LIVE Vote Counting of Maharashtra Nagar Palika Election Results 2025 : उत्साह शिगेला! कौल कोणाला? 246 नगरपरिषद, 42 नगरपंचायतींचे निकाल टीव्ही9 मराठीच्या वेबसाईटवर बघा लाईव्ह
Watch LIVE Vote Counting of Maharashtra Local Body Election Results 2025 : महाराष्ट्रातील 288 नगरपालिका, नगरपरिषदा आणि नगरपंचायतींचे निकाल आज जाहीर होत आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीतील घटक पक्ष अनेक ठिकाणी एकमेकांविरुद्ध लढले. महापालिका निवडणुकांसाठी हे निकाल महत्त्वाचे मानले जात आहेत, कारण यातून राज्यातील नंबर वन पक्ष कोण हे स्पष्ट होईल. मतमोजणी सुरू असून उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
महाराष्ट्रातील एकूण 288 नगरपालिका, नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीचे निकाल आज (21 डिसेंबर) जाहीर होणार आहेत. पहिल्यांदाच महायुतीतील भाजप, शिंदे गटाची शिवसेना आणि अजित पवार गटाची राष्ट्रवादी अनेक ठिकाणी एकमेकांविरुद्ध रिंगणात उतरले. त्याचप्रमाणे महाविकास आघाडीतही अशीच स्थिती दिसून आली.
राज्यातील 29 महापालिकांसाठी 15 जानेवारीला मतदान होणार आहे. त्यामुळे नगरपालिका निवडणुकीचे निकाल महापालिका निवडणुकांसाठी रंगीत तालीम म्हणून पाहिले जात आहेत. तसेच राज्यातील नंबर वन पक्ष कोणता, याचाही फैसला या निकालातून होईल.
Party/Alliance Wise Maharashtra Nagar Palika Election Results LIVE
या 288 नगरपालिकांसाठी दोन टप्प्यात मतदान घेण्यात आले. पहिल्या टप्प्यात 2 डिसेंबरला 265 ठिकाणी, तर दुसऱ्या टप्प्यात 20 डिसेंबरला उर्वरित 23 ठिकाणी मतदान पार पडले. त्यानंतर आज सकाळपासून ईव्हीएम मशिन्स उघडून मतमोजणी सुरू होईल.
दरम्यान, काही ठिकाणी निवडणुका अत्यंत चुरशीच्या झाल्या. महायुतीतील तीनही पक्ष एकमेकांविरुद्ध उभे ठाकल्याने खरी स्पर्धा भाजप आणि शिंदे शिवसेनेत दिसली. त्यामुळे कोण बाजी मारणार, याची प्रचंड उत्सुकता आहे! राज्यातील छोट्या शहरांमधील जनतेचा कौल कोणाच्या बाजूने आहे, याचा स्पष्ट चित्र आज समोर येईल. त्यामुळेच या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या संपूर्ण निकालाच्या दिवसभरातील घडामोडी तुम्हाला टीव्ही9 मराठीच्या वेबसाईटवर लाईव्ह बघता येणार आहेत.
भाजपला मोठा धक्का, फुलंब्रीमध्ये उद्धव ठाकरे यांची सेना आघाडीवर
साताऱ्यातील मतमोजणीत दोन्ही राजेंना धक्का तर 3 अपक्ष आघाडीवर
मतमोजणीत महायुती आघाडीवर, भाजप नंबर 1, 100 चा आकडा पार
बारामतीत अजित पवार vs शरद पवार संघर्ष, दोन्ही गटांची प्रतिष्ठा पणाला

