AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mukesh Ambani | मुकेश अंबानी यांची रॉकेट भरारी! तिजोरीत एकाच दिवसात जमा झाले 57,032 कोटी

Mukesh Ambani | रिलायन्सच्या शेअरमध्ये सोमवारी मोठी तेजी दिसून आली. यामुळे समूहाचे चेअरमन मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती वाढली. अंबानी सोमवारी सर्वाधिक कमाई करणारे अब्जाधीश ठरले. तर त्यांच्या पाठोपाठ गौतम अदानी यांनी पण मोठी झेप घेतली. ते 100 अब्ज डॉलरच्या उंबरठ्यावर आहेत.

Mukesh Ambani | मुकेश अंबानी यांची रॉकेट भरारी! तिजोरीत एकाच दिवसात जमा झाले 57,032 कोटी
| Updated on: Jan 30, 2024 | 10:53 AM
Share

नवी दिल्ली | 30 January 2024 : देशातील सर्वात मौल्यवान कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजचे (Reliance Industries) शेअर सोमवारी उसळले. या शेअर्समध्ये 6 टक्क्यांहून अधिकची तेजी दिसून आली. त्यामुळे रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांची नेटवर्थ, एकूण संपत्तीत 6.86 अब्ज डॉलरची वाढ झाली. जगातील श्रीमंतांच्या यादीत ते 11 व्या स्थानावर पोहचले. सोमवारी अंबानी सर्वाधिक कमाई करणारे अब्जाधीश ठरले. त्यांची संपत्ती 108 अब्ज डॉलरवर पोहचली. भारत आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्त अंबानी यांच्या संपत्तीत या वर्षात 11.3 अब्ज डॉलरची तेजी दिसून आली. तर गौतम अदानी हे 100 अब्ज डॉलर क्लबच्या उंबरठ्यावर येऊन ठेपले आहे. सोमवारी त्यांच्या नेटवर्थमध्ये 4.28 अब्ज डॉलरची भर पडली.

कोणाच्या खिशात किती डॉलर

  1. सर्वात श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क यांच्या संपत्तीत 5.49 अब्ज डॉलरची भर पडली. आता त्यांची एकूण संपत्ती 204 अब्ज डॉलर इतकी झाली आहे. पण त्यांच्या संपत्तीत यंदा 25 अब्ज डॉलरची घसरण दिसून आली. तर गेल्या वर्षभरात त्यांनी 92 अब्ज डॉलरची कमाई केली.
  2. जेफ बेजोस 186 अब्ज डॉलर संपत्तीसह जगातील श्रीमंतांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर पोहचले. फ्रान्सचे बर्नार्ड आरनॉल्ट (183 अब्ज डॉलर) तिसऱ्या, बिल गेट्स (145 अब्ज डॉलर) चौथ्या, मार्क झुकरबर्ग (145 अब्ज डॉलर) पाचव्या स्थानावर आहेत.
  3. स्टीव्ह बालमर (142 अब्ज डॉलर) सहाव्या क्रमांकावर, लॅरी पेज (137 अब्ज डॉलर) सातव्या, सर्गेई ब्रिन (130 अब्ज डॉलर) आठव्या क्रमांकावर, लॅरी एलिसन (128 अब्ज डॉलर) नवव्या स्थानावर, वॉरेन बफे (128 अब्ज डॉलर) दहाव्या क्रमांकावर आहेत. यंदा कमाईच्या बाबतीत मार्क झुकरबर्ग पहिल्या क्रमांकावर आहेत. त्यांच्या तिजोरीत आतापर्यंत 16.5 अब्ज डॉलर आले आहेत.

गौतम अदानी

तर अदानी समूहाचे चेअरमन गौतम अदानी पण मागे नाहीत. अदानी यांच्या नेटवर्थमध्ये सोमवारी 4.28 अब्ज डॉलरची भर पडली. आता त्यांची संपत्ती 95.9 अब्ज डॉलरवर पोहचली. यंदा त्यांच्या नेटवर्थमध्ये 11.6 अब्ज डॉलरची भर पडली. कमाईच्या बाबतीत मार्क झुकरबर्ग यांच्यानंतर अदानी यांचा क्रमांक लागतो. गेल्यावर्षी अमेरिकन शॉर्ट सेलिंग कंपनी हिंडनबर्ग रिसर्च कंपनीच्या एका रिपोर्टनंतर या समूहात मोठा भूकंप आला होता.

Follow Us
पावसाचा हाहाकार! वादळी वाऱ्यासह पावसाचा आणखी मोठा दणका, तेलाने खचाखच
पावसाचा हाहाकार! वादळी वाऱ्यासह पावसाचा आणखी मोठा दणका, तेलाने खचाखच भरलेलं जहाज...
अटल सेतूपासून Missing Link पर्यंत...पावसाने सरकारचे वाभाडे काढले
Ambadas Danve | अटल सेतूपासून Missing Link पर्यंत...पावसाने सरकारचे वाभाडे काढले; सरकारच्या प्रकल्पांवर दानवेंचा सणसणीत वार
राजकीय हालचाली वाढल्या! विजय वडेट्टीवारांच्या सूचक विधानाने खळबळ, शरद
राजकीय हालचाली वाढल्या! विजय वडेट्टीवारांच्या सूचक विधानाने खळबळ, शरद पवार गट सत्तेत जाणार की...
शरद पवार गट NDAमध्ये जाणार?; रोहित पवारांनी दिलं सर्वात मोठं उत्तर!
मोठी बातमी! शरद पवार गट NDAमध्ये जाणार? चर्चांना उधाण; रोहित पवारांनी दिलं सर्वात मोठं उत्तर! म्हणाले...
मोठी बातमी! नाशिकच्या कुंभमेळ्यात गुजराती ठेकेदारांना... बड्या नेत्याच
मोठी बातमी! नाशिकच्या कुंभमेळ्यात गुजराती ठेकेदारांना... बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ!
खेडमध्ये भीषण दरड दुर्घटना! NDRFची अडकलेल्या जीवांसाठी शर्थ
Ratnagiri | खेडमध्ये भीषण दरड दुर्घटना! NDRFची अडकलेल्या जीवांसाठी शर्थ; दोघांच्या मृत्यूची भीती, नेमकं काय घडलं?
एकच खळबळ! शरद पवार सत्तेत येण्याच्या तयारीत? बड्या नेत्यावर जबाबदारी
एकच खळबळ! शरद पवार सत्तेत येण्याच्या तयारीत? बड्या नेत्याला दिली जबाबदारी अन्...
6700 कोटी वाहून गेले, कमिशन मात्र वाचलं! मिसिंग लिंकवरून राऊतांचा...
Sanjay Raut UNCUT | 6700 कोटी वाहून गेले, कमिशन मात्र वाचलं! मिसिंग लिंकवरून संजय राऊतांचा फडणवीस सरकारवर घणाघात
अतिसुरक्षित लोकभवन परिसरात धक्कादायक घडलं! अचानक मोठा आवाज झाला अन्...
अतिसुरक्षित लोकभवन परिसरात धक्कादायक घडलं! अचानक मोठा आवाज झाला अन्... कर्तव्य बजवत असतानाच जवानाने संपवलं जीवन
मिसिंग लिंकवर दरड... त्यालाही नेहरूच जबाबदार?
Sandeep Deshpande | मिसिंग लिंकवर दरड... त्यालाही नेहरूच जबाबदार? संदीप देशपांडेंचा फडणवीस सरकारला खोचक टोला