Rupay कार्डने पेमेंट सुरक्षित राहणार, NPCI कडून टोकनायझेशन सिस्टम लाँच

| Updated on: Oct 21, 2021 | 8:31 AM

निवेदनात असेही म्हटले आहे की, आरबीआयच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार सुरक्षित व्यवहार सुलभ करण्यासाठी ग्राहकांची संवेदनशील माहिती एन्क्रिप्टेड 'टोकन' स्वरूपात साठवली जाईल. हे टोकन ग्राहकांचे तपशील उघड न करता पेमेंट करण्याची परवानगी देईल. RBI च्या अलीकडील COF टोकनायझेशन मार्गदर्शक तत्त्वांमध्ये मूळ कार्ड डेटा एन्क्रिप्टेड डिजिटल टोकनसह बदलणे अनिवार्य आहे.

Rupay कार्डने पेमेंट सुरक्षित राहणार, NPCI कडून टोकनायझेशन सिस्टम लाँच
Follow us on

नवी दिल्ली : देशात डिजिटल पेमेंटचा झपाट्याने विस्तार होत आहे. त्याचबरोबर कार्डच्या तपशीलांच्या सुरक्षेला प्रोत्साहन देण्यासाठी नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने बुधवारी रुपे कार्डसाठी टोकनायझेशन सिस्टीम सुरू करण्याची घोषणा केली. NPCI ने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, NPCI टोकनायझेशन सिस्टीम (NTS) व्यापाऱ्याकडे कार्ड तपशील संग्रहित करण्याच्या पर्यायाच्या रूपात असेल. यामुळे वापरकर्त्यांच्या कार्डांची सुरक्षा वाढेल आणि त्यांना खरेदीचा अधिक चांगला अनुभव मिळेल.

टोकनद्वारे पेमेंट केले जाणार

निवेदनात असेही म्हटले आहे की, आरबीआयच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार सुरक्षित व्यवहार सुलभ करण्यासाठी ग्राहकांची संवेदनशील माहिती एन्क्रिप्टेड ‘टोकन’ स्वरूपात साठवली जाईल. हे टोकन ग्राहकांचे तपशील उघड न करता पेमेंट करण्याची परवानगी देईल. RBI च्या अलीकडील COF टोकनायझेशन मार्गदर्शक तत्त्वांमध्ये मूळ कार्ड डेटा एन्क्रिप्टेड डिजिटल टोकनसह बदलणे अनिवार्य आहे.

अलीकडे व्हिसा कार्ड-ऑन-फाईल टोकनायझेशन सुरू

अलीकडेच जागतिक पेमेंट टेक्नॉलॉजी कंपनी व्हिसा (VISA) ने भारतात कार्ड-ऑन-फाईल टोकनायझेशन सेवा सुरू केली. जुस्पेच्या भागीदारीत याची सुरुवात झाली. उद्योग तज्ज्ञांच्या मते, यामुळे संवेदनशील कार्ड तपशीलांचा धोका कमी होतो, कारण ट्रांझिटमध्ये ‘इन-रेस्ट’ आणि ‘इन-यूज’ टप्प्यांमध्ये फक्त टोकन असतात.

रुपे कार्ड परदेशात लाँच केल्याचे फायदे

रुपे हे भारतापुरतं मर्यादित असल्याने एखादा ग्राहक दुबईला पर्यटनासाठी गेल्यास त्याला रुपेचा वापर करणं शक्य नव्हतं. सिंगापूर, भूटान या देशांमध्येही पर्यटकांना मोठ्या प्रमाणात फायदा होत आहे. दुबईला पर्यटनासाठी जाणाऱ्या भारतीयांची संख्या जास्त आहे, शिवाय मालदीव हे देखील भारतीयांचं पर्यटनासाठी आवडतं ठिकाण आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात मालदीवमध्येही रुपे सुरू झाले आहे.

राष्ट्रीय सुरक्षा

2014 मध्ये रशियाने युक्रेनमधील एका मोठ्या भागावर कब्जा केला. त्यावेळी अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी रशियावर सँक्शन्स लादले. परिणामी अमेरिकन कार्ड कंपन्यांनीही रशियन ग्राहकांचे ट्रान्जॅक्शन थांबवले. त्यामुळे स्वतःकडे कार्ड असूनही रशियातील लोकांना त्याचा वापर करता आला नाही. यामध्ये मोठा काळ गेला आणि पैसे असूनही त्याचा वापर न करता आल्याने ग्राहकांना संकटाला सामोरं जावं लागलं. आंतरराष्ट्रीय राजकारणात राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने रुपे हे भारतासाठी अत्यंत महत्त्वाचं पाऊल मानलं जातं. कारण, आतापर्यंत अमेरिकन कंपन्यांचं वर्चस्व असलेल्या कार्ड क्षेत्रात रुपेचंही वर्चस्व निर्माण झालं आहे. ग्राहकांना अत्यंत कमी शुल्कामध्ये हे कार्ड अनेक सोयी उपलब्ध करुन देतं. याशिवाय परदेशातील काही महत्त्वाच्या पर्यटनस्थळावरही हे कार्ड आता चालणार आहे.

संबंधित बातम्या

ब्रिटनने फेसबुकला 500 कोटींपेक्षा जास्त दंड ठोठावला, जाणून घ्या कारण

पीएम मोदींची मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसोबत बैठक; पेट्रोल अन् डिझेलच्या किमती कमी होणार?

Payment with Rupay Card will be secure, NPCI launches tokenization system