AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

India GDP Growth: भारताची GDP मोजण्याची पद्धत अगदी योग्य! विकासदराच्या मोजणीवर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना IMF चे सडेतोड उत्तर

India GDP Calculation: भारताची जीडीपी मोजण्याची पद्धत अगदी योग्य असल्याचा दावा आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संघटनेने केली आहे. आयएमएफने विकासदराच्या मोजणीवर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिले आहे.

India GDP Growth: भारताची GDP मोजण्याची पद्धत अगदी योग्य! विकासदराच्या मोजणीवर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना IMF चे सडेतोड उत्तर
IMF च्या जागतिक अहवालानंतर आता जीडीपी गणनेवरही शिक्कामोर्तब
| Updated on: Oct 16, 2026 | 11:32 AM
Share

India GDP Calculation: भारत हा जगाचे ग्रोथ इंजिन ठरला आहे. भारताच्या अंदाजित विकास दराने जगाला थक्क केले आहे. विकसीत अर्थव्यवस्थांच्या तोंडाला फेस आलेला असताना भारतीय अर्थव्यवस्था सुसाट धावत आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संघटनेने (IMF) या वर्षासाठी जीडीपी 7 टक्के असण्याचा अंदाज वर्तवला आहे. तर त्याचवेळी विरोधकांनी आणि काही अर्थतज्ज्ञांनी भारताचा विकास दर मोजण्याची पद्धत बदलल्याचा आणि प्रत्यक्षात विकास दर कमी असल्याचा दावा केला होता. हा दावा IMF ने खोडून काढला आहे. भारताचा जीडीपी गणनेची पद्धत योग्य असल्याचे शिक्कामोर्तब या आंतरराष्ट्रीय संस्थेने केले आहे. आयएमएफच्या आशिया-प्रशांत विभागाचे संचालक कृष्णा श्रीनिवासन यांनी या नवीन पद्धतीचे स्वागत ही केले आहे.

सांख्यिकी विभागाच्या सुचनेनुसारच जीडीपी

IMF ने GDP गणना आणि त्याचे प्रमाण योग्य असल्याचे म्हटले आहे. सांख्यिकी विभागाच्या सूचना, प्रथा आणि पद्धतीप्रमाणेच तसेच जागतिक संस्थांच्या सल्ल्यानुसारच ही गणना होत असल्याचे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने स्पष्ट केले आहे. आयएमएफच्या आशिया-प्रशांत विभागाचे संचालक कृष्णा श्रीनिवासन यांनी या नवीन पद्धतीचे स्वागत ही केले आहे. तर नाणेनिधीच्या सांख्यिकी विभागाच्या कसोटीवर ही गणना योग्य ठरत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यामुळे विरोधक आणि काही अर्थतज्ज्ञ गणनेवर जो आक्षेप घेत होते. त्यांना सडेतोड उत्तर मिळाल्याचे मानले जात आहे.

सरकारच्या कामगिरीची कौतुक

श्रीनिवासन यांनी GDP गणना प्रक्रियेतील नवीन बदलाबाबत सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे. सांख्यिकी विभागाच्या पद्धतीत बदल हा महत्त्वाचा घटक आहे. त्याचवेळी त्यांनी जीडीपी योग्य पद्धतीने काढण्यात येत असल्याचे नमूद केले. त्यांनी सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या (MOSPI) कामाचे कौतुक केले.

भारताचा विकास दर 7 टक्के

IMF च्या ताज्या अहवाल 2026 साठी भारताचा विकासाचा अंदाज 6.4 टक्क्यांहून थेट वाढून 7 टक्के करण्यात आला. जागितक बँकेपासून ते ओईसीडी (OECD) सारख्या मोठ्या संस्थांनी भारतीय अर्थव्यवस्थेवर विश्वास दाखवला आहे. जगातील प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये भारताचे आर्थिक वर्चस्व दिसून आले चीनचा अंदाजित विकास दर 4.5 टक्के असेल. म्हणजे आर्थिक वाढीत भारताने चीनलाही मागे टाकले आहे. विकसीत राष्ट्रांनाही हा विकास दर साध्य करता आलेला नाही. सर्वच देश महागाई, युद्ध आणि भू-राजकीय तणावाचा सामना करत आहेत. या अर्थव्यवस्थांसमोर मंदीचे आव्हान आहे. अशावेळी भारतीय मजबूत अर्थव्यवस्था आणि विकासदरामुळे जगात भारताची आर्थिक ताकद वाढल्याचे समोर येत आहे.

Follow Us
धाराशिवमध्ये FDA चा दणका; 15 दिवसांत सहा हॉटेल्सचे परवाने निलंबित
Dharashiv FDA Action : धाराशिवमध्ये FDA चा दणका; 15 दिवसांत सहा हॉटेल्सचे परवाने निलंबित
महायुतीत तिन्ही पक्षांचा एकमेकांना चेकमेटचा प्रयत्न; पडद्यामागे काय?
Mahayuti : महायुतीत तिन्ही पक्षांचा एकमेकांना चेकमेटचा प्रयत्न; पडद्यामागे काय घडतंय?
10 कोटींची सुपारी फक्त कागदोपत्रीच नष्ट; त्या नेत्याने दिली माहिती....
FDA : 10 कोटींची सुपारी फक्त कागदोपत्रीच नष्ट; त्या नेत्याने दिली माहिती, FDA च्या पाच अधिकाऱ्यांवर थेट...
आज मुंबईच्या आझाद मैदानात सीजेपीचं लहरा दो तिरंगा आंदोलन...
CJP Protest : आज मुंबईच्या आझाद मैदानात सीजेपीचं लहरा दो तिरंगा आंदोलन...
डोंगराळे प्रकरणी आरोपीला फाशी की जन्मठेप? आज होणार निर्णय...
Malegaon Case | डोंगराळे प्रकरणी आरोपीला फाशी की जन्मठेप? आज होणार निर्णय...
फडणवीस बोलले, महायुती म्हणून एकत्र लढू; शिंदेंचा मात्र अपक्षाला खुला..
Mahayuti : फडणवीस बोलले, महायुती म्हणून एकत्र लढू; शिंदेंचा मात्र अपक्षाला खुला पाठिंबा, नेमकं प्रकरण काय?
दिल्लीत आज सीजेपीची लहरा दो तिरंगा रॅली; रॅलीकडे....
CJP Tiranga Rally : दिल्लीत आज सीजेपीची लहरा दो तिरंगा रॅली; रॅलीकडे देशाचं लक्ष
ज्ञानेश कुमार मोदींना काय देतात? अभिजीत दिपकेंचा थेट सवाल
Abhijeet Dipke : ज्ञानेश कुमार मोदींना काय देतात? अभिजीत दिपकेंचा थेट सवाल, दिल्लीचं रूपांतर...
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिर...
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिरांबाबतही नवे नियम
शेअर बाजारात जिओचा धमाका! 30 हजार कोटींचा IPO आणण्याची तयारी,
शेअर बाजारात जिओचा धमाका! 30 हजार कोटींचा IPO आणण्याची तयारी, नेमकं टार्गेट किती?