
थेंबथेंब तळे साचे असं म्हणतात. तुम्ही आज काही शेअर्स घेऊन ठेवले आणि भविष्यात म्हणजे 10 ते 15 वर्षांनी त्याची किंमत बघितली तर ती खूप मोठी असू शकते. अर्थातच प्रत्येक गोष्टीला अपवाद असतातच पण तुम्हाला फायदा मात्र होऊ शकतो. आज आम्ही तुम्हाला अशाच एका शेअर्सविषयी माहिती सांगणार आहोत. याने तब्बल 179 पटीने परतावा दिला आहे.
शेअर बाजारातील गुंतवणूकदार नेहमीच चांगला परतावा देणाऱ्या शेअर्सच्या शोधात असतात आणि मल्टिबॅगर शेअर्स अनेकदा त्यांच्या यादीत टॉपवर असतात. शेअर गुंतवणुकीतून पुरेसा नफा मिळवण्यासाठी आपल्याला संयमाची आवश्यकता आहे. असाच एक शेअर ज्याने गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे. न्यूलँड लॅबोरेटरीज लिमिटेड असे या शेअरचे नाव आहे.
न्यूलँड लॅबोरेटरीज लिमिटेडच्या शेअरचा भाव सध्या 10,885.05 रुपयांवर आहे. हा शेअर 13 वर्षांत 61.60 रुपयांवरून सुमारे 17,757 टक्क्यांनी वधारला असून, या कालावधीत 179 पटीने परतावा मिळाला आहे. 13 वर्षांपूर्वी जर कोणी या शेअरमध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती तर आज त्याची किंमत 1.78 कोटी रुपये झाली असती.
न्यूलँड लॅबोरेटरीजच्या शेअरचा भाव गुरुवारी, 27 फेब्रुवारी रोजी एनएसईवर 6 टक्क्यांहून अधिक घसरून 10,885.05 रुपयांवर व्यवहार करत होता. न्यूलँड लॅबोरेटरीजचा शेअर गेल्या वर्षभरापासून अस्थिर आहे. परंतु या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना दीर्घकाळासाठी फायदा दिला आहे.
न्यूलँड लॅबोरेटरीजच्या शेअरची किंमत गेल्या 6 महिन्यांत 11 टक्क्यांहून अधिक घसरली आहे, तर गेल्या महिनाभरात 19 टक्क्यांनी घसरली आहे. वार्षिक आधारावर न्यूलँड लॅबोरेटरीजच्या शेअरची किंमत 14,294 रुपयांवरून 10,915 रुपये प्रति शेअर म्हणजेच 23.64 टक्क्यांनी घसरली आहे.
31 डिसेंबर 2024 रोजी संपलेल्या तिमाहीत न्यूलँडचा निव्वळ नफा घटून 57.24 कोटी रुपये झाला आहे, जो मागील तिमाहींच्या सरासरी पीएटीपेक्षा 13.3 टक्क्यांनी कमी आहे, जो मागील चार तिमाहींच्या सरासरी पीबीटीपेक्षा 19.6 टक्क्यांनी कमी आहे. न्यूलँड लॅबोरेटरीजने गेल्या पाच तिमाहीतील सर्वाधिक प्रति शेअर उत्पन्न (EPS) 78.75 रुपये नोंदवले आहे, जे वाढीव नफा आणि भागधारकांसाठी उच्च परतावा दर्शविते.
(डिस्क्लेमर: या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)