Kolhapur Local Body Elections : नादच खुळा… निकालाआधीच कोल्हापुरात झळकले विजयाचे बॅनर, कागलमध्ये कुणाची चर्चा?
कोल्हापूरच्या कागल शहरात नगरपरिषद निवडणुकीच्या निकालापूर्वीच उमेदवारांच्या अभिनंदनाचे बॅनर झळकले आहेत. हसन मुश्रीफ आणि समरजित घाटगे यांच्या एकत्रित आघाडीतील उमेदवारांच्या विजयाचा उल्लेख या बॅनरवर आहे. एकेकाळी कट्टर विरोधक असलेले मुश्रीफ आणि घाटगे या निवडणुकीमुळे एकत्र आल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.
कोल्हापूरच्या कागल शहरात नगरपरिषद निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात होण्यापूर्वीच विजयाच्या अभिनंदनाचे फलक (बॅनर) लागल्याचे दिसून आले आहे. कागल शहरातील विविध भागांत लावण्यात आलेल्या या बॅनरवर हसन मुश्रीफ आणि समरजित घाटगे यांच्या एकत्रित आघाडीतील उमेदवारांच्या विजयाचा उल्लेख असून, गुलालाची उधळणही करण्यात आली आहे. या निवडणुकीत माजी कट्टर विरोधक असलेले मंत्री हसन मुश्रीफ आणि समरजित घाटगे यांनी एकत्र येत आघाडी केली होती. या आघाडीने कमाल केल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीने हे दोघे एकत्र आल्याचे बोलले जात आहे. मतमोजणी सकाळी १० वाजता सुरू होणार असली तरी, त्याआधीच विजयाचे बॅनर लागल्याने हा प्रकार चर्चेचा विषय बनला आहे.
नादच खुळा...निकालाआधी कोल्हापुरात विजयाचे बॅनर, कागलमध्ये कुणाची चर्चा
शेतकऱ्यांवर किडनी विकण्याची वेळ, आंतरराष्ट्रीय रॅकेटचा पर्दाफाश
धर्माबादमध्ये मतदाराना मंगल कार्यालयात डांबलं, पैसे वाटपापूर्वीच पळापळ
कोण उधळणार गुलाल? 288 नगरपरिषदा, नगरपंचायतींचा निकाल पाहा एका क्लिकवर

