आता ATM कार्डशिवाय पैसे काढू शकता, SBI बँकेचं नवं अॅप

एटीएम कार्डच्या क्लोनिंगद्वारे बँक खात्यातून पैसे काढण्याच्या प्रकरणात वाढ झाली आहे. मात्र यावर आळा घालण्यासाठी आता बँकेकडून नवीन पद्धत वापरण्यात येत आहे. 

आता ATM कार्डशिवाय पैसे काढू शकता, SBI बँकेचं नवं अॅप

मुंबई : एटीएम कार्डच्या क्लोनिंगद्वारे बँक खात्यातून पैसे काढण्याच्या प्रकरणात वाढ झाली आहे. मात्र यावर आळा घालण्यासाठी आता बँकेकडून नवीन पद्धत वापरण्यात येत आहे. SBI बँकेने नवं अॅप लाँच केलं आहे. या अॅपच्या माध्यमातून तुम्ही एटीएम कार्डशिवाय सहज पैसे काढू शकता.

स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) एटीएम कार्डशिवाय पैसे काढण्यासाठी SBI YONO हे अॅप तयार केलं आहे. तसेच आयसीआयसीआय बँक आणि अॅक्सिस बँकेनेही आपल्या ग्राहकांसाठी कार्डलेस सुविधा सुरु केली आहे. SBI चे 16 हजार 500 कार्डलेस ATM पैसे काढण्यासाठी उपलब्ध करण्यात आले आहेत.

ATM कार्डशिवाय पैसे कसे काढाल?

SBI YONO स्टेट बँकेचा अॅप आहे. या अॅपच्या मदतीने तुम्ही कार्डशिवाय पैसे काढू शकता. सर्वात आधी SBI YONO अॅप डाऊनलोड करा. यानंतर तुम्ही नेटबॅकिंग यूजर आयडी आणि पासवर्ड किंवा मोबाईल बॅकिंग पर्सनल आयडेंटिफिकेशन नंबर डायल करुन लॉग ईन करा. यामध्ये टू-फॅक्टर ऑथेन्टिकेशन सर्व्हिस आहे. पैसे काढण्यासाठी तुम्हाला जवळच्या SBI एटीएममध्ये जावे लागेल.

  • तुम्हाला ट्रान्झॅक्शनसाठी 6 अंकाचा कॅश पिन मिळेल. जो तुम्हाला YONO अॅपमध्ये डायल करावा लागेल.
  • 6 अंकाचा रेफरन्स नंबर, जो तुम्हला एसएमएसच्या माध्यमातून मिळेल आणि तो तुम्हाला एटीएममध्ये टाकावा लागेल.

SBI YONO अॅप किंवा वेबसाईटमध्ये पैसे काढण्यासाठी तुम्हाला 6 अंकाचा YONO कॅश पिन डायल करावा लागेल. 6 अंकाचा रेफरन्स नंबर तुम्हाला एसएमएसच्या माध्यमातून मिळेल. 6 अंकाचा रेफरन्स नंबर तुम्हाला जवळच्या SBI ATM मध्ये जाऊन डायल करावा लागेल. तुम्हाला कार्डशिवाय पैसे काढण्याची प्रक्रिया 30 मिनिटात पूर्ण करावी लागेल. जर तुम्ही 30 मिनिटात प्रक्रिया पूर्ण केली नाही, तर तुमचा रेफरन्स कोड एक्सपायर होणार.

किती पैसे काढू शकता ?

तुम्ही डेबिट कार्डशिवाय कोणत्याही SBI ATM मधून सिंगल ट्रान्झॅक्शनमधून एकावेळेला कमीत कमी 500 रुपये आणि जास्तीत जास्त 10 हजार रुपये काढू शकता. दिवसभरामध्ये तुम्ही जास्तीत जास्त 20 हजार रुपये काढू शकता. सध्या SBI चे 16 हजार 500 ATM कार्डलेस पैसे काढण्यासाठी उपलब्ध आहेत.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *