AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इंधन संकटाच्या काळात LPG विक्रीत मोठी घट, पेट्रोल-डिझेलबाबत मोठी अपडेट

Fuel Crisis : मे 2026 मध्ये LPG विक्रीत तब्बल 24 टक्क्यांची मोठी घसरण नोंदवली गेली आहे, तर दुसरीकडे पेट्रोल आणि डिझेलच्या मागणीत वाढ झाली आहे.

इंधन संकटाच्या काळात LPG विक्रीत मोठी घट, पेट्रोल-डिझेलबाबत मोठी अपडेट
LPG Purchase Drop Fuel demand increaseImage Credit source: Google
| Updated on: Jun 03, 2026 | 10:02 PM
Share

इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्षामुळे देशात इंधन संकट निर्माण झाले आहे. अनेक ठिकाणी LPG, पेट्रोल डिझेलचा तुटवडा जाणवत आहे. या संकटाच्या काळात मे 2026 मध्ये LPG विक्रीत तब्बल 24 टक्क्यांची मोठी घसरण नोंदवली गेली आहे, तर दुसरीकडे पेट्रोल आणि डिझेलच्या मागणीत वाढ झाली आहे. पेट्रोलपेक्षा डिझेलची विक्री अधिक झाली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

पेट्रोल डिझेलच्या विक्रीत वाढ

सरकारी तेल कंपन्या इंडियन ऑइल (IOC), भारत पेट्रोलियम (BPCL) आणि हिंदुस्तान पेट्रोलियम (HPCL) यांच्या आकडेवारीनुसार, मे महिन्यात पेट्रोल विक्रीत वार्षिक आधारावर 4.8 टक्क्यांची वाढ झाली, तर डिझेल विक्रीत 6.4 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे. याशिवाय ATF म्हणजेच विमानांमध्ये वापरल्या जाणाऱ्या इंधनाच्या विक्रीतही 1.8 टक्क्यांची वाढ झाली आहे.

LPG च्या विक्रीत घट

ET मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, या तीन सरकारी कंपन्यांचा देशातील जवळपास 90 टक्के पेट्रोल, डिझेल आणि विमान इंधन बाजारावर ताबा आहे, तर देशांतर्गत LPG बाजारात त्यांची जवळपास संपूर्ण हिस्सेदारी आहे. मात्र सर्वाधिक धक्कादायक बाब म्हणजे LPG विक्रीत 24 टक्क्यांची घट झाली आहे. एप्रिल 2026 मध्येही LPG विक्रीत सुमारे 16 टक्क्यांची घट झाली होती, पण मे महिन्यात ही घसरण आणखी वाढली. तज्ज्ञांच्या मते, यामागे अनेक कारणे असू शकतात. काही क्षेत्रांमध्ये ग्राहकांनी सिलिंडरच्या किंमती आणि वापर लक्षात घेऊन खरेदी कमी केली असावी. तसेच मागील वर्षाच्या तुलनेत मागणीचा आधार जास्त असल्याने घसरणीची टक्केवारी अधिक मोठी दिसत आहे.

तेलाच्या किंमती वाढूनही पेट्रोल-डिझेलची विक्री का वाढली?

गेल्या काही दिवसांमध्ये इंधनाच्या किमतीत वाढ झालेली आहे. असं असलं तरी पेट्रोल आणि डिझेल विक्रीत वाढ नोंदवली गेली आहे. उन्हाळ्याच्या काळात वाहतूक आणि लॉजिस्टिक क्षेत्रात पेट्रोलचा वापर वाढला आहे. दुचाकी वाहनांमध्येही पेट्रोलचा वापर अधिक झाला आहे. डिझेलच्या मागणीत 6.4 टक्क्यांची वाढ झाल्याने बाजारातील तज्ज्ञही आश्चर्यचकित झाले आहेत. भारतात साधारणपणे डिझेलचा वापर पेट्रोलपेक्षा अडीच पट अधिक असतो, त्यामुळे त्यात एवढी मोठी वाढ होणे असामान्य मानले जात आहे.

डिझेल विक्री वाढण्यामागे खासगी इंधन विक्रेत्यांकडून ग्राहकांचा सरकारी पेट्रोल पंपांकडे वाढलेला कल हेही एक मोठे कारण मानले जात आहे. अनेक भागांत घाऊक डिझेल ग्राहकांनी कमी किमतीचा फायदा घेण्यासाठी सरकारी रिटेल पंपांवरून खरेदी केली आहे. तसेच पेट्रोलचे दर आणखी वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन पेट्रोलचीही जास्त खरेदी झाली आहे.

Follow Us
डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट
Aishwarya Jadhav Dancer | डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट...
दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
Dancer Radha Patil News | पुण्यात दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं...
Baramati | बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं स्वतंत्र पॅनल; सोमेश्वर कारखान्याची निवडणूक रंगणार
विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
Vishakha Raut | विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला इशारा
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला कडक इशारा
20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर!
Nanded | 20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर! नांदेडमध्ये हजारो एकर पीक धोक्यात
तू तुझं तुझं बघ ना! सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर
Ambadas Danve On Gunaratna Sadavarte | तू तुझं तुझं बघ ना! बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोवरून सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर, पुढे म्हणाले...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी... त्या बड्या नेत्याने...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी अनेक जण आमच्याशी संपर्कात, त्या बड्या नेत्याने सगळंच सांगितलं
अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल...
Manoj Jarange | अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल, पुढे म्हणाले...
सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! सोयाबीन माना टाकू लागलं
Amravati | सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! अमरावतीत सोयाबीन माना टाकू लागलं; शेतकरी संकटात