AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Petrol Diesel Price : ऐन महागाईत पेट्रोल-डिझेल स्वस्त की महागलं? वाचा आजचे ताजे दर

ऐन महागाईत इंधनांच्या वाढत्या किंमतींमुळे सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशाला कात्री लागत आहे. खरंतर, पेट्रोल-डिझेलच्या सातत्याने वाढत असलेल्या दरांमुळे अनेक रेकॉर्ड ब्रेक झाले होते.

Petrol Diesel Price : ऐन महागाईत पेट्रोल-डिझेल स्वस्त की महागलं? वाचा आजचे ताजे दर
| Edited By: | Updated on: Mar 14, 2021 | 6:54 AM
Share

मुंबई : देशभरातील पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत काही प्रमाणात घट होताना दिसत आहे. पण तरीही अनेक ठिकाणी पेट्रोल-डिझेलचे दर हे 95 रुपयांच्या पुढेच पाहायला मिळत आहे. त्यामुळे ऐन महागाईत इंधनांच्या वाढत्या किंमतींमुळे सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशाला कात्री लागत आहे. खरंतर, पेट्रोल-डिझेलच्या सातत्याने वाढत असलेल्या दरांमुळे अनेक रेकॉर्ड ब्रेक झाले होते. पण विशेष म्हणजे सलग 13 व्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत बदल होत नसल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.  (Petrol Diesel Price Today rates in mumbai pune delhi petrol price today on 14th march 2021)

दररोज सकाळी 6 च्या दरम्यान तेल कंपन्यांकडून पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जारी केले जातात. Goods Return या वेबसाईटने आज पेट्रोल-डिझेलचे दर जारी केले आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतींचा परिणाम आवश्यक गोष्टींवर होतो. त्यामुळे सर्वसामान्यांचे लक्ष दररोज बदलणाऱ्या पेट्रोल डिझेलच्या किंमतीवर असते. आज म्हणजेच रविवारीही पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये कोणताही बदल झालेला नाही.

राज्यातील सर्वात महाग पेट्रोल कुठे?

महाराष्ट्रातील सर्वात महाग पेट्रोल हे नांदेड शहरात पाहायला मिळत आहे. नांदेडमध्ये पेट्रोलचा दर हा 99.63 रुपये इतका आहे. त्यापाठोपाठ परभणीत 99.33 रुपये किंमतीने पेट्रोलची विक्री होत आहे. त्याशिवाय नांदेडमध्ये डिझेलची विक्री सार्वाधिक दराने होत आहे. नांदेड शहरात डिझेलचा दर 89.25 रुपये इतका आहे.

महाराष्ट्रातील काही शहरांमधील पेट्रोल-डिझेलचे दर 

क्रमांक शहरे पेट्रोल (रुपये) डिझेल (रुपये)
1 अहमदनगर ₹ 97.77 ₹ 87.45
2 अकोला ₹ 97.45 ₹ 87.16
3 अमरावती ₹ 98.82 ₹ 88.48
4 औरंगाबाद ₹ 98.24 ₹ 87.90
5 भंडारा ₹ 98.27 ₹ 87.95
6 बीड ₹ 98.88 ₹ 88.53
7 बुलडाणा ₹ 98.28 ₹ 87.96
8 चंद्रपूर ₹ 97.49 ₹ 87.21
9 धुळे ₹ 97.45 ₹ 87.14
10 गडचिरोली ₹ 98.60 ₹ 88.27
11 गोंदिया ₹ 98.86 ₹ 88.52
12 मुंबई उपनगर ₹ 97.62 ₹ 88.64
13 हिंगोली ₹ 98.26 ₹ 87.95
14 जळगाव ₹ 98.61 ₹ 88.25
15 जालना ₹ 98.93 ₹ 88.56
16 कोल्हापूर ₹ 98.04 ₹ 87.73
17 लातूर ₹ 98.90 ₹ 88.55
18 मुंबई शहर ₹ 97.57 ₹ 88.60
19 नागपूर ₹ 97.39 ₹ 87.11
20 नांदेड ₹ 99.63 ₹ 89.25
21 नंदूरबार ₹ 98.31 ₹ 87.98
22 नाशिक ₹ 97.90 ₹ 87.54
23 उस्मानाबाद ₹ 98.05 ₹ 87.73
24 पालघर ₹ 97.35 ₹ 87.01
25 परभणी ₹ 99.33 ₹ 88.94
26 पुणे ₹ 97.37 ₹ 87.06
27 रायगड ₹ 97.38 ₹ 87.04
28 रत्नागिरी ₹ 98.88 ₹ 88.51
29 सांगली ₹ 97.48 ₹ 87.19
30 सातारा ₹ 98.26 ₹ 87.90
31 सिंधुदुर्ग ₹ 98.94 ₹ 88.59
32 सोलापूर ₹ 98.10 ₹ 87.78
33 ठाणे ₹ 97.09 ₹ 86.76
34 वर्धा ₹ 97.87 ₹ 87.57
35 वाशिम ₹ 98.05 ₹ 87.74
36 यवतमाळ ₹ 98.87 ₹ 88.53

देशातील प्रमुख शहरांमधील पेट्रोलचे भाव

नवी दिल्ली (Delhi Diesel Price Today) :  91.17 रुपये प्रतिलीटर

मुंबई (Mumbai Diesel Price Today) : 97.57 रुपये प्रतिलीटर

कोलकाता (Kolkata Diesel Price Today) : 91.35 रुपये प्रतिलीटर

चेन्नई (Chennai Diesel Price Today) :  93.11 रुपये प्रतिलीटर

नोएडा (Noida Diesel Price Today) : 89.38 रुपये प्रतिलीटर

देशातील प्रमुख शहरांमधील डिझेलचे भाव

नवी दिल्ली (Delhi Diesel Price Today) : 81.47 रुपये प्रतिलीटर

मुंबई (Mumbai Diesel Price Today) : 88.60 रुपये प्रतिलीटर

कोलकाता (Kolkata Diesel Price Today) : 84.35 रुपये प्रतिलीटर

चेन्नई (Chennai Diesel Price Today) :  86.45 रुपये प्रतिलीटर

नोएडा (Noida Diesel Price Today) : 81.91 रुपये प्रतिलीटर

दररोज 6 वाजता किमती बदलतात

दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमती बदलतात. नवीन दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होत असतात. पेट्रोल डिझेलच्या किमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते. परदेशी विनिमय दरासह आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूडचे दर काय आहेत, यावर पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज बदलत असतात.

पेट्रोल डिझेलचे दर अशा प्रकारे तपासा

एसएमएसद्वारे आपण पेट्रोल डिझेलची किंमत शोधू शकता. दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल डिझेलचे दर अद्ययावत केले जातात. इंडियन ऑईलच्या वेबसाइटनुसार, आपल्याला आरएसपीसह आपला शहर कोड टाइप करावा लागेल आणि 9224992249 या क्रमांकावर एसएमएस पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा कोड वेगळा आहे. आपण हे आयओसीएल वेबसाईटवरून पाहू शकता.

त्याच वेळी, आपल्या शहरातील पेट्रोल डिझेलची किंमत आपण बीपीसीएल ग्राहक RSP 9223112222 आणि एचपीसीएल ग्राहक यांना 9222201122 संदेश पाठवून जाणून घेऊ शकता. (Petrol Diesel Price Today rates in mumbai pune delhi petrol price today on 14th march 2021)

संबंधित बातम्या :

10 दिवसांच्या नियमाचा अंगीकार करा; कधीच भासणार नाही पैशांची चणचण

LIC ची प्रसिद्ध पॉलिसी, दरवर्षी 2500 रुपयांची गुंतवणूक आणि मिळवा 5 लाखांचा फायदा

One Nation One Ration Card: माझे रेशन मोबाईल अ‍ॅप लाँच; देशाच्या कोणत्याही कोपऱ्यात आता धान्य उपलब्ध

(Petrol Diesel Price Today rates in mumbai pune delhi petrol price today on 14th march 2021)

Follow Us
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
Jio IPO : जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?
नागपूर काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर, नेमकं घडलं काय?
Nagpur Congress : नागपूर काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर, नेमकं घडलं काय?
हरदीप पुरी-जेफ्री एपस्टिनचे फोटो शेअर करत संजय राऊतांचा मोठा दावा
Sanjay Raut on Hardeep Puri : हरदीप पुरी-जेफ्री एपस्टिनचे फोटो शेअर करत संजय राऊतांचा मोठा दावा; म्हणाले, ही तर....
हल्लेखोरांकडून अमिताभ, सलमान, अक्षय, आमीरच्या घराची रेकी- सूत्र
Tiger Shroff Case : हल्लेखोरांकडून अमिताभ, सलमान, अक्षय, आमीरच्या घराची रेकी- सूत्र
मनोज जरांगे यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप; संजय राऊत म्हणाले.
Sanjay Raut : मनोज जरांगे यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप; संजय राऊत म्हणाले....
येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात मर्दानी दसऱ्याला सुरुवात
Jejuri Dasara Sohala : येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात जेजुरीच्या मर्दानी दसऱ्याला सुरुवात