AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ, जाणून घ्या तुमच्या शहरातील इंधनाचे दर

दिल्लीत 1 लिटर पेट्रोलचा भाव 82.66 रुपये, तर एक लिटर डिझेलचा भाव 72.84 रुपये प्रतिलिटर झाला आहे.

सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ, जाणून घ्या तुमच्या शहरातील इंधनाचे दर
अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Dec 03, 2020 | 8:57 AM
Share

नवी दिल्ली : पेट्रोल आणि डिझेलच्या (Petrol-Diesel) किंमती गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढत आहेत. इंधनाच्या वाढत्या दरानं सर्वसामान्यांची चिंता वाढवली आहे. बुधवारपासून सरकारी तेल कंपनी असलेली इंडियन ऑईल (IOC), बीपीसीएल (BPCL) आणि एचपीसीएल (HPCL) ने बुधवारी पेट्रोलचे भाव 15 पैसे प्रतिलिटर आणि डिझेलचे भाव 23 पैसे प्रतिलिटरनं वाढवले होते. गुरुवारी त्यामध्ये आणखी वाढ झाली आहे. गुरुवारी पेट्रोलची किंमत 17 पैशांनी तर डिझेची किंमत 19 पैशांनी वाढली आहे. आता राजधानी दिल्लीत 1 लिटर पेट्रोलचा भाव 82.66 रुपये झाला आहे. तर एक लिटर डिझेलचा भाव 72.84 रुपये झाला आहे. (Latest Petrol Diesel Price : Petrol Price Up By 17 Paise and Diesel prices By 19 Paise, Check Rates Here)

14 दिवसांत मोठ्या प्रमाणात तेलाच्या किमतीत वाढ

20 नोव्हेंबरनंतर वाहनांच्या इंधनाच्या किमतीत 10 टक्के वाढ झाली आहे. दोन आठवड्यांच्या दिलाशानंतर पेट्रोलियम कंपन्यांनी इंधनाचे दर पुन्हा एकदा वाढवले आहेत. 14 दिवसांत पेट्रोल 1.63 रुपये प्रति लीटर महागले आहे. त्याचदरम्यान डिझेलचे दर 2.30 रुपये प्रतिलिटरने वाढले आहेत. 20 नोव्हेंबरपासून इंधनाच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. तत्पूर्वी 22 सप्टेंबरपर्यंत पेट्रोलचे दर स्थिर होते. तर डिझेलच्या किमतीत 2 ऑक्टोबरपासन कोणताही बदल झालेला नव्हता.

चार शहरांतील पेट्रोल आणि डिझेलचे भाव

इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार, दिल्ली, कोलकाता, मुंबई आणि चेन्नईमध्ये पेट्रोलच्या किमती वाढून क्रमश: 82.66 रुपये, 84.18 रुपये, 89.33 रुपये आणि 85.59 रुपये प्रतिलिटर वाढले आहेत. चार शहरांतील डिझेलच्या किमती वाढून क्रमश: 72.84 रुपये, 76.61 रुपये, 79.42 रुपये आणि 78.24 रुपये प्रतिलिटर झाल्या आहेत.

दररोज 6 वाजता बदलतात किमती

दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत बदल होत असतो. सकाळी सहा वाजता नवे दर लागू केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती एक्साइज ड्युटी, डिलर कमिशन आणि अन्य गोष्टी जोडल्यानंतर त्याचा भाव जवळपास दुप्पट होतो.

असे तपासा पेट्रोल आणि डिझेलचे भाव

आपण एसएमएसच्या माध्यमातून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती जाणून घेऊ शकता. पेट्रोल-डिझेलच्या किमती दररोज सकाळी 6 वाजता बदलतात. इंडियन ऑइलच्या वेबासाइटनुसार, RSP बरोबर आपल्या शहराचा कोड टाइप करून 9224992249 नंबरवर SMS पाठवावा लागणार आहे. या शहराचा कोड वेगवेगळा असतो. बीपीसीएल ग्राहक RSP लिहून 9223112222 आणि एचपीसीएल ग्राहक HPPrice लिहून 9222201122 या नंबरवर मेसेज पाठवून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती जाणून घेऊ शकतात.

संबंधित बातम्या

मोठा धक्का! पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सलग पाचव्या दिवशी वाढ, जाणून घ्या…

नव्या अवतारात बजाजची ‘कडक CT100’ लाँच, 1 लीटर पेट्रोलमध्ये 90 किलोमीटर धावणार

(Latest Petrol Diesel Price : Petrol Price Up By 17 Paise and Diesel prices By 19 Paise, Check Rates Here)

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...