10 हजाराचे करा 14 लाख! एफडीवर 6 महिन्यात मिळेल 5 पटीने जास्त पैसा; वाचा काय आहे योजना?

एसआरई वेल्थचे (SRE Wealth) सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तन शाह यांनी म्युच्युअल फंडाचा (Mutual Funds) मोठा फायदा कसा होतो यासंबंधी काही महत्त्वाची माहिती दिली आहे.

10 हजाराचे करा 14 लाख! एफडीवर 6 महिन्यात मिळेल 5 पटीने जास्त पैसा; वाचा काय आहे योजना?

मुंबई : सध्या मार्केटमध्ये अनेक गुंतवणुकीचे पर्याय आहेत. अशात एका वर्षाच्या मुदत ठेवींवर अवघ्या 5-6 टक्के परतावा मिळतो. म्हणूनच म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला जातो. एसआरई वेल्थचे (SRE Wealth) सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तन शाह यांनी म्युच्युअल फंडाचा (Mutual Funds) मोठा फायदा कसा होतो यासंबंधी काही महत्त्वाची माहिती दिली आहे. (invest in mutual funds make money with principal emerging bluechip fund rs 10000 get 14 lacs rupees)

10 हजाराचे झाले 14 लाख रुपये

म्युच्युअल फंडच्या Principal Emerging Bluechip Fund योजनेमध्ये उत्तम परतावा दिला जात आहे. यामध्ये 21 ऑगस्ट 2020 रोजी 10 हजार रुपयांची गुंतवणूक केली होती त्यांना आता 138383.80 रुपये इतकी रक्कम मिळणार आहे. म्हणजेच त्यांना 31 टक्के परतावा मिळाला आहे.

त्याचप्रमाणे 2 वर्षात ही रक्कम 14796.40 रुपयांवर जाणार आहे. आणि 5 वर्षात यावर 140.67% म्हणजेच 10 हजार रुपयांची गुंतवणूक होईल 24066.70 रुपये होईल. या फंडाची सुरुवात 12 नोव्हेंबर 2008 मध्ये झाली होती. तेव्हापासून आतापर्यंत 1320 टक्के परतावा देण्यात आला आहे. म्हणजेच 13 वर्षात 10 हजार रुपयांची रक्कम 14 लाखांवर गेली आहे.

Principal Emerging Bluechip Fund मध्ये करा गुंतवणूक

तज्ज्ञांच्या मते, यामध्ये उत्तम परतावा मिळतो. त्याच्या पोर्टफोलिओमध्ये HDFC बँक, ICICI बँक, इन्फोसिस, रिलायन्ससारख्या अव्वल कामगिरी करणाऱ्या कंपन्यांचे शेअर्स आहेत. इतकंच नाही तर कीर्तन शाह यांच्या मते, जर कोणी म्युच्युअल फंडात गुंतवणूक केली तर यामुळे तुम्हाला खूप नफा होईल.

याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे बाजार घसरताना अधिक युनिट्स आढळतात आणि बाजारातील वाढीवर या युनिटवर चांगली किंमत मिळते. दुसरीकडे, जर तुम्ही या रिटर्नची साधी फिक्स्ड डिपॉझिटशी तुलना केली तर यामध्ये तेवढंच व्याज मिळतं. (invest in mutual funds make money with principal emerging bluechip fund rs 10000 get 14 lacs rupees)

संबंधित बातम्या – 

FASTag कडून टोलवर कट झाले जास्त पैसे? नो टेन्शन, आता Paytm देणार रिफंड

1 लाखात सुरू करा बिझनेस; महिन्याला 2 लाख कमावा, एक नंबर आहे Business Idea

10 हजार गुंतवणूक वर्षाला मिळवा 16 लाख, पोस्ट ऑफिसची सगळ्यात चांगली योजना

(invest in mutual funds make money with principal emerging bluechip fund rs 10000 get 14 lacs rupees)

Published On - 12:17 pm, Wed, 24 February 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI