AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

LPG Price: गॅस सिलेंडर झटक्यात होणार स्वस्त; सरकारचा महागाईवर मास्टरस्ट्रोक? मोदींसमोर तो मोठा प्रस्ताव

LPG Price : इराण युद्धाला तात्पुरता ब्रेक लागल्याने सर्व जगाचा जीव भांड्यात पडला आहे. तर पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत सध्या कोणतीही वाढ झाली नसली तरी गेल्या काही वर्षात गॅस सिलेंडरच्या किंमती वाढल्या आहेत. त्याचवेळी मोदी सरकारसमोर एक मोठा प्रस्ताव आला आहे. सिलेंडर स्वस्त होणार?

LPG Price: गॅस सिलेंडर झटक्यात होणार स्वस्त; सरकारचा महागाईवर मास्टरस्ट्रोक? मोदींसमोर तो मोठा प्रस्ताव
एलपीजी पीएनजीची स्वस्ताईImage Credit source: एजन्सी
| Updated on: Apr 08, 2026 | 1:02 PM
Share

LPG Price: आघाडीवर जनतेला एक मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. सीटीआयने(CTI) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. त्यानुसार गॅसवरील कर हटवण्याची मागणी लावून धरण्यात आली आहे. याविषयीचा प्रस्ताव मोदी सरकारसमोर आहे. व्यावसायिक गॅस सिलेंडरवरील 18% जीएसटी हटवण्याची वकिली करण्यात आली आहे. त्यामुळे व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत थेट 317 रुपयांनी कमी होईल. तर घरगुती गॅस सिलेंडरवरील 5% कर हटवण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे घरगुती गॅस सिलेंडर 43 रुपयांनी स्वस्त होईल. केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलेंडरवर 60 रुपयांची वाढ केली होती. ती मागे घेतल्यास आणि कर कपात केल्यास घरगुती गॅस सिलेंडर 100 रुपयांनी स्वस्त होण्याची शक्यता आहे.

पंतप्रधान मोदींना साकडे

चेंबर ऑफ ट्रेड अँड इंडस्ट्रीजने (CTI) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून एलपीजी आणि पीएनजी कर मुक्त करण्यासाठी साकडे घातले आहे. इराण-अमेरिका युद्धामुळे गॅस पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला आहे. हा परिणाम कमी करण्यासाठी ग्राहकांवरील कराचा भार कमी करण्यासाठी हा उपाय सुचवण्यात आला आहे. यापूर्वी सु्द्धा केंद्र सरकारकडे अत्यावश्यक सेवा कर मुक्त करण्याचा आग्रह धरण्यात आला होता. मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात गॅसची किंमत 500 रुपयांच्या आत होत्या. तर मोदी सरकारच्या कार्यकाळात सिलेंडरचे भाव हजार रुपयांच्या जवळपास आहेत.

कराचे गणित काय?

सध्या घरगुती एलपीजी सिलेंडरवर 5 टक्के जीएसटी लागू आहे. तर व्यावसायिक सिलेंडरवर हा दर 18 टक्के इतका आहे. तर पाईपच्या माध्यमातून स्वयंपाक घरात पोहचणारा पीएनजी (PNG) सध्या जीएसटी परिघाबाहेर आहे. तर राज्य सरकार पीएनजीवर व्हॅट (VAT) आकारते. त्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होतो.

घरगुती सिलेंडर स्वस्त होणार

जर सरकारने घरगुती गॅस सिलेंडरवरील 5 टक्के जीएसटी हटवला तर ग्राहकांच्या खिशावरील ताण झटक्यात कमी होईल. समजा जर सध्या घरगुती गॅस सिलेंडरची किंमत 913 रुपये असेल आणि त्यावरील 5 टक्के जीएसटी माफ झाला. तर जवळपास 43 रुपये कमी होतील. म्हणजे सिलेंडर 869.52 रुपयांना मिळेल. जर 60 रुपये वाढलेली किंमतही कमी झाली तर सिलेंडरचा दर थेट 809.52 रुपयांवर पोहचेल. ग्राहकांना मोठा दिलासा मिळेल.

Follow Us
युद्धविरामाचा भारतावर काय परिणाम होणार? निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन
युद्धविरामाचा भारतावर काय परिणाम होणार? निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन.
युद्धविराम फसला? इराण-इस्त्रायलचे हल्ले सुरूच, होर्मूझ समुद्रधुनीबाबत
युद्धविराम फसला? इराण-इस्त्रायलचे हल्ले सुरूच, होर्मूझ समुद्रधुनीबाबत.
युद्धविरामाच्या घोषणेनंतर कच्च्या तेलाच्या किंमतीत मोठी घसरण, सामान्या
युद्धविरामाच्या घोषणेनंतर कच्च्या तेलाच्या किंमतीत मोठी घसरण, सामान्या.
संजय राऊतांनी इराणचं केलं तोंडभर कौतुक; म्हणाले 'या देशाकडून...
संजय राऊतांनी इराणचं केलं तोंडभर कौतुक; म्हणाले 'या देशाकडून....
11 गुन्हे दाखल, SITचा मोठा खुलासा; 4650 व्हिडिओ लिंक हटवल्या
11 गुन्हे दाखल, SITचा मोठा खुलासा; 4650 व्हिडिओ लिंक हटवल्या.
17 मार्च ते आजपर्यंत, अशोक खरात प्रकरणात काय-काय घडलं? SIT ने...
17 मार्च ते आजपर्यंत, अशोक खरात प्रकरणात काय-काय घडलं? SIT ने....
बारामती निवडणुकीवर फडणवीसांची साद; नेमकं काय होणार?
बारामती निवडणुकीवर फडणवीसांची साद; नेमकं काय होणार?.
खरात प्रकरणी एकनाथ शिंदेंच्या चौकशीबाबत संजय शिरसाटांचे मोठे वक्तव्य
खरात प्रकरणी एकनाथ शिंदेंच्या चौकशीबाबत संजय शिरसाटांचे मोठे वक्तव्य.
काँग्रेस उमेदवार मागे घेण्यास तयार पण...त्या एका अटीमुळे......
काँग्रेस उमेदवार मागे घेण्यास तयार पण...त्या एका अटीमुळे.......
मुंबई मेट्रोची नववी मार्गिका आजपासून प्रवाशांच्या सेवेत, CM फडणवीसांनी
मुंबई मेट्रोची नववी मार्गिका आजपासून प्रवाशांच्या सेवेत, CM फडणवीसांनी.