AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Multibagger Share | शेअर कसला हे तर अस्सल सोने, एक लाखाचे झाले 12 कोटी!

Multibagger Share | हरियाणातील या दारु उत्पादक कंपनीने गुंतवणूकदारांना मालामाल केले. या कंपनीच्या व्हिस्कीला जागतिक पातळीवर बेस्ट ब्रँड म्हणून बहुमान मिळाला. जे या व्हिस्कीने झिंगले त्यांनी पैसा गमावला. पण ज्यांनी या कंपनीच्या शेअरमध्ये पैसा ओतला ते आज कोट्याधीश झाले आहेत. त्यांना लॉटरी लागली आहे.

Multibagger Share | शेअर कसला हे तर अस्सल सोने, एक लाखाचे झाले 12 कोटी!
| Updated on: Oct 19, 2023 | 9:32 AM
Share

नवी दिल्ली | 19 ऑक्टोबर 2023 : शेअर बाजारात अनेक स्टॉक्स आहेत. त्यातील काही गुंतवणूकदारांचे नशीबच पलटी करुन टाकतात. या शेअरमध्ये सातत्याने तेजीचे सत्र दिसून येते. त्याचा फायदा गुंतवणूकदारांना होतो. या व्हिस्की उत्पादन करणाऱ्या कंपनीने पण अशीच लॉटरी लावली आहे. बाजारातील चढउताराचा मोठा परिणाम या शेअरवर दिसला नाही. त्याने तुफान बॅटिंग केली आहे. एक लाख रुपयांची गुंतवणूक करणारे शेअरधारक आज कोट्याधीश आहेत. या कंपनीच्या व्हिस्कीला जागतिक पातळीवर बेस्ट ब्रँड म्हणून नुकतेच नावाजण्यात आलेले आहे. तुमच्या पोर्टफोलिओत आहे का हा स्टॉक?

हरियाणाची कंपनी

कंपनीच्या Indri Diwali Collector’s Edition 2023 (Indri whisky) या ब्रँडला जागतिक दर्जा मिळाला आहे. हरियाणामधील पिकाडली डिस्टिलरीजचे (Piccadilly Agro Inds Limited) हे उत्पादन आहे. जगातील सर्वात लोकप्रिय व्हिस्कीचा मान या ब्रँडने कमावला आहे. “Double Gold Best In Show” असा किताब या ब्रँडला मिळाला आहे. पुरस्कार मिळाल्यापासून या कंपनीचा शेअर तेजीत आहे.

तुफान तेजीचे सत्र

हरियाणामधील पिकाडली डिस्टिलरीजच्या उत्पादनाला जागतिक पातळीवर दर्जा मिळाल्याने शेअरवर त्याचा परिणाम दिसून आला. गेल्या पाच दिवसांत गुंतवणूकदार मालामाल झाले आहेत. सातत्याने शेअरमध्ये तेजीचे सत्र सुरु आहे. या शेअरमध्ये 9 टक्के उसळी दिसून आली. हा शेअर 296.80 रुपयांवर बंद झाला होता. आज सकाळच्या सत्रात त्यात घसरण दिसली.

गुंतवणूकदार झाले करोडपती

या शेअरमध्ये एक लाखांची गुंतवणूक करणारे आज कोट्याधीश आहेत. 1997 मध्ये या शेअरचा भाव अवघा 25 पैसे होता. त्यावेळी गुंतवणूकदाराने एक लाख रुपये गुंतवणूक करुन ती कायम ठेवली असती तर आज त्याचे 12 कोटींहून अधिक मूल्य असते. काल हा शेअर 296 रुपयांवर बंद झाला. तर गेल्या 6 महिन्यात या शेअरने गुंतवणूकदारांना 554 टक्क्यांचा बंपर परतावा दिला आहे. या दरम्यान ज्यांनी एक लाखांची गुंतवणूक केली, त्यांना 6 लाख रुपयांहून अधिकचा परतावा मिळाला असता. गेल्या पाच वर्षांत या शेअरने गुंतवणूकदारांना 2295 टक्क्यांहून अधिकचा छप्परफाड परतावा दिला आहे.

सूचना : हा शेअरचा केवळ लेखाजोखा आहे. या शेअरची कामगिरी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराकडून सल्ला आवश्य घ्या. तुमचा कोणत्या ही प्रकारचा फायदा अथवा नुकसानीला TV9 मराठी जबाबदार नसेल.

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...