AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आकड्यांबरोबर चांगल्या पद्धतीने खेळायची भाजपची खासियत : रोहित पवार

छोट्या शेतकऱ्यांसाठी जर ती मदत जाणार असेल तर माझ्यासारखा कार्यकर्ता त्याचं स्वागतचं करेल," असेही रोहित पवार (Rohit Pawar on Budget 2020) म्हणाले.

आकड्यांबरोबर चांगल्या पद्धतीने खेळायची भाजपची खासियत : रोहित पवार
| Edited By: Sachin Patil | सचिन पाटील | Updated on: Feb 01, 2020 | 5:45 PM
Share

पिंपरी-चिंचवड : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी शनिवारी (1 फेब्रुवारी) मोदी सरकारचा दुसरा अर्थसंकल्प सादर (Rohit Pawar on Budget 2020) केला. या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी 16 सूत्रीय कार्यक्रम जाहीर केला. अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर विविध राजकीय नेत्यांनी यावर प्रतिक्रिया व्यक्त केल्या. यावर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देत भाजप सरकारवर अप्रत्यक्षरित्या टीका केली. “खरंच तो आकडा नक्की काय आहे? ते आधी बघावं लागेल. मी सकाळपासून कामात आहे. त्यामुळे तुम्ही जो आकडा सांगत आहात, तो बघावं लागेल. मी अजूनही पूर्ण बजेट बघितलेलं नाही. 15 लाख कोटी हा आकडा खरचं खोलात जाऊन बघावा लागेल,” असे रोहित पवार (Rohit Pawar on Budget 2020) म्हणाले.

“अर्थसंकल्पात जाहीर केलेला आकडा शेवटी तो काय आहे हे बघावं लागेल. कारण भाजप सरकारची खासियत आहे. चांगल्या पद्धतीने आकड्याबरोबर खेळायचं त्यांना माहित आहे. त्यामुळे तिथे फक्त दाखवण्यासाठी केलं आहे की, खरचं शेतकऱ्यांपर्यंत किंवा सर्वसामान्यांपर्यंत ती मदत जाईल याचा अभ्यास आपल्याला करावा लागेल,” असे वक्तव्य रोहित पवार यांनी केलं.

“एकदा त्यांनी शेतकऱ्यांसाठी बजेट वाढवलं हे सांगितलं होतं. पण त्यांनी तसं केलं नव्हतं. त्यावेळी त्यांनी इंटरेस्टचा पोर्शन आधीचं काँग्रेस राष्ट्रवादीचे सरकार असताना इंटरेस्ट वेगळ्या बजेटमध्ये धरला जायचा. पण त्यावेळी त्यांनी सगळं क्लब केल्यानंतर शेतकऱ्यांसाठी त्यांनी खूप बजेट आणलं असं भासवलं होतं. पण ते तसं नव्हतं. त्यांनी काही गोष्टी क्लब केल्या होत्या. या आकड्यामध्ये त्यांनी खरचं काय केलं आहे. ते थोडंस खोलात जाऊन बघावं लागेल,” अशी प्रतिक्रिया रोहित पवार यांनी (Rohit Pawar on Budget 2020) दिली.

“आकडा न बघता मी शेतकऱ्यांसाठी खास इच्छा व्यक्त करतो की, शेतकऱ्यांसाठी खास त्यांच्या हातात जाईल, अशी मदत जाहीर केली असावी. ती लोकांना मिळाली असावी आणि जर योग्य पद्धतीने बजेटचे सादरीकरण केलं असेल. छोट्या शेतकऱ्यांसाठी जर ती मदत जाणार असेल तर माझ्यासारखा कार्यकर्ता त्याचं स्वागतचं करेल,” असेही रोहित पवार म्हणाले.

“एका वर्षात विकासाचा दर हा दहा टक्के पर्यंत जाईल असं वाटत नाही. कारण गेल्या पाच वर्षात घाई-घाईत घेतलेल्या निर्णयाचे परिणाम आता आपण भोगत आहोत, त्यात काही तज्ज्ञ जागतिक मंदी आहे असे म्हणतात. 2008 मध्ये सुद्धा भारतात जागतिक मंदी असताना आघाडी सरकारची जी वाढ होती ती 9 टक्क्याच्या आसपास होती. आज ते 6.5 पर्यंत घेऊन जाऊ असे म्हणतात. पण 5 आता आलं आहे. पण जर ते 5 टक्क्याच्या खाली आलं आणि 1 टक्का जरी विकासदर कमी झाला तर लाखो कोटींचा फटका देशाला पडेल,” असेही रोहित पवार म्हणाले.

मोदी सरकारने जाहीर केलेल्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी विविध योजना जाहीर करण्यात आल्या. यात “शेती पंपांना सौर उर्जेवर जोडण्यासाठी सरकार प्रयत्न करेल. या अंतर्गत 20 लाख शेतकऱ्यांना सौरउर्जा संयंत्र दिलं जाईल. जी राज्ये केंद्र सरकारच्या कायद्यांचं मॉडेल स्वीकारतील त्यांना प्रोत्साहन दिलं जाईल. अन्नदाता उर्जादाता देखील आहे. पंतप्रधान कुसुम योजनेमुळे अनेक शेतकऱ्यांना फायदा झाला आहे. पाण्याच्या प्रश्नाशी झुंज देत असलेल्या 100 जिल्ह्यांसाठी व्यापक उपाय योजना केल्या जातील” यासारख्या अनेक योजना जाहीर करण्यात (Rohit Pawar on Budget 2020) आल्या.

नवी कररचना

जर तुमचं उत्पन्न 5 लाखाच्या आत असेल तर तुम्हाला एक रुपयाही टॅक्स भरावा लागणार  नाही. मात्र जर तुमचं उत्पन्न 5 लाखांच्या वर असेल, तर तुमचं करपात्र उत्पन्न हे अडीच लाखापासून मोजलं जाईल. म्हणजे अडीच ते 5 लाख रुपयांसाठी 5 टक्के,  5 ते 7 लाख 50 हजारांसाठी 10 टक्के याप्रमाणे कर आकारला जाईल.

कररचना – टॅक्स स्लॅबमध्ये बदल

  • अडीच लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त
  • उत्पन्न 2.5 ते 5 लाख – 5 टक्के कर (आधीही 5 टक्के)
  • उत्पन्न 5 लाख ते 7.5 लाख – 10 टक्के कर (आधी 20 टक्के)
  • उत्पन्न 7.5 लाख ते 10 लाख – 15 टक्के कर (आधी 20 टक्के)
  • उत्पन्न 10 लाख ते 12.5 लाख – 20 टक्के कर (आधी 30 टक्के)
  • उत्पन्न 12.5 ते 15 लाख – 25 टक्के कर (आधी 30 टक्के)
  • उत्पन्न 15 लाखांपेक्षा अधिक – 30 टक्के कर (कोणतीही सवलत नाही)

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया.

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?.

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या