AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SEBI Action : बोले तो, ‘सर्किट’ इन ट्रबल! सेबीने का केली कारवाई

SEBI Action : आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना खळखळून हसविणारा बॉलिवूड अभिनेता अर्शद वारसी याच्या अडचणी वाढल्या आहेत. प्रेक्षकांचा लाडका सर्किट सध्या संकटांत अडकला आहे. शेअर बाजार नियामक सेबीने त्याच्यावर कारवाई केली आहे, काय आहे नेमकं प्रकरण

SEBI Action : बोले तो, 'सर्किट' इन ट्रबल! सेबीने का केली कारवाई
| Updated on: Mar 02, 2023 | 8:42 PM
Share

नवी दिल्ली : आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना खळखळून हसविणारा बॉलिवूड अभिनेता अर्शद वारसी (Arshad Warsi) याच्या अडचणी वाढल्या आहेत. प्रेक्षकांचा लाडका सर्किट सध्या संकटांत अडकला आहे. शेअर बाजार नियामक सेबीने त्याच्यावर कारवाई केली आहे. भारतीय प्रतिभूति आणि विनिमय मंडळाने (SEBI) गुरुवारी मुन्नाभाईच्या सर्किटवर, त्याची पत्नी मारिया गोरेटी आणि साधना ब्रॉडकॉस्टच्या प्रवर्तकांवर कारवाई केली आहे. सेबीने 31 संस्थांना रोखे बाजारात व्यापार करण्यास बंदी घातली. युट्यूब चॅनलवर गुंतवणूकदारांना कंपनीचे शेअर खरेदी करण्याचा सल्ला दिल्याप्रकरणात ही कारवाई केली आहे. हे व्हिडिओ खोटे आणि अफवा पसरवून संबंधित कंपन्यांना फायदा मिळवून देणार असल्याचे सेबीचे मत आहे. सेबीने श्रेया गुप्ता, गौरव गुप्ता, सौरभ गुप्ता, पूजा अग्रवाल आणि वरुण एमसह इतर प्रवर्तकांवर बंदी घातली आहे.

काही कंपन्यांना गैरमार्गाने लाभ पोहचविण्यासाठी युट्यूब व्हिडिओ शेअर केल्याचे सेबीने स्पष्ट केले. या माध्यमातून 41.85 कोटींचा फायदा झाला. ही रक्कम जप्त करण्याचे आदेश सेबीने दिले आहेत. या संपूर्ण प्रकरणात अर्शद वारसीने 29.43 लाख रुपये कमावले असून त्याच्या पत्नीला 37.56 लाख रुपयांचा फायदा झाल्याचे सेबीने सांगितले. सेबीकडे याविषयीची तक्रार दाखल झाली होती. त्यानुसार, टीव्ही चॅनल साधना ब्रॉडकॉस्टच्या शेअरमध्ये काही संस्था हेराफेरी करत असल्याचे म्हटले होते. तसेच या संस्था शेअरची विक्रीही करत असल्याचे उघड झाले होते.

गुंतवणूकदारांना या कंपनीच्या शेअरमधून मोठा फायदा होईल, असे आमिष कथित युट्यूब चॅनलवरील व्हिडिओत दाखविण्यात आले होते. तक्रार आणि आरोपानंतर सेबीने याप्रकरणी एप्रिल ते सप्टेंबर 2022 दरम्यान तपास केला. एप्रिल ते जुलै, 2022 दरम्यान साधना ब्रॉडकॉस्टच्या शेअरमध्ये प्रचंड उलथापालथ झाल्याचे सिद्ध झाले. तसेच अचानक शेअरच्या किंमतींनी उसळी घेतल्याचे समोर आले. साधनाविषयी खोटी माहिती देऊन गुंतवणूकदारांना आमिष दाखविणारे दोन व्हिडिओ – ‘द एडवाइजर’ आणि ‘मनीवाइज’ या युट्यूब चॅनलवर (YouTube Channels) टाकण्यात आले.

या व्हिडिओनंतर साधनाच्या शेअरमध्ये तेजी दिसून आली. हा शेअर बाजाराच्या हिंदोळ्यावर दिसून आला. शेअरची खरेदी वाढली. गुंतवणूकदारांनी या शेअरमध्ये गुंतवणूक केली. त्याचवेळी काही व्यवस्थापनाशी संबंधित लोक आणि गैर-प्रवतर्कांनी उच्च किंमतीवर शेअरची विक्री केली आणि नफा कमविला. गुंतवणूकदारांना फसवून त्यांचा खिसा गरम केला. अदानी समूह साधना ब्रॉडकॉस्ट खरेदी करणार असल्याचा दावा कथित युट्यूब व्हिडिओत करण्यात आला होता. त्यामुळे या शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या पडल्या.

Follow Us
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले भर...
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले, भर चौकात...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर टार्गेटवर? धमकीच्या मेसेजने खळबळ
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून...
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून वकिलांना रोखलं, बाचाबाची...
अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
Chhagan Bhujbal : अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय..
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय हालचालींना वेग
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी,
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी, आता...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोरा...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोराची 12 तसांसनंतर सुटका
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण..
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण आमदारांना संधी
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात..
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात जाऊन उघड करणार नवी माहिती!
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट