AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shoaib Akhtar : मराठमोळ्या अभिनेत्रीच्या प्रेमात होता शोएब अख्तर, लग्नाच्याही चर्चा रंगलेल्या; अभिनेत्री म्हणालेली, त्यांनी खरंच…

Shoaib Akhtar : पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब अख्तर मराठमोळी अभिनेत्री सोनाली बेंद्रेच्या प्रेमात होता, असं म्हटलं जायचं. यावर सोनालीनंही प्रतिक्रिया दिलेली.

Shoaib Akhtar : मराठमोळ्या अभिनेत्रीच्या प्रेमात होता शोएब अख्तर, लग्नाच्याही चर्चा रंगलेल्या; अभिनेत्री म्हणालेली, त्यांनी खरंच...
| Updated on: Nov 16, 2026 | 4:25 PM
Share

बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रेच्या सौंदर्याचे चाहते केवळ भारतातच नाही, तर परदेशातही आहेत. 90 च्या दशकात आपल्या अभिनयानं आणि सौंदर्यानं प्रेक्षकांना भुरळ घालणाऱ्या सोनालीवर एक पाकिस्तानी क्रिकेटपटूदेखील फिदा असल्याची चर्चा होती. हा क्रिकेटपटू दुसरा तिसरा कोणी नसून पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर होता. शोएबला सोनाली आवडत होती आणि त्यानं तिच्याशी लग्न करण्याची इच्छाही व्यक्त केली होती, अशा चर्चा अनेक वर्षांपासून रंगत आहेत. इतकंच नाही, तर सोनालीनं लग्नाचा प्रस्ताव नाकारल्यास तिला किडनॅप करेन, असंही त्यानं म्हटल्याचा दावा केला जात होता.

सोनाली बेंद्रेनं ‘दिलजले’, ‘सरफरोश’, ‘हम साथ साथ हैं’ यांसारख्या अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तिच्या सौंदर्याचे त्यावेळी लाखो चाहते होते. त्यात शोएब अख्तरचाही समावेश असल्याचं म्हटलं जात होतं. अनेक वर्षांपासून सोशल मीडियावर असा दावा केला जात होता की, शोएब सोनालीच्या प्रेमात पडला होता. त्याला तिच्याशी लग्न करायचं होतं. सोनालीनं लग्नाचा प्रस्ताव नाकारल्यास तिला पळवून नेईन, असं त्यानं म्हटलेलं.

काय म्हणालेली सोनाली बेंद्रे? शुभंकर मिश्राच्या पॉडकास्टमध्ये सोनाली बेंद्रेला शोएब अख्तरच्या या कथित लग्नाच्या प्रस्तावाबद्दल विचारण्यात आलं होतं. त्यावेळी तिला आश्चर्य वाटलेलं. शोएबनं खरंच असं काही म्हटलं होतं का, असा प्रश्न तिनं उपस्थित केला. यावर प्रतिक्रिया देताना सोनाली म्हणाली होती, ‘त्यांनी खरंच असं म्हटलं होतं का? मला माहीत नाही की यात किती तथ्य आहे. त्या काळातही खोट्या बातम्या पसरवल्या जायच्या.’

शोएबनं तिला किडनॅप करण्याबद्दल केलेल्या कथित वक्तव्याचा उल्लेख झाल्यानंतरही सोनालीनं आपल्याला याबद्दल खात्री नसल्याचं स्पष्ट केलं. मात्र, शोएब आपला चाहता होता, असं सांगितल्यावर तिनं आनंद व्यक्त केला. ‘देवाचे आभार! माझं करिअरच लोकांच्या या प्रेमामुळे घडलं आहे’ असं ती म्हणाली होती.

दरम्यान, 2019 मध्ये शोएब अख्तरनं स्वतःच्या यूट्यूब चॅनेलवर व्हिडिओ शेअर करत या चर्चांवर स्पष्टीकरण दिलं होतं. सोनाली बेंद्रेबद्दल आपण कधीही असं काही बोललो नसल्याचं त्यानं स्पष्ट केलं होतं. इतकंच नाही, तर आपण आयुष्यात कधीही सोनालीला भेटलो नसल्याचंही त्यानं सांगितलं होतं. शोएबनं म्हटलं होतं की, सोनालीचा फोटो पाकिटात ठेवणं, तिच्याशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त करणं किंवा तिला किडनॅप करण्याबद्दल बोलणं, या सगळ्या गोष्टी खोट्या आहेत.

Follow Us
अजितदादांच्या आठवणीने फडणवीस भावुक; अमित शाहांकडे केली मागणी...
अजितदादांच्या आठवणीने फडणवीस भावुक; चौकशी अहवालाबाबत अमित शाहांकडे केली मोठी मागणी!
गृहमंत्री शाहांकडून दादांचं भरभरुन कौतुक; सांगितला 'तो' किस्सा
Amit Shah Speech : गृहमंत्री शाहांकडून दादांचं भरभरुन कौतुक; सांगितला 'तो' किस्सा
अजित दादांनी राजकारणापलीकडे नातं जपण्याचं काम केलं; शिंदेंचं विधान
अजित दादांनी राजकारणापलीकडे नातं जपण्याचं काम केलं; एकनाथ शिंदे यांचं भावनिक विधान
पुण्यात अजितदादांच्या पुतळ्याचे अनावरण; सुनेत्रा पवार भावुक...
Sunetra Pawar : पुण्यात अजितदादांच्या पुतळ्याचे अनावरण; सुनेत्रा पवार भावुक
लातूर बँक निवडणुकीत धीरज देशमुखांचा दबदबा! 19 पैकी 19 जागांचा निकाल पह
लातूर बँक निवडणुकीत धीरज देशमुखांचा दबदबा! 19 पैकी 19 जागांचा निकाल पहा...
मुलगी नताशाच्या वक्तव्यावर जितेंद्र आव्हाड ठाम भूमिका; शरद पवारांचा...
मुलगी नताशाच्या वक्तव्यावर जितेंद्र आव्हाड ठाम भूमिका; शरद पवारांचा उल्लेख करत म्हणाले...
बिनविरोध निवडीचा मान कायम! जय शाह पुन्हा सांभाळणार आयसीसीची धुरा
Jay Shah : बिनविरोध निवडीचा मान कायम! जय शाह पुन्हा सांभाळणार आयसीसीची धुरा
अमिताभ बच्चन यांच्या ‘जलसा’ बंगल्याबाहेर गोळीबाराचा कट उधळला; बिश्नोई
अमिताभ बच्चन यांच्या ‘जलसा’ बंगल्याबाहेर गोळीबाराचा कट उधळला; बिश्नोई गँगशी कनेक्शन उघड
पुण्यात दिवंगत नेते अजित पवारांच्या पुतळ्याचे अनावरण; अमित शाहांसह...
पुण्यात दिवंगत नेते अजित पवारांच्या पुतळ्याचे अनावरण; अमित शाहांसह अनेक नेत्यांची उपस्थिती!
जिल्हा बँक निवडणुकीच्या 15 पैकी 4 जागांचा निकाल जाहीर
Latur Bank Election : जिल्हा बँक निवडणुकीच्या 15 पैकी 4 जागांचा निकाल जाहीर