AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

केंद्राचा डिझेलबाबत मोठा निर्णय! 36 रुपयांनी टॅक्स वाढवला, नवीन किंमत किती?

Diesel : केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. केंद्राने हाय-स्पीड डिझेलवर निर्यात शुल्क ₹24 प्रति लिटर आणि इन्फ्रा सेस ₹36 प्रति लिटरने वाढवला आहे.

केंद्राचा डिझेलबाबत मोठा निर्णय! 36 रुपयांनी टॅक्स वाढवला, नवीन किंमत किती?
DieselImage Credit source: Google
| Updated on: Apr 11, 2026 | 7:48 PM
Share

अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धामुळे आखाती देशांमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. भारताकडे येणारी तेलवाहतूक विस्कळित झाली होती, परिणामी संपूर्ण जगात इंधन संकट निर्माण झाले आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. अशातच आता केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. केंद्राने हाय-स्पीड डिझेलवर निर्यात शुल्क ₹24 प्रति लिटर आणि इन्फ्रा सेस ₹36 प्रति लिटरने वाढवला आहे. अर्थ मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात ही वाढ तत्काळ लागू करण्यात आली असल्याची माहिती दिली आहे. सरकारने याआधीही 26 मार्च रोजी डिझेलवर ₹21.50 प्रति लिटर आणि एटीएफवर ₹29.5 प्रति लिटर निर्यात शुल्क लावले होते. त्यानंतर आता दुसऱ्यांदा वाढ करण्यात आली आहे.

शुल्क लादताना सरकारने काय म्हटलं?

सरकारने म्हटले की, डिझेलवरील निर्यात शुल्क ₹21.5 प्रति लिटरवरून वाढवून ₹55.5 प्रति लिटर करण्यात आले आहे. त्याचबरोबर हाय-स्पीड डिझेलवरील अतिरिक्त उत्पादन शुल्क (एक्साइज ड्यूटी) आणि सेसही वाढवण्यात आले आहेत. आता हाय-स्पीड डिझेलवरील विशेष अतिरिक्त उत्पादन शुल्क ₹24 प्रति लिटर करण्यात आले आहे, तर रोड आणि इन्फ्रास्ट्रक्चर सेस आता ₹36 प्रति लिटर झाला आहे. एव्हिएशन टर्बाइन फ्यूल (ATF) वरील शुल्कही ₹29.5 प्रति लिटरवरून वाढवून ₹42 प्रति लिटर करण्यात आले आहे. मात्र पेट्रोलवरील निर्यात शुल्क शून्यच ठेवण्यात आले आहे.

या निर्णयामागचे कारण काय?

मध्य पूर्वेत सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतातील बाजारात इंधनाची उपलब्धता वाढवण्यासाठी हे शुल्क लावण्यात आले आहेत. कारण हा कर वाढल्यामुळे निर्यातदारांना आंतरराष्ट्रीय बाजारात जास्त दराने डिझेल विकावे लागणार आहे. कर वाढल्याने ही विक्री कमी होऊन तो साठा देशांतर्गत बाजारात पुरवठा वाढू शकतो.

दरम्यान, 28 फेब्रुवारी रोजी अमेरिका आणि इस्रायलने इराणविरुद्ध युद्ध सुरु केले होते. त्यानंतर इराणनेही आक्रमक होत प्रत्युत्तर दिले होते. यामुळे आखाती देशांमधून जगभरात होणारा तेलपुरवठा बंद झाला होता. मात्र 8 एप्रिल रोजी इराण, अमेरिका आणि इस्रायल यांनी दोन आठवड्यांच्या युद्धविरामावर सहमती दर्शवली आहे, त्यामुळे मध्य पूर्वेतील तणाव आणखी कमी झाला आहे.

Follow Us
सोलापूरमध्ये शेतकऱ्यांचे आंदोलन: मंत्री बाबासाहेब पाटलांना अडवले
माढ्यात शेतकऱ्यांचे आंदोलन: मंत्री बाबासाहेब पाटलांसमोर २ लाखांच्या कर्जमाफीची मागणी
चिंचपोकळीच्या चिंतामणीचा फर्स्ट लुक समोर; पहा...
Chinchpoklicha Chintamani | चिंचपोकळीच्या चिंतामणीचा फर्स्ट लुक समोर; पहा व्हिडीओ
ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाचे आगमन! चिंपोकळीतील चिंतामणीचं भव्य स्वागत
ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाचे आगमन! चिंपोकळीतील चिंतामणीच्या भव्य स्वागताचा व्हिडीओ समोर
मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या चुकीच्या, गुणरत्न सदावर्तेंचा आरोप
मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या चुकीच्या आणि पूर्ण होऊ शकत नाहीत- गुणरत्न सदावर्ते
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला अभिजीत दीपके यांचे समर्थन
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला अभिजीत दीपके यांचे समर्थन
अशोक उईके: आदिवासी विद्यार्थ्यांची आंदोलने मागे, प्रमुख मागण्या मान्य
अशोक उईके: आदिवासी विद्यार्थ्यांची आंदोलने मागे, प्रमुख मागण्या मान्य; तीन महिन्यांनी पुन्हा चर्चा
सुभाष चंद्र यांचा रिलायन्स मीडिया नेटवर्कवर अफवा पसरवल्याचा आरोप
सुभाष चंद्र यांचा रिलायन्स मीडिया नेटवर्कवर अफवा पसरवल्याचा आरोप
22 हजार कोटींच्या कर्ज सेटलमेंटवरून वाद; सुभाष चंद्रां आणि रिलायन्स...
22 हजार कोटींच्या कर्ज सेटलमेंटवरून वाद; सुभाष चंद्रां आणि रिलायन्स मीडिया ग्रुप आमनेसामने
राहुल गांधींचा भाजपवर हल्ला, खर्गेंच्या सभास्थळ शुद्धीकरणावर संताप
Rahul Gandhi | राहुल गांधींचा भाजपवर हल्ला, खर्गेंच्या सभास्थळ शुद्धीकरणावर संताप
अंतरावली सराटीतून मनोज जरांगेंचं मोठं विधान, केलं आवाहान...
Manoj Jarange Patil : अंतरावली सराटीतून मनोज जरांगेंचं मोठं विधान, प्रत्येक मराठ्याला केलं आवाहन