडून जानेवारीच्या तुलनेत कमी कच्चे तेल आयात केले. 2021 मध्ये भारताने रशियाकडून 1 टक्क्यांहून कमी कच्चा तेलाची आयात केली होती. गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात तर काहीच तेल आयात करण्यात आले नव्हते. फेब्रुवारी 2022 नंतर कच्चा तेलाच्या आयातीत उसळी आली. त्याचा फटका इराक आणि सौदी अरब या देशांना बसला. गेल्या वर्षी त्यांचा एकूण वाटा 43 टक्क्यांहून 34 टक्क्यांवर आला. फेब्रुवारीत रशियाचे इंधन तेलाची आयात घसरली. एका महिन्यात प्रत्येक दिवशी केवळ 123,000 बॅरल तेल आयात करण्यात आले.

आज डब्ल्यूटीआय क्रूड ऑईलमध्ये (WTI Crude Oil) 0.04 टक्क्यांची वाढ झाली. किंमत 77.72 डॉलर प्रति बॅरलवर पोहचली. तर 1.03 टक्क्यांची वाढ होऊन 84.31 डॉलर प्रति बॅरलवर ब्रेंट क्रूड ऑईल (Brent Crude Oil) व्यापार करत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किंमतीत चढउतार होत असली तरी वर्षभरात मात्र या किंमती 15 टक्क्यांनी घसरल्या आहेत. 2006-07 मध्ये भारत 27 देशांकडून इंधन आयात करत होता. 2021-22 मध्ये ही संख्या 39 इतकी झाली आहे.

भारतीय तेल विपणन कंपन्या दररोज सकाळी सहा वाजता इंधनाचे नवीन दर जाहीर करण्यात येतात. त्याआधारे देशात विविध भागात राज्याचा कर, स्थानिक स्वराज्य संस्थांचा कर, पंपधारकांचे कमिशन यामुळे किंमतीत फरक दिसतो. त्याआधारे देशातील विविध शहरातील इंधनाच्या दरात तफावत दिसते.

पेट्रोल-डिझेलचे रोजचे दर तुम्ही एसएमएसद्वारे जाणून घेऊ शकता. इंडियन ऑईलच्या ग्राहकांनी RSP असे लिहून 9224992249 या क्रमांक पाठवल्यास त्याला आजचे नवीन दर कळतील. त्यासाठी पेट्रोल पंपावर जायची गरज नाही. या क्रमांकावर तुम्हाला तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचे भाव माहिती होतील.

तर बीपीसीएलच्या ग्राहकांनाही घरबसल्या त्याच्या मोबाईलवर भाव कळू शकतात. त्याने मोबाईल मॅसेजमध्ये RSP लिहून हा मॅसेज 9223112222 या क्रमांकावर पाठवावा. त्यानंतर कंपनी त्याला एसएमएसद्वारे (SMS) आजचे अपडेट दर कळवेल. एचपीसीएल ग्राहकांना HPPrice असे लिहून 9222201122 या क्रमांकावर एसएमएस करावा लागेल.

Follow Us
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले भर...
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले, भर चौकात...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर टार्गेटवर? धमकीच्या मेसेजने खळबळ
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून...
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून वकिलांना रोखलं, बाचाबाची...
अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
Chhagan Bhujbal : अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय..
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय हालचालींना वेग
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी,
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी, आता...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोरा...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोराची 12 तसांसनंतर सुटका
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण..
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण आमदारांना संधी
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात..
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात जाऊन उघड करणार नवी माहिती!
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट