AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PANCARD: पॅनकार्डसाठी 4 नवीन फॉर्म, मग कोणता भरणार? 93, 94, 95 की 96? समजून घ्या नियम

Pancard New Form 93, 94, 95 and 96: भारतात अनेक बदल होत आहेत. पॅनकार्ड काढण्यासाठी नवीन अर्ज आले आहेत. आर्थिक वर्ष 2026-27 साठी नवीन 93, 94, 95 आणि 96 फॉर्म लागू करण्यात आले आहेत. यातील तुम्हाला कोणता अर्ज भरावा लागेल. कशी आहे अर्जाची प्रक्रिया, जाणून घ्या.

PANCARD: पॅनकार्डसाठी 4 नवीन फॉर्म, मग कोणता भरणार? 93, 94, 95 की 96? समजून घ्या नियम
पॅनकार्ड नवीन अर्जImage Credit source: टीव्ही ९ नेटवर्क
| Updated on: Apr 09, 2026 | 1:54 PM
Share

Pancard New Form 93, 94, 95 and 96: आता 1 एप्रिल 2026 नंतर पॅनकार्ड तयार करायचे असेल तर मोठे बदल झाले आहेत. केंद्र सरकारने जुने अर्ज पद्धती बाद केली आहे. नवीन पॅन कार्ड काढण्यासाठी आता चार नवीन फॉर्म, अर्ज आले आहेत. अर्थात प्रत्येक श्रेणीसाठी वेगळा अर्ज आहे. 93, 94, 95 आणि 96 असे चार अर्ज लागू करण्यात आले आहेत. विविध श्रेणीतील लोकांसाठी पॅनकार्डची प्रक्रिया अत्यंत सोपी आणि सहज झाली आहे. सर्वसामान्य नागरिकांसाठी कोणता अर्ज आहे आणि त्याची प्रक्रिया हे समजून घ्या.

कोणता अर्ज कोणासाठी?

Form 93- हा अर्ज भारतीय नागरिकांसाठी आहे

Form 94- भारतातील नोंदणीकृत कंपन्यांसाठी आणि संस्थासाठी

Form 95- परदेशातील नागरिकांना या अर्जाआधारे पॅनकार्ड काढता येईल

Form 96- परदेशात नोंदणीकृत कंपन्या आणि संस्थांसाठी

यापूर्वी जुन्या पद्धतीत पॅनकार्ड काढण्यासाठी केवळ दोन अर्ज होते. Form 49A हा भारतीय नागरिक आणि कंपन्यांसाठी होता. तर Form 49AA हा परदेशी नागरिक आणि परदेशी कंपन्यांसाठी होता. आता हे दोन्ही अर्ज बाद करण्यात आले आहेत. त्याच्या जागी चार नवीन फॉर्म उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यामुळे प्रक्रिया सुटसुटीत आणि सोपी होईल.

नवीन पॅनकार्डच्या फॉर्ममध्ये मोठे बदल

नवीन पॅनकार्ड फॉर्म हा पूर्वीपेक्षा अधिक सोपा आणि स्पष्ट झाला आहे. प्रत्येक अर्जात केवळ त्या श्रेणीची महत्त्वाचीच माहिती मागवली जाणार आहे. त्यामुळे हा अर्ज भरणे अगदी सोपे होईल. आता प्रत्येक अर्जदाराला मोबाईल क्रमांक आणि ईमेल देणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामुळे अर्जदाराची माहिती लवकर अपडेट केली जाईल. तर फोटोची साईजही वाढवण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना आणि संस्थांना मनस्ताप होणार नाही.

या अर्जप्रणालीत काय काय बदल?

भारतीय अर्जदारांसाठी काही खास बदल करण्यात आले आहेत.

अर्जदाराला आता संपूर्ण नाव लिहावे लागेल.

आधारकार्डवरील नावाशी हे नामसाधर्म्य असणे आवश्यक आहे.

नागरिकांना त्यांचा कायमचा पत्ताही नोंदवावा लागेल.

पॅन कार्ड आता कार्यालयीन पत्त्यावरही मागवता येईल.

त्यासाठी अतिरिक्त पुरावा मात्र जोडावा लागेल.

Follow Us
फडणवीस बोलले, महायुती म्हणून एकत्र लढू; शिंदेंचा मात्र अपक्षाला खुला..
Mahayuti : फडणवीस बोलले, महायुती म्हणून एकत्र लढू; शिंदेंचा मात्र अपक्षाला खुला पाठिंबा, नेमकं प्रकरण काय?
दिल्लीत आज सीजेपीची लहरा दो तिरंगा रॅली; रॅलीकडे....
CJP Tiranga Rally : दिल्लीत आज सीजेपीची लहरा दो तिरंगा रॅली; रॅलीकडे देशाचं लक्ष
ज्ञानेश कुमार मोदींना काय देतात? अभिजीत दिपकेंचा थेट सवाल
Abhijeet Dipke : ज्ञानेश कुमार मोदींना काय देतात? अभिजीत दिपकेंचा थेट सवाल, दिल्लीचं रूपांतर...
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिर...
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिरांबाबतही नवे नियम
शेअर बाजारात जिओचा धमाका! 30 हजार कोटींचा IPO आणण्याची तयारी,
शेअर बाजारात जिओचा धमाका! 30 हजार कोटींचा IPO आणण्याची तयारी, नेमकं टार्गेट किती?
दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यासाठी नवे नियम, हायकोर्टाकडून...
दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यासाठी नवे नियम, हायकोर्टाकडून तातडीचे आदेश
दुष्काळात मदतीवरून विरोधकांच्या टीकेला राज्य सरकारचे प्रत्युतर
महाराष्ट्र दुष्काळ मदतीवरून विरोधकांच्या टीकेला राज्य सरकारचे पुराव्यांसोबत प्रत्युत्तर; कर्नाटकमधील आकडेवारीसह...
हे काय? शहादा नगरपालिका गुजरातमध्ये हलवा; नंदुरबारमधील नगराध्यक्ष...
हे काय? शहादा नगरपालिका गुजरातमध्ये हलवा; नंदुरबारमधील नगराध्यक्षांची मोठी मागणी, नेमकं कारणही सांगितलं
तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा! महाराष्ट्रात सुटे मसले खरेदी करताना...
तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा! महाराष्ट्रात सुटे मसले खरेदी करताना... नवे नियम काय?
दिल्लीतील आंदोलनावरून CJP आक्रमक; अभिजीत दीपकेंची पत्रकार परिषद,
दिल्लीतील आंदोलनावरून CJP आक्रमक; अभिजीत दीपकेंची पत्रकार परिषद, सरकारला घेरलं...