AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rohit Pawar: तो मफलर मॅन नेमका कोण, अजितदादांच्या अपघात प्रकरणात रोहित पवारांची वादळी पत्रकार परिषद, नेमका गौप्यस्फोट काय?

रोहित पवार यांनी आज पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेतली. यामध्ये रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या अपघाती निधनावरुन अनेक गंभीर खुलासे केले आहेत. 

Rohit Pawar: तो मफलर मॅन नेमका कोण, अजितदादांच्या अपघात प्रकरणात रोहित पवारांची वादळी पत्रकार परिषद, नेमका गौप्यस्फोट काय?
| Updated on: Nov 16, 2026 | 4:34 PM
Share

NCP Rohit Pawar PC On Ajit Pawar Accident:  राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी पुन्हा एकदा दिवंगत नेते अपघाती निधनावरुन सवाल उपस्थित केले आहेत. रोहित पवार यांनी आज पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेतली. यामध्ये रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या अपघाती निधनावरुन अनेक गंभीर खुलासे केले आहेत, मात्र या पत्रकार परिषदेतही रोहित पवार यांनी मफलर मॅनचे नाव मात्र गुलदस्त्यातच ठेवले.

काय म्हणाले रोहित पवार?

“दादांच्या अपघातामागे सत्य काय आहे हे अजूपर्यंत आपल्याला समजलं नाही. ते समजावे असे आपल्याला सर्वांना वाटते. यामध्ये तुम्ही मी सर्वजण दादांना मिस करतो. दादांचे काही व्हिडिओ दाखवतो, म्हणजे तुम्हाला दादांचे विविध पैलू समजतील. लोकांच्या आणि राज्याच्या हितासाठी दादा निर्णय घ्यायचे. मिश्किलपणे बोलणारा, टीका करणारा नेता आपल्यात नाहीत. राजकारणामध्ये पवार साहेब असतील, दादा असतील यांच्याप्रमाणेच काम करण्याचा प्रयत्न मी करत असतो. या लोकांच्या चांगल्या गोष्टी आत्मसात करुन राजकारण करण्याचा प्रयत्न करतो,” असं रोहित पवार म्हणाले.

“अपघात की घातपात हा सवाल सर्वांनाच पडला आहे. त्याचे उत्तर शोधण्याचा मी प्रामणिक प्रयत्न करत आहे. पण आमच्याकडे प्रामणिक लोक आहेत. या लोकांकडून आमच्यापर्यंत माहिती पोहोचवली आहे. ती माहिती तुम्हाला मी आजपर्यंत पोहोचवली आहे. त्यांनाही माहिती आहे, कुणीतरी त्यांची माहिती काढू शकतं, त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतो. ज्यांनी माहिती दिली त्यांनाही मी विचारलं तेव्हा ते म्हणाले आमच्यावर कारवाई होईल तेव्हा होईल,” असंही ते पुढे बोलताना म्हणाले.

सत्ताधाऱ्यांनी विनंती करुनही सीबीआयकडे तपास नाही:

“साडेनऊ महिन्यात कोणतीही माहिती तपासाबाबत समोर आली नाही, आम्हाला सर्वांना शंका आहे. सीआयडीकडे तपास देण्याचे कारण म्हणजे घातपात झालाय का? याबाबत चौकशी करणे. सीबीआयकडे तपास देण्यात येणार हे आम्ही बोललो नव्हतो. अजित पवार यांचेच आमदार बोलले होते, सत्ताधाऱ्यांनी विनंती करुनही सीबीआयकडे तपास गेला नाही, असं रोहित पवार यावेळी म्हणाले.

Follow Us
अजितदादांच्या आठवणीने फडणवीस भावुक; अमित शाहांकडे केली मागणी...
अजितदादांच्या आठवणीने फडणवीस भावुक; चौकशी अहवालाबाबत अमित शाहांकडे केली मोठी मागणी!
गृहमंत्री शाहांकडून दादांचं भरभरुन कौतुक; सांगितला 'तो' किस्सा
Amit Shah Speech : गृहमंत्री शाहांकडून दादांचं भरभरुन कौतुक; सांगितला 'तो' किस्सा
अजित दादांनी राजकारणापलीकडे नातं जपण्याचं काम केलं; शिंदेंचं विधान
अजित दादांनी राजकारणापलीकडे नातं जपण्याचं काम केलं; एकनाथ शिंदे यांचं भावनिक विधान
पुण्यात अजितदादांच्या पुतळ्याचे अनावरण; सुनेत्रा पवार भावुक...
Sunetra Pawar : पुण्यात अजितदादांच्या पुतळ्याचे अनावरण; सुनेत्रा पवार भावुक
लातूर बँक निवडणुकीत धीरज देशमुखांचा दबदबा! 19 पैकी 19 जागांचा निकाल पह
लातूर बँक निवडणुकीत धीरज देशमुखांचा दबदबा! 19 पैकी 19 जागांचा निकाल पहा...
मुलगी नताशाच्या वक्तव्यावर जितेंद्र आव्हाड ठाम भूमिका; शरद पवारांचा...
मुलगी नताशाच्या वक्तव्यावर जितेंद्र आव्हाड ठाम भूमिका; शरद पवारांचा उल्लेख करत म्हणाले...
बिनविरोध निवडीचा मान कायम! जय शाह पुन्हा सांभाळणार आयसीसीची धुरा
Jay Shah : बिनविरोध निवडीचा मान कायम! जय शाह पुन्हा सांभाळणार आयसीसीची धुरा
अमिताभ बच्चन यांच्या ‘जलसा’ बंगल्याबाहेर गोळीबाराचा कट उधळला; बिश्नोई
अमिताभ बच्चन यांच्या ‘जलसा’ बंगल्याबाहेर गोळीबाराचा कट उधळला; बिश्नोई गँगशी कनेक्शन उघड
पुण्यात दिवंगत नेते अजित पवारांच्या पुतळ्याचे अनावरण; अमित शाहांसह...
पुण्यात दिवंगत नेते अजित पवारांच्या पुतळ्याचे अनावरण; अमित शाहांसह अनेक नेत्यांची उपस्थिती!
जिल्हा बँक निवडणुकीच्या 15 पैकी 4 जागांचा निकाल जाहीर
Latur Bank Election : जिल्हा बँक निवडणुकीच्या 15 पैकी 4 जागांचा निकाल जाहीर