1 लाखात सुरू करा बिझनेस; महिन्याला 2 लाख कमावा, एक नंबर आहे Business Idea

1 लाखात सुरू करा बिझनेस; महिन्याला 2 लाख कमावा, एक नंबर आहे Business Idea

कोरोनाच्या संकटात एकतर लोकांनी मोठी शहरं सोडली आणि गावी संसार थाटला तर अनेकांनी नोकरी सोडून आता व्यवसाय करण्यास सुरुवात केली आहे. म्हणून आम्ही तुमच्यासाठी एक उत्तम बिझनेस आयडिया घेऊन आलो आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By:

Feb 24, 2021 | 7:47 AM

मुंबई : कोरोनाच्या कठीण काळानंतर अनेकांवर मोठं आर्थिक संकट आलं आहे. यामुळे एकतर लोकांनी मोठी शहरं सोडली आणि गावी संसार थाटला तर अनेकांनी नोकरी सोडून आता व्यवसाय करण्यास सुरुवात केली आहे. म्हणून आम्ही तुमच्यासाठी एक उत्तम बिझनेस आयडिया घेऊन आलो आहे. आम्ही केळी व्यवसायाबद्दल बोलत आहोते. (Business Idea banana farming profit start business with rs 105000 input cost and profit rs 2 lakh know cultivation method)

केळी आपल्या आरोग्यासाठी उत्तम फळ आहे. यामुळे याची मागणीही तितकीच आहे. अशात केळ्यांची शेती करून तुम्ही आर्थिक नफाही मिळवू शकता. केळीबद्दल बोलायचं झालं तर त्याची योग्य प्रकारे लागवड केली गेली तर नफा कित्येक पटींनी वाढतो. योग्य लागवडीसाठी केळीची शेती करण्याचं पूर्ण ज्ञान महत्त्वाचं आहे. या संदर्भात, एक एकरामध्ये 1250 झाडे सहज आणि योग्यरित्या वाढतात.

जर वनस्पतींमधील अंतर योग्य असेल तर फळं देखील योग्य आणि एकसमान येतील. आता खर्चाविषयी बोलायचं झालं तर दीड ते दोन लाख रुपये प्रति एकरपर्यंत येतो. जर यामध्ये एक एकराचं उत्पादन 3 ते साडेतीन लाख रुपयांपर्यंत विकलं जातं. म्हणजेच वर्षातून दीड ते दोन लाख रुपयांचा नफा होऊ शकतो.

कशी कराल शेती?

केळी लावण्यासाठी खड्डे किंवा नाल्यांमध्ये झाडं लावा. यासाठी आधी एक किंवा दोन नांगरणी केली जाते. यानंतर, 2 किंवा 3 मीटरच्या अंतरावर 50 सेमी लांब, रुंद आणि खोल खड्डे केले जातात. यानंतर हे खड्डे 15 दिवस उन्हात उघडे ठेवतात. यानंतर या खड्ड्यांमध्ये 10 किलो शेणखत, 250 ग्रॅम नीम केक आणि 20 ग्रॅम कार्बोफुरॉन टाकलं जातं. नंतर यामध्ये केळीची झाडं लावली जातात.

कसं कराल सिंचन ?

केळीच्या चांगल्या उत्पादनासाठी 70-75 पाटबंधारे लागतात. हिवाळ्यात 7-8 दिवसांमध्ये आणि उन्हाळ्यात 4-5 दिवसांमध्ये सिंचन करावं. झाडांच्या मुळांना होणारं नुकसान टाळण्यासाठी ठिबक सिंचन चांगलं आहे. यामुळे पाण्याची बचत होते आणि वनस्पतींनाही चांगली वाढ मिळते. यामुळे मार्केटमध्येही त्याला चांगाल भाव मिळेल.

(टीप : केळीची शेती करण्यासाठी नुकसान होऊ नये म्हणून कृषी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या) (Business Idea banana farming profit start business with rs 105000 input cost and profit rs 2 lakh know cultivation method)

संबंधित बातम्या –

स्टॅम्प पेपरच्या व्यवसायात बक्कळ पैसा कमावण्याची संधी, कमी पैशांमध्ये मिळेल जास्त नफा

Petrol Diesel Price Today: पेट्रोल-डिझेल आज स्वस्त की महागलं, वाचा तुमच्या शहरातील ताजे दर

10 हजार गुंतवणूक वर्षाला मिळवा 16 लाख, पोस्ट ऑफिसची सगळ्यात चांगली योजना

Post Office ची धमाकेदार योजना, 1 लाखाच्या गुंतवणुकीवर महिन्याला मिळेल उत्तम परतावा

(Business Idea banana farming profit start business with rs 105000 input cost and profit rs 2 lakh know cultivation method)

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें