आता टोलनाका क्रॉस करताच कापले जाणार 10,000 रुपये, NHAI चा नवा नियम पाहा नाही तर दंड बसेल

NHAI Toll Plaza: वाहन विमा न घेता राष्ट्रीय महामार्गांवर प्रवास करणाऱ्यांवर एनएचएआय (NHAI) कारवाई करणार आहे.

आता टोलनाका क्रॉस करताच कापले जाणार 10,000 रुपये, NHAI चा नवा नियम पाहा नाही तर दंड बसेल
| Updated on: Nov 18, 2026 | 12:00 PM

Toll Plaza: रस्त्यावर गाडी चालवण्यापूर्वी आपण अनेकदा पेट्रोल टाकीकडे पूर्ण लक्ष देतो पण कागदपत्रांकडे नाही. विमा किंवा प्रदूषण प्रमाणपत्र कालबाह्य झाले आहे की नाही यावर क्वचितच लोक बारीक लक्ष ठेवतात त्याचा फटका आता बसण्याची शक्यता आहे. जर तुम्ही ही चूक करत असाल तर सावधान. कारण आता राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करताना तुमची निष्काळजीपणा महागात पडू शकतो. NHAI अर्थात भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने अशी हायटेक प्रणाली सुरू केली आहे ज्याच्या अंतर्गत तुम्ही टोल प्लाझा ओलांडताच काही मिनिटांत तुमच्या मोबाईलवर संदेश येईल. सिस्टीम कारचा नंबर वाचताच, ती थेट डेटाबेसमधून तुमची सर्व माहिती काढेल. जर विमा पॉलिसी कालबाह्य झाली असेल, तर तुम्हाला लगेच SSS मिळेल आणि चलन कापण्याची प्रक्रिया सुरू होईल. UER-II येथे असलेल्या मुंडका टोल प्लाझा येथे पायलट प्रोजेक्ट अंतर्गत याची चाचणी केली जात आहे.

नवीन प्रणाली अंतर्गत, राष्ट्रीय महामार्गावरील टोल प्लाझा ओलांडल्यानंतर काही मिनिटांत तुम्हाला एसएमएस अलर्ट मिळेल. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) ने दिल्लीतील UER-II वर स्थित मुंडका टोल प्लाझा येथे एक पथदर्शी प्रकल्प सुरू केला आहे, जो लवकरच देशभरात लागू केला जाईल. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, चाचणीचा उद्देश वाहन मालकांना वेळेवर विमा नूतनीकरण करण्यास प्रवृत्त करणे आहे. एखादे वाहन टोल प्लाझातून जाताच, त्याची माहिती NIC द्वारे संचालित वाहन डेटाबेससह सामायिक केली जाते, जेथे स्वयंचलित प्रणालीद्वारे विम्याची वैधता तपासली जाते.

Loading...

“जर पॉलिसीची मुदत संपली असेल किंवा वाहनाचा विमा भरला नसेल, तर मालकाला एसएमएस अलर्ट पाठवला जातो. त्यात नोंदणी क्रमांक, टोल क्रॉसिंगची वेळ आणि विम्याची मुदत संपल्याची माहिती असते. एसएमएसमध्ये एक्सपायरी तारीख नमूद केली जाते आणि वाहन मालकाला मोटार वाहन कायद्यांतर्गत दंड टाळण्यासाठी विमा नूतनीकरण करण्याचा सल्ला दिला जातो,” असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us