RBI ची मोठी कारवाई, एका झटक्यात 63 फायनान्स कंपन्यांचे लायसन्स रद्द, तुमचे तर लोन नाही ना ?
RBI ने 16 नोव्हेंबर रोजी जारी नोटिफिकेशनमध्ये 49 NBFC कंपन्यांचे लायसन्स रद्द झाल्याची माहिती दिली आहे. तर 13 NBFC आणि एका हाऊसिंग फायनान्स कंपनीने स्वत: आपले रजिस्ट्रेशन परत केले आहे.

भारतीय रिझर्व्ह बँकेने एकाच झटक्यात 63 फायनान्स कंपन्यांवर कारवाई केली आहे. 16 नोव्हेंबरच्या परिपत्रकानुसार RBI ने 49 NBFC म्हणजे नॉन-बँकिंग फायनान्स कंपन्यांचे लायसन्स रद्द केले आहे. हे आदेश एक ते 29 ऑक्टोबर दरम्यान दिले होते. याशिवाय 13 NBFC आणि एका हाऊसिंग फायनान्स कंपनीने स्वत:च आपले लायसन्स मागे घेतले आहे.
ही कारवाई RBI अधिनियम, 1934 अंतर्गत करण्यात आली आहे. परंतू या 63 कंपन्यांचे लायसन्स अखेर आरबीआयने रद्द का केले असा सवाल केला जात आहे.
का रद्द केले लायसन्स ?
आरबीआयने दिलेल्या माहितीनुसार 14 कंपन्यांनी वेग-वेगळ्या कारणाने स्वत:चे लायसन्स परत केले होते. यात सहा कंपन्यांनी NBFC चे कामकाज बंद केले होते. याशिवाय पाच कंपन्यांना आता रजिस्ट्रेशन करण्याची गरज नव्हती. तसेच तीन कंपन्यांचे एकत्रीकरण झाले होते. त्या कोणा अन्य कारणांनी बंद झाल्या होत्या. ज्याच्या मुळे त्यांचेही रजिस्ट्रेशन रद्द करण्यात आले आहे.
या कंपन्या काम करु शकतात का ?
ज्या कंपन्यांचे रजिस्ट्रेशन रद्द झाले आहे, आता त्या NBFC म्हणून काम करु शकणार नाहीत.याचा अर्थ आता कोणत्याही स्वरुपाची कंपनी म्हणून लोन देणे वा फायनान्स संबंधित कोणतेही कामकाज करु शकणार नाही असे आरबीआयने म्हटले आहे.
कोणत्या कंपन्यांची नावे सामील
कायदेशीर अस्तित्व संपल्याच्या कारणाने या कंपन्यांचे रजिस्ट्रेशन रद्द केले आहे.
मणिभवनाम होम फायनान्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड
सन सोर्स लीफिन प्रायव्हेट लिमिटेड
लियानर डिस्ट्रीब्यूटर्स प्रायव्हेट लिमिटेड
लायसन्स परत करणाऱ्या कंपन्या
अमर प्लाजा एंड होल्डिंग्स प्रायव्हेट लिमिटेड
विकोनिक व्यापार प्रायव्हेट लिमिटेड
CGR मर्केंटाइल फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड
ब्रावो कॅपिटल सर्व्हीसेस प्रायव्हेट लिमिटेड
मनीष सिंथेटिक्स प्रायव्हेट लिमिटेड
राईट ट्रेजन फायनान्स एंड लीजिंग (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड
सर्वसामान्य ग्राहकांसाठी
जर तुम्ही एखाद्या NBFC कंपनीकडून लोन काढणार असाल तर सर्वात आधी तुम्हाला हे तपासावे लागेल की कंपनीने आरबीआयमध्ये नोंदणी केलेली आहे की नाही. कोणत्याही अज्ञात फायनान्स कंपनीशी व्यवहार करणे धोक्याचे ठरु शकते.