AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय, नवीन फॉर्म्युला तयार; कुणाला फायदा होणार?

LPG : अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धामुळे भारतातही एलपीजीचे संकट निर्माण झाले आहे. हे युद्ध थांबल्यानंतर लगेचच केंद्र सरकारने एलपीजीबाबत मोठा निर्णय घेतला आहे.

LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय, नवीन फॉर्म्युला तयार; कुणाला फायदा होणार?
LPG Image Credit source: TV 9 Marathi
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Apr 08, 2026 | 4:17 PM
Share

अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्ध 40 दिवसांच्या संघर्षानंतर थांबले आहे. यामुळे जगभरातील देशांनी आनंद व्यक्त केला आहे. या युद्धामुळे भारतासह अनेक देशांच्या इंधन पुरवठ्यावर परिणाम झाला होता. कारण या युद्धामुळे आखाती देशांमध्ये तणाव निर्माण झाला होता, इराणने होर्मुझची सामुद्रधुनी बंद केली होती. त्यामुळे भारतातही एलपीजीचे संकट निर्माण झाले आहे. आता हे युद्ध थांबल्यानंतर लगेचच केंद्र सरकारने एलपीजीबाबत मोठा निर्णय घेतला आहे. देशभरात एलपीजीची टंचाई लक्षात घेऊन गॅस पुरवठ्याचा नवा फॉर्म्युला तयार करण्यात आला आहे. याचा कोणत्या विभागांना फायदा होणार याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

केंद्र सरकारने इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्ध थांबताच फार्मा ते स्टीलपर्यंत विविध उद्योगांना दिलासा दिला आहे. सरकारने औद्योगिक क्षेत्रासाठी केल्या जाणाऱ्या एलपीजी पुरवठ्यासाठी नवीन अटी जाहीर केल्या आहेत. राज्यांना आधीच पॅक्ड नॉन-डोमेस्टिक एलपीजीचा 70% कोटा देण्यात आला आहे. यामध्ये आता 10% अतिरिक्त कोटा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र हा कोटा त्याच राज्यांना दिला जाणार आहे जे PNG (पाइप्ड नॅचरल गॅस) पायाभूत सुविधा वाढवतील.

एलपीजी वापराच्या 70% पुरवठा मिळणार

सरकारने फार्मा, अन्न प्रक्रिया, पॉलिमर, कृषी, पॅकेजिंग, पेंट, युरेनियम, हेवी वॉटर, स्टील, बियाणे, धातू, सिरेमिक, फाउंड्री, फोर्जिंग, काच इत्यादी क्षेत्रांना मोठ्या एलपीजी देण्याचा निर्णय घेतला आहे. या उद्योगांना मार्च 2026 पूर्वीच्या त्यांच्या वापराच्या 70% एलपीजी पुरवठा मिळेल.

कुणाला सर्वप्रथम एलपीजी मिळणार?

केंद्र सरकारने संपूर्ण क्षेत्रासाठी एकूण मर्यादा 0.2 TMT प्रति दिवस जाहीर केली आहे. ज्या कारखान्यांमध्ये एलपीजीच्या ऐवजी नैसर्गिक वायूचा वापर शक्य नाही, त्यांना प्राधान्याने एलपीजी दिला जाणार आहे. यासाठी संबंधित उद्योगांना OMCs (तेल कंपन्या) सोबत नोंदणी करावी लागणार आहे. तसेच PNG कनेक्शनसाठी CGD कंपन्यांकडे अर्ज करावा लागणार आहे. मात्र ज्या ठिकाणी एलपीजी हा उत्पादन प्रक्रियेचा महत्त्वाचा भाग आहे आणि त्याऐवजी दुसरा वायू वापरता येत नाही, तिथे PNG अर्जाची अट माफ करण्यात आली आहे.

केंद्र सरकारने राज्यांना दिलेल्या सूचना

  • नैसर्गिक वायू आणि पेट्रोलियम उत्पादने वितरण आदेश 2026, सर्व संबंधित विभागांपर्यंत पोहोचवावा.
  • 10% रिफॉर्म-लिंक्ड एलपीजी वाटपाचा लाभ लवकरात लवकर घ्यावा.
  • कॉम्प्रेस्ड बायोगॅस (CBG) संदर्भातील राज्य धोरण लवकर जाहीर करावे.

Follow Us
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा
शेतकऱ्यांना 5 हजारांची मदत तुटपुंजी; सुनील तटकरे नाराज, सरकारच्या....
Sunil Tatkare : शेतकऱ्यांना 5 हजारांची मदत तुटपुंजी; सुनील तटकरे नाराज, सरकारच्या निर्णयावर काय म्हणाले?