AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Petrol Diesel Price | मुंबई, नवी मुंबईसह अनेक शहरात पेट्रोलची शंभरी, महाराष्ट्रात इंधन दरवाढीचा नवा रेकॉर्ड, दर काय?

वाढत्या इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्यांना मोठा झटका बसला आहे. राज्यातील बहुतांश जिल्ह्यात पेट्रोलच्या किंमतीने शंभरी गाठली आहे. (Petrol Diesel Price Today 30 May 2021)

Petrol Diesel Price | मुंबई, नवी मुंबईसह अनेक शहरात पेट्रोलची शंभरी, महाराष्ट्रात इंधन दरवाढीचा नवा रेकॉर्ड, दर काय?
Petrol
| Updated on: May 30, 2021 | 9:03 AM
Share

मुंबई : देशात पेट्रोल -डिझेलच्या किंमतीचा उच्चांक गाठला आहे. वाढत्या इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्यांना मोठा झटका बसला आहे. राज्यातील बहुतांश जिल्ह्यात पेट्रोलच्या किंमतीने शंभरी गाठली आहे. तर डिझेलचा भाव हा 90 रुपयांवर पोहोचला आहे. नुकतंच देशातील तेल कंपन्यांनी नुकतंच पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी केले आहे. यात अनेक ठिकाणी पेट्रोलचे दर हे कमालीची वाढले आहेत. (Petrol Diesel Price Today 30 May 2021)

अवघ्या काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या पाच राज्यातील निवडणुकांदरम्यान पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर होते. मात्र 4 मे पासून इंधनाच्या दरात वाढ सुरु झाली. मे महिन्यात आतापर्यंत एकूण 16 दिवस पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ झाली आहे. मे महिन्यात पेट्रोलचा दर हा 3.59 रुपये प्रतिलीटर तर डिझेलचा दर हा 4.13 रुपये प्रतिलीटरने वाढला आहे.

देशातील प्रमुख शहरांमधील पेट्रोल-डिझेलचे दर

शहर                   पेट्रोल (रुपये/लीटर)  डीज़ल (रुपये/लीटर)
नवी दिल्‍ली 93.94 84.89
मुंबई 100.19 92.17
कोलकाता 93.97 87.74
चेन्‍नई 95.51 89.65
नोएडा  91.49 85.36
बंगळूर 97.07 89.99
हैदराबाद 97.63 92.54
पाटणा 96.10 90.16
जयपूर 100.44 93.66
लखनऊ 91.41 85.28
गुरुग्राम 91.79 85.47
चंदीगढ 90.36 84.55

पेट्रोल डिझेलचे नवे दर जारी

दररोज सकाळी 6 च्या दरम्यान तेल कंपन्यांकडून पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जारी केले जातात. Goods Return या वेबसाईटने आज पेट्रोल-डिझेलचे दर जारी केले आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतींचा परिणाम आवश्यक गोष्टींवर होतो. त्यामुळे सर्वसामान्यांचे लक्ष दररोज बदलणाऱ्या पेट्रोल डिझेलच्या किंमतीवर असते.

महाराष्ट्रातील जिल्ह्यांचे पेट्रोल-डिझेलचे दर

क्रमांक शहरे पेट्रोल (रुपये) डिझेल (रुपये)
1 अहमदनगर ₹ 100.25 ₹ 90.81
2 अकोला ₹ 100.09 ₹ 90.69
3 अमरावती ₹ 101.34 ₹ 91.89
4 औरंगाबाद ₹ 100.66 ₹ 91.21
5 भंडारा ₹ 101.01 ₹ 91.58
6 बीड ₹ 101.43 ₹ 91.97
7 बुलडाणा ₹ 101.43 ₹ 91.95
8 चंद्रपूर ₹ 100.22 ₹ 90.83
9 धुळे ₹ 100.66 ₹ 91.22
10 गडचिरोली ₹ 100.71 ₹ 91.30
11 गोंदिया ₹ 101.14 ₹ 91.70
12 मुंबई उपनगर ₹ 100.19 ₹ 92.17
13 हिंगोली ₹ 101.56 ₹ 92.11
14 जळगाव ₹ 100.83 ₹ 91.37
15 जालना ₹ 101.29 ₹ 91.82
16 कोल्हापूर ₹ 100.05 ₹ 90.65
17 लातूर ₹ 101.66 ₹ 92.19
18 मुंबई शहर ₹ 100.19 ₹ 92.17
19 नागपूर ₹ 100.02 ₹ 90.62
20 नांदेड ₹ 102.54 ₹ 93.04
21 नंदूरबार ₹ 101.35 ₹ 91.88
22 नाशिक ₹ 100.21 ₹ 90.77
23 उस्मानाबाद ₹ 100.67 ₹ 91.23
24 पालघर ₹ 100.14 ₹ 90.68
25 परभणी ₹ 102.27 ₹ 92.76
26 पुणे ₹ 99.82 ₹ 90.39
27 रायगड ₹ 99.77 ₹ 90.32
28 रत्नागिरी ₹ 101.47 ₹ 92.02
29 सांगली ₹ 100.45 ₹ 91.03
30 सातारा ₹ 100.58 ₹ 91.13
31 सिंधुदुर्ग ₹ 101.38 ₹ 91.92
32 सोलापूर ₹ 100.65 ₹ 91.22
33 ठाणे ₹ 99.89 ₹ 90.44
34 वर्धा ₹ 100.17 ₹ 90.76
35 वाशिम ₹ 100.61 ₹ 91.19
36 यवतमाळ ₹ 101.56 ₹ 92.11

दररोज 6 वाजता किमती बदलतात

दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमती बदलतात. नवीन दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होत असतात. पेट्रोल डिझेलच्या किमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते. परदेशी विनिमय दरासह आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूडचे दर काय आहेत, यावर पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज बदलत असतात.

पेट्रोल डिझेलचे दर अशा प्रकारे तपासा

एसएमएसद्वारे आपण पेट्रोल डिझेलची किंमत शोधू शकता. दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल डिझेलचे दर अद्ययावत केले जातात. इंडियन ऑईलच्या वेबसाइटनुसार, आपल्याला आरएसपीसह आपला शहर कोड टाइप करावा लागेल आणि 9224992249 या क्रमांकावर एसएमएस पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा कोड वेगळा आहे. आपण हे आयओसीएल वेबसाईटवरून पाहू शकता.

त्याच वेळी, आपल्या शहरातील पेट्रोल डिझेलची किंमत आपण बीपीसीएल ग्राहक RSP 9223112222 आणि एचपीसीएल ग्राहक यांना 9222201122 संदेश पाठवून जाणून घेऊ शकता.  (Petrol Diesel Price Today 30 May 2021)

संबंधित बातम्या : 

हायवेवर वाहन चालवण्यापूर्वी नवीन नियम जाणून घ्या, पैसे वाचणार आणि विनामूल्य प्रवास होणार

मुकेश अंबानींना एका दिवसात तब्बल 34,676 कोटी रुपयांचा नफा, नेमकं काय घडलं?

सोने अजूनही 8000 रुपयांनी स्वस्त; लग्नसराईत खरेदीची उत्तम संधी, झटपट तपासा 10 ग्रॅम सोन्याचा भाव

Follow Us
आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र
Sanjay Raut :आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र, FDAतील कथित गैरकारभारावर थेट सवाल
अजितदादा, तुमच्याविना यंदाचा गणेशोत्सव...; रोहित पवारांचं भावनिक ट्विट
Rohit Pawar : अजितदादा, तुमच्याविना यंदाचा गणेशोत्सव...; रोहित पवार यांचं भावनिक ट्विट चर्चेत
राज्यातील दुष्काळावर रोहित पवारांनी मांडली चिंताजनक आकडेवारी, म्हणाले
Rohit Pawar : सरकारी आकडेवारीपेक्षा परिस्थिती अधिक गंभीर?; राज्यातील दुष्काळावर रोहित पवारांनी मांडली चिंताजनक आकडेवारी
TMC पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी
TMC पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी; सुनावणीकडे देशाचं लक्ष
ह्या तारखेला मुंबईत CJP चं ज्ञानेश कुमारांच्या विरोधात जेल भरो आंदोलन
CJP : ....ह्या तारखेला मुंबईत CJP चं ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जेल भरो आंदोलन
केतन अग्रवाल प्रकरणात मोठी अपडेट; तुलाही केतनसारखं... प्रत्यक्षदर्शीला
Ketan Agarwal Case : केतन अग्रवाल प्रकरणात मोठी अपडेट; तुलाही केतनसारखं... प्रत्यक्षदर्शीला थेट..
मोबाईल रिचार्जबाबत TRAIचा मोठा निर्णय; 28 दिवसांचा प्लॅन बंद? आता...
TRAI : मोबाईल रिचार्जबाबत TRAIचा मोठा निर्णय; 28 दिवसांचा प्लॅन बंद? आता एवढ्या दिवसांची वैधता देणे कंपन्यांना बंधनकारक
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....