T20 World Cup 2024 : युवराज सिंहचा मोठा सन्मान, आयसीसीकडून टी 20 वर्ल्ड कपसाठी मोठी जबाबदारी

Yuvraj Singh T20i World Cup 2024 : टीम इंडियाचा माजी ऑलराउंडर युवराज सिंह याचा आयसीसीने मोठा सन्मान केला आहे. आयसीसीने टी 20 वर्ल्ड कप 2024 साठी युवराज सिंहला मोठी जबाबदारी दिली आहे.

T20 World Cup 2024 : युवराज सिंहचा मोठा सन्मान, आयसीसीकडून टी 20 वर्ल्ड कपसाठी मोठी जबाबदारी
yuvraj singh and virat kohli,Image Credit source: icc
Follow us
| Updated on: Apr 26, 2024 | 5:23 PM

आयपीएलच्या 17 व्या मोसमादरम्यान क्रिकेट विश्वातून अतिशय मोठी आणि भारतासाठी अभिमानास्पद बातमी समोर आली आहे. आयसीसी टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेला अवघ्या काही दिवसांनी सुरुवात होणार आहे. आयसीसी टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेचं आयोजन हे 1 ते 29 जून दरम्यान अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये संयुक्तरित्या करण्यात आलं आहे. या स्पर्धेत एकूण 20 संघ सहभागी होणार आहेत. या 20 संघांना 5-5 नुसार 4 गटात विभागण्यात आलं आहे. या सर्व 20 संघांना वर्ल्ड कपसाठी आपल्या खेळाडूंची नावं 1 मे पर्यंत जाहीर करायची आहे. वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात कुणाला संधी मिळणार? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागून आहे. तसेच कुणाला संधी द्यायची आणि कुणाला वगळायंच? असा मोठा पेच निवड समितीसमोर आहे. अशात एक मोठी बातमी समोर आलीय.

टीम इंडियाचा माजी ऑलराउंडर सिक्स किंग युवराज सिंह याची टी 20 वर्ल्ड कप 2024 साठी ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आयसीसीने सोशल मीडियावर पोस्ट करत याबाबतची माहिती दिली आहे. तसेच युवराज व्यतिरिक्त वेस्ट इंडिजचा माजी सलामी फलंदाज ख्रिस गेल आणि वेगाचा बादशाह म्हणून ओळखला जाणारा उसेन बोल्ट या दोघांची याआधी ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

युवराजची पहिली प्रतिक्रिया

युवराजने त्याची ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्ती केल्यानंतर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. आयसीसीच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, “क्रिकेटच्या अनेक आठवणी आहेत. त्यापैकी काही आठवणी या टी 20 वर्ल्ड कपमधील आहेत. या आठवणींमध्ये एका ओव्हरमध्ये 6 सिक्स मारल्याच्या आठवणीचा समावेश आहे. त्यामुळे मी या वर्ल्ड कपचा एक भाग होण्यासाठी मी उत्साहीत आहे”, असं युवराजने म्हटलं.

आयसीसीने पहिल्यांदा 2007 साली टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेचं आयोजन दक्षिण आफ्रिकेत केलं होतं. तेव्हा भारताने अंतिम सामन्यात पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा धुव्वा उडवत वर्ल्ड कपवर नाव कोरलं होतं. या स्पर्धेत भारताच्या प्रत्येक खेळाडूने अविस्मरणीय कामगिरी केली होती. युवराज सिंहने इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात स्टुअर्ट ब्रॉडच्या बॉलिंगवर एका ओव्हरमध्ये 6 सिक्स ठोकण्याचा कारनामा केला होता. युवराजचे ते 6 सिक्स अजूनही प्रत्येक क्रिकेट चाहत्यांना चांगलेच लक्षात आहेत.

टीम इंडिया आणि टी 20 वर्ल्ड कप 2024

दरम्यान टीम इंडिया या टी 20 वर्ल्ड कप 2024 साठी ए ग्रुपमध्ये आहे. टीम इंडियासह या ग्रुपमध्ये अमेरिका, कॅनेडा, पाकिस्तान आणि आयर्लंडचा समावेश आहे. प्रत्येक संघ साखळी फेरीत 4 सामने खेळणार आहे. रोहित शर्मा टीम इंडियाचं या टी 20 वर्ल्ड कपमध्ये नेतृत्व करणार आहे.तर लवकरच भारतीय संघाची घोषणा केली जाणार आहे.

टीम इंडियाचं वर्ल्ड कप वेळापत्रक

विरुद्ध आयर्लंड, 5 जून

विरुद्ध पाकिस्तान, 9 जून

विरुद्ध अमेरिका, 12 जून

विरुद्ध कॅनेडा, 15 जून

Non Stop LIVE Update
पवारांना अस्वस्थ वाटत असल्याने कार्यक्रम रद्द, डॉक्टरांचा सल्ला काय?
पवारांना अस्वस्थ वाटत असल्याने कार्यक्रम रद्द, डॉक्टरांचा सल्ला काय?.
100 % नाराजी दूर... बावनकुळेंच्या भेटीनंतर दिनकर पाटलांची गोडसेंना साथ
100 % नाराजी दूर... बावनकुळेंच्या भेटीनंतर दिनकर पाटलांची गोडसेंना साथ.
नाटक फ्लॉप गेलं तर लोकं पुन्हा ते..., फडणवीसांचा अमोल कोल्हेंवर घणाघात
नाटक फ्लॉप गेलं तर लोकं पुन्हा ते..., फडणवीसांचा अमोल कोल्हेंवर घणाघात.
ठाकरेंनी माझ्यासोबत गद्दारी केली; नाराज नेत्याचा शिंदे गटात प्रवेश
ठाकरेंनी माझ्यासोबत गद्दारी केली; नाराज नेत्याचा शिंदे गटात प्रवेश.
बारामतीतील मतदानाच्या एकदिवस आधी सुप्रिया सुळेंचं निवडणूक आयोगाला पत्र
बारामतीतील मतदानाच्या एकदिवस आधी सुप्रिया सुळेंचं निवडणूक आयोगाला पत्र.
नकली शिष्य, दिघेंनी सांगूनही राजीनामा... शिंदेंचे विचारेंवर गंभीर आरोप
नकली शिष्य, दिघेंनी सांगूनही राजीनामा... शिंदेंचे विचारेंवर गंभीर आरोप.
कोंबडी विकता-विकता शिवसेनेत... राणेंवर पलटवार करत कुणाची खोचक टीका?
कोंबडी विकता-विकता शिवसेनेत... राणेंवर पलटवार करत कुणाची खोचक टीका?.
रोहित पवार स्वतः गुंड...कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणाची टीका?
रोहित पवार स्वतः गुंड...कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणाची टीका?.
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?.
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं.