AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Petrol-Diesel Price : आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑईल वाढले, पेट्रोल-डिझेलच्या किंमती भडकणार?

Petrol-Diesel Price : पेट्रोल-डिझेलच्या किंमती पुन्हा रडवणार का?

Petrol-Diesel Price : आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑईल वाढले, पेट्रोल-डिझेलच्या किंमती भडकणार?
किंमती भडकणार?
| Updated on: Jan 13, 2023 | 8:44 AM
Share

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या भावात (Crude Oil Price) जोरदार वाढ झाली आहे. गेल्या कित्येक महिन्यांपासून चढउतार होत असले तरी कच्च्या तेलाच्या किंमती आटोक्यात होत्या. एकवेळ तर भाव नीच्चांकी स्तरावर पोहचले होते. पण भारतात त्याचा काही परिणाम झाला नाही. गेल्या एप्रिल महिन्यापासून देशातंर्गत पेट्रोल-डिझेलचे भाव (Petrol-Diesel Rate) स्थिर आहेत. त्यात उत्पादन शुल्कात (Excise Duty) कपातीचा निर्णय केंद्राने घेतला. मे महिन्यात घेतलेल्या निर्णयामुळे दर कमी झाले. पण आता आंतरराष्ट्रीय स्तरावर दरवाढीचा भारतावर परिणाम होतो का? हे लवकरच दिसेल. अजून तेल कंपन्यांनी याविषयीची अधिकृत घोषणा केलेली नाही.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल 2 टक्क्यांनी वाढले आहे. या दोन टक्के भाव वाढीचा परिणाम पेट्रोल-डिझेलच्या किंमतीवर परिणाम दिसून येईल. तेल विपणन कंपन्यांनी (OMCs) 13 जानेवारी रोजी पेट्रोल-डिझेलच्या किंमती (Petrol-Diesel Price)अपडेट केल्या आहेत. 22 मे पासून देशात पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत.

प्रत्येक दिवशी तेल विपणन कंपन्या सकाळी 6 वाजता पेट्रोल-डिझेलचे भाव अपडेट करतात. देशातील तेल कंपन्या पेट्रोल-डिझेलचे भाव जाहीर करतात. सकाळी 6 वाजेनंतर हे भाव ग्राहकाला कळू शकतात. गेल्या कित्येक दिवसांपासून भावात कुठलाही परिणामकारक बदल झालेला नाही.

पेट्रोल-डिझेलच्या भावात उत्पादन शुल्क, डीलरचे कमिशन, स्थानिक कर वॅट आणि इतर कर जोडले जाते. सर्व करासह पेट्रोल-डिझेलच्या किंमती जाहीर करण्यात येतात. आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमतीचा विचार करता करांच्या बोजामुळे देशातंर्गत किंमती वाढल्या आहेत. त्याचा बोजा नागरिकांना सहन करावा लागतो.

पेट्रोल-डिझेलचे रोजचे दर तुम्ही एसएमएसद्वारे (How to check diesel petrol price daily through SMS) जाणून घेऊ शकता. इंडियन ऑईलच्या ग्राहकांनी RSP असे लिहून 9224992249 या क्रमांक पाठवल्यास त्याला आजचे नवीन दर कळतील. त्यासाठी पेट्रोल पंपावर जायची गरज नाही.

तर बीपीसीएलच्या ग्राहकांनाही घरबसल्या त्याच्या मोबाईलवर भाव कळू शकतात. त्याने मोबाईल मॅसेजमध्ये RSP लिहून हा मॅसेज 9223112222 या क्रमांकावर पाठवावा. त्यानंतर कंपनी त्याला एसएमएसद्वारे (SMS) आजचे अपडेट दर कळवेल. एचपीसीएल ग्राहकांना HPPrice असे लिहून 9222201122 या क्रमांकावर एसएमएस करावा लागेल.

इंधन दरावाढीविरोधात नागरिकांनी रोष व्यक्त केल्यानंतर केंद्रातील भाजपने आणि भाजप शासित राज्यांनी पेट्रोल-डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात केली होती. पण आंतरराष्ट्रीय बाजारात किंमती कमी असताना त्याचा भारतीय ग्राहकांना फायदा झालेला नाही.

Follow Us
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; पोलिसांची परवानगी
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; पोलिसांची परवानगी नाकारली, तरी राहुल गांधींसह अनेक नेते सहभागी
दिल्लीत इंडिया आघाडीचा एल्गार; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी...
दिल्लीत इंडिया आघाडीचा एल्गार; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक पुन्हा रस्त्यावर!
आमचं आंदोलन म्हणजे...; राहुल गांधींचं ते वक्तव्य चर्चेत, म्हणाले...
Rahul Gandhi : आमचं आंदोलन म्हणजे...; राहुल गांधींचं ते वक्तव्य चर्चेत, म्हणाले...
ठाकरे सेनेचे नगरसेवक आणि स्थानिकांमध्ये हाणामारी; नेमकं काय घडलं?
Shivsena Ubt : ड्रेनेज लाईनच्या पाहणीदरम्यान ठाकरे सेनेचे नगरसेवक आणि स्थानिकांमध्ये हाणामारी; नेमकं काय घडलं?
ज्ञानेश कुमारांना सरकार का वाचवतंय? राहुल गांधींचा मोदी सरकारला सवाल
Rahul Gnadhi : ज्ञानेश कुमारांना सरकार का वाचवतंय? राहुल गांधींचा मोदी सरकारला सवाल; २०० अधिकारी...
भाडोत्री गुंडांना पोलिसांचा गणवेश... आंदोलनावरून राऊतांचा गंभीर आरोप
Sanjay Raut : भाडोत्री गुंडांना पोलिसांचा गणवेश अन्... दिल्लीतील आंदोलनावरून संजय राऊतांचा गंभीर आरोप
संविधानाची गोष्ट करता, पण… सरन्यायाधीशांच्या मुद्द्यावरून फडणवीसांचा..
Devendra Fadnavis : संविधानाची गोष्ट करता, पण… सरन्यायाधीशांच्या मुद्द्यावरून फडणवीसांचा विरोधकांना सवाल
सीजेपी आंदोलन भोवलं; आदित्य-अमित ठाकरेसह संदीप देशपांडे यांच्यावर.....
CJP Protest : सीजेपी आंदोलन भोवलं; आदित्य-अमित ठाकरेसह संदीप देशपांडे यांच्यावर.....
राज ठाकरे स्वतः स्वाक्षरी मोहिमेत सहभागी होणार! ज्ञानेश कुमार....
Raj Thackeray : MNS : राज ठाकरे स्वतः स्वाक्षरी मोहिमेत सहभागी होणार! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसेचा पुढाकार
वर्षा निवासस्थानी दुष्काळ बैठक, पण दोन्ही उपमुख्यमंत्री अनुपस्थित...
CM Devendra Fadnavis : वर्षा निवासस्थानी दुष्काळ बैठक, पण दोन्ही उपमुख्यमंत्री अनुपस्थित; निमंत्रण नव्हतं की....