International Kidney Racket : शेतकऱ्यांवर किडनी विकण्याची वेळ, आंतरराष्ट्रीय रॅकेटचा पर्दाफाश, महाराष्ट्रातून कंबोडियापर्यंत जाळे
कर्ज आणि सावकारीच्या जाचातून त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांवर किडनी विकण्याची वेळ आली आहे. चंद्रपूर येथील रोशन कुळे या शेतकऱ्यासह अनेकजण आंतरराष्ट्रीय किडनी रॅकेटचे बळी ठरले आहेत. महाराष्ट्र ते कंबोडियापर्यंत पसरलेल्या या रॅकेटमध्ये पाच ते सहा शेतकऱ्यांनी किडनी विकल्याचे उघड झाले आहे. सरकारने एसआयटी स्थापन करून पाच सावकारांना अटक केली आहे.
महाराष्ट्रातील शेतकरी कर्ज आणि अतिवृष्टीमुळे त्रस्त असताना, त्यांच्यावर सावकारी जाचातून किडनी विकण्याची वेळ आली आहे. चंद्रपूर येथील रोशन कुळे यांच्यासह जवळपास पाच ते सहा जणांनी कंबोडियामध्ये किडनी विकल्याचे समोर आले आहे. यामागे महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल ते थेट कंबोडियापर्यंत पसरलेले आंतरराष्ट्रीय रॅकेट सक्रिय असल्याचे उघड झाले आहे. रोशन कुळे यांनी सावकाराकडून घेतलेल्या एक लाख रुपयांच्या कर्जापोटी सावकाराने ७४ लाख रुपयांची मागणी केल्याने त्यांना परदेशात जाऊन किडनी विकावी लागली. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन सरकारने विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केले आहे. या प्रकरणी आतापर्यंत पाच सावकारांना अटक करण्यात आली असून, मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत.
शेतकऱ्यांवर किडनी विकण्याची वेळ, आंतरराष्ट्रीय रॅकेटचा पर्दाफाश
धर्माबादमध्ये मतदाराना मंगल कार्यालयात डांबलं, पैसे वाटपापूर्वीच पळापळ
कोण उधळणार गुलाल? 288 नगरपरिषदा, नगरपंचायतींचा निकाल पाहा एका क्लिकवर
VIDEO: BJP आमदारानं रिक्षाचालकाच्या लगावली कानशिलात, नेमकं घडलं काय?

