Petrol Diesel Price Today : महाराष्ट्रातील सर्वात महाग पेट्रोल परभणीत, मुंबई, पुण्यासह इतर शहरात पेट्रोल-डिझेलचे नवे दर काय?

महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात पेट्रोल हे 95 रुपयांच्या पुढे विकले जात असल्याने ग्राहकांना आर्थिक भुर्दंड बसत आहे.(Petrol Diesel Price Today on 09 April 2021 latest price Update fuel rates)

Petrol Diesel Price Today : महाराष्ट्रातील सर्वात महाग पेट्रोल परभणीत, मुंबई, पुण्यासह इतर शहरात पेट्रोल-डिझेलचे नवे दर काय?
पेट्रोल आणि डिझेल
Follow us
| Updated on: Apr 09, 2021 | 7:07 AM

मुंबई : पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत दररोज सातत्याने चढ-उतार होत असतात. गेल्या सात दिवसांपासून मुंबईसह महाराष्ट्रातील पेट्रोलसह डिझेलचे दर हे जैसे थे पाहायला मिळत आहे. पेट्रोल डिझेलच्या किंमतीत कोणताही बदल झालेला दिसत नाही. त्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. मात्र तरीही महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात पेट्रोल हे 95 रुपयांच्या पुढे विकले जात असल्याने ग्राहकांना आर्थिक ताण जाणवत आहे.(Petrol Diesel Price Today on 09 April 2021 latest price Update fuel rates)

दररोज सकाळी 6 च्या दरम्यान तेल कंपन्यांकडून पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जारी केले जातात. Goods Return या वेबसाईटने आज पेट्रोल-डिझेलचे दर जारी केले आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतींचा परिणाम आवश्यक गोष्टींवर होतो. त्यामुळे सर्वसामान्यांचे लक्ष दररोज बदलणाऱ्या पेट्रोल डिझेलच्या किंमतीवर असते. आज पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत काहीही बदल झालेला नाही. या दोन्हींचे दर गेल्या सात दिवसांपासून स्थिर असल्याचे पाहायला मिळत आहेत. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

राज्यातील सर्वात महाग पेट्रोल कुठे?

महाराष्ट्रातील सर्वात महाग पेट्रोल हे परभणीत पाहायला मिळत आहे. परभणीमध्ये पेट्रोलचा दर हा 99.10 इतका आहे. त्यापाठोपाठ नांदेडमध्ये 98.66 रुपये किंमतीने पेट्रोलची विक्री होत आहे. त्याशिवाय परभणीत डिझेलची विक्री सार्वाधिक दराने होत आहे. परभणी शहरात डिझेलचा दर  88.66 रुपये इतका आहे. (Petrol Diesel Price Today on 09 April 2021 latest price Update fuel rates)

क्रमांक शहरे पेट्रोल (रुपये) डिझेल (रुपये)
1 अहमदनगर ₹ 96.67 ₹ 86.33
2 अकोला ₹ 96.85 ₹ 86.53
3 अमरावती ₹ 98.34 ₹ 89.35
4 औरंगाबाद ₹ 98.14 ₹ 89.12
5 भंडारा ₹ 97.51 ₹ 87.16
6 बीड ₹ 97.17 ₹ 86.81
7 बुलडाणा ₹ 97.76 ₹ 87.41
8 चंद्रपूर ₹ 97.23 ₹ 86.90
9 धुळे ₹ 96.90 ₹ 86.55
10 गडचिरोली ₹ 98.72 ₹ 88.33
11 गोंदिया ₹ 98.11 ₹ 87.74
12 मुंबई उपनगर ₹ 97.07 ₹ 88.05
13 हिंगोली ₹ 97.89 ₹ 87.53
14 जळगाव ₹ 98.03 ₹ 87.63
15 जालना ₹ 98.14 ₹ 87.74
16 कोल्हापूर ₹ 97.20 ₹ 86.85
17 लातूर ₹ 98.37 ₹ 87.98
18 मुंबई शहर ₹ 96.98 ₹ 87.96
19 नागपूर ₹ 96.98 ₹ 86.65
20 नांदेड ₹ 98.66 ₹ 88.25
21 नंदूरबार ₹ 97.66 ₹ 87.29
22 नाशिक ₹ 97.31 ₹ 86.94
23 उस्मानाबाद ₹ 97.81 ₹ 87.44
24 पालघर ₹ 97.20 ₹ 86.80
25 परभणी ₹ 99.10 ₹ 88.66
26 पुणे ₹ 96.89 ₹ 86.53
27 रायगड ₹ 96.61 ₹ 86.24
28 रत्नागिरी ₹ 97.70 ₹ 87.28
29 सांगली ₹ 97.14 ₹ 86.80
30 सातारा ₹ 97.36 ₹ 87.01
31 सिंधुदुर्ग ₹ 98.35 ₹ 87.97
32 सोलापूर ₹ 96.88 ₹ 86.55
33 ठाणे ₹ 97.13 ₹ 88.10
34 वर्धा ₹ 97.25 ₹ 86.91
35 वाशिम ₹ 97.57 ₹ 87.22
36 यवतमाळ ₹ 98.20 ₹ 87.82

दररोज 6 वाजता किमती बदलतात

दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमती बदलतात. नवीन दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होत असतात. पेट्रोल डिझेलच्या किमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते. परदेशी विनिमय दरासह आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूडचे दर काय आहेत, यावर पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज बदलत असतात.

पेट्रोल डिझेलचे दर अशा प्रकारे तपासा

एसएमएसद्वारे आपण पेट्रोल डिझेलची किंमत शोधू शकता. दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल डिझेलचे दर अद्ययावत केले जातात. इंडियन ऑईलच्या वेबसाइटनुसार, आपल्याला आरएसपीसह आपला शहर कोड टाइप करावा लागेल आणि 9224992249 या क्रमांकावर एसएमएस पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा कोड वेगळा आहे. आपण हे आयओसीएल वेबसाईटवरून पाहू शकता.

त्याच वेळी, आपल्या शहरातील पेट्रोल डिझेलची किंमत आपण बीपीसीएल ग्राहक RSP 9223112222 आणि एचपीसीएल ग्राहक यांना 9222201122 संदेश पाठवून जाणून घेऊ शकता. (Petrol Diesel Price Today on 09 April 2021 latest price Update fuel rates)

संबंधित बातम्या : 

Tigor पासून Harrier पर्यंत, Tata ‘या’ गाड्यांवर 65000 रुपयांची सूट

कोरोना संकटामुळे भारताचं प्रचंड नुकसान, देशाचा डेट-जीडीपी रेश्यो चक्क 90 टक्क्यांवर

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.