AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Petrol Diesel Rate Today : पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ कायम, तुमच्या शहरातील दर काय?

देशातील अनेक शहरात पेट्रोल-डिझेलची किंमत ही 100 रुपयांच्या पलीकडे गेली आहे. (Petrol Diesel rate today 08 march 2021)

Petrol Diesel Rate Today : पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ कायम, तुमच्या शहरातील दर काय?
पेट्रोल आणि डिझेल
| Updated on: Mar 08, 2021 | 7:15 AM
Share

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. देशातील अनेक शहरात पेट्रोल-डिझेलची किंमत ही 100 रुपयांच्या पलीकडे गेली आहे. तर महाराष्ट्रातही अनेक शहरात पेट्रोल-डिझेलचे दर हे 95 रुपयांच्या पुढे आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशावर ताण पडत आहे. (Petrol Diesel rate today 08 march 2021)

गेल्या काही दिवसांपासून देशात सर्वच ठिकाणी पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतींचा ट्रेंड सुरू आहे. दररोज सकाळी 6 च्या दरम्यान तेल कंपन्यांकडून पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जारी केले जातात. Goods Return या वेबसाईटने आज पेट्रोल-डिझेलचे दर जारी केले आहेत.

राज्यातील सर्वात महाग पेट्रोल कुठे?

यानुसार महाराष्ट्रातील सर्वात महाग पेट्रोल हे नांदेड शहरात पाहायला मिळत आहे. नांदेडमध्ये पेट्रोलचा दर हा 99.35 रुपये इतका आहे. त्यापाठोपाठ परभणीत 99.03 रुपये किंमतीने पेट्रोलची विक्री होत आहे. त्याशिवाय नांदेडमध्ये डिझेलची विक्री सार्वाधिक दराने होत आहे. नांदेड शहरात डिझेलचा दर 88.99 रुपये इतका आहे.

महाराष्ट्रातील काही शहरांमधील पेट्रोल-डिझेलचे दर 

क्रमांक शहरे पेट्रोल (रुपये) डिझेल (रुपये)
1 अहमदनगर ₹ 97.81 ₹ 87.48
2 अकोला ₹ 97.62 ₹ 87.33
3 अमरावती ₹ 98.49 ₹ 88.17
4 औरंगाबाद ₹ 98.54 ₹ 88.18
5 भंडारा ₹ 98.19 ₹ 87.87
6 बीड ₹ 98.88 ₹ 88.52
7 बुलडाणा ₹ 98.10 ₹ 87.79
8 चंद्रपूर ₹ 97.73 ₹ 87.45
9 धुळे ₹ 98.05 ₹ 87.72
10 गडचिरोली ₹ 98.41 ₹ 88.10
11 गोंदिया ₹ 98.61 ₹ 88.27
12 मुंबई उपनगर ₹ 97.57 ₹ 88.60
13 हिंगोली ₹ 98.19 ₹ 87.87
14 जळगाव ₹ 97.76 ₹ 87.44
15 जालना ₹ 98.57 ₹ 88.21
16 कोल्हापूर ₹ 98.48 ₹ 88.15
17 लातूर ₹ 98.31 ₹ 87.98
18 मुंबई शहर ₹ 97.57 ₹ 88.60
19 नागपूर ₹ 97.40 ₹ 87.11
20 नांदेड ₹ 99.35 ₹ 88.99
21 नंदूरबार ₹ 98.40 ₹ 88.07
22 नाशिक ₹ 97.66 ₹ 87.34
23 उस्मानाबाद ₹ 98.05 ₹ 87.73
24 पालघर ₹ 97.26 ₹ 86.92
25 परभणी ₹ 99.03 ₹ 88.66
26 पुणे ₹ 97.47 ₹ 87.15
27 रायगड ₹ 97.35 ₹ 87.01
28 रत्नागिरी ₹ 98.53 ₹ 88.17
29 सांगली ₹ 97.35 ₹ 87.06
30 सातारा ₹ 97.93 ₹ 87.62
31 सिंधुदुर्ग ₹ 98.94 ₹ 88.59
32 सोलापूर ₹ 98.29 ₹ 87.94
33 ठाणे ₹ 97.26 ₹ 86.92
34 वर्धा ₹ 97.79 ₹ 87.49
35 वाशिम ₹ 98.05 ₹ 87.74
36 यवतमाळ ₹ 98.50 ₹ 88.17

(Petrol Diesel rate today 08 march 2021)

देशातील प्रमुख शहरांमधील डिझेलचे भाव

नवी दिल्ली (Delhi Diesel Price Today) : 91.17 रुपये प्रतिलिटर

मुंबई (Mumbai Diesel Price Today) : 97.57 रुपये प्रतिलिटर

कोलकाता (Kolkata Diesel Price Today) : 91.35 रुपये प्रतिलिटर

चेन्नई (Chennai Diesel Price Today) :  93.11 रुपये प्रतिलिटर

नोएडा (Noida Diesel Price Today) : 89.23 रुपये प्रतिलिटर

दररोज 6 वाजता किमती बदलतात

दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमती बदलतात. नवीन दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होत असतात. पेट्रोल डिझेलच्या किमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते. परदेशी विनिमय दरासह आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूडचे दर काय आहेत, यावर पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज बदलत असतात.

पेट्रोल डिझेलचे दर अशा प्रकारे तपासा

एसएमएसद्वारे आपण पेट्रोल डिझेलची किंमत शोधू शकता. दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल डिझेलचे दर अद्ययावत केले जातात. इंडियन ऑईलच्या वेबसाइटनुसार, आपल्याला आरएसपीसह आपला शहर कोड टाइप करावा लागेल आणि 9224992249 या क्रमांकावर एसएमएस पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा कोड वेगळा आहे. आपण हे आयओसीएल वेबसाईटवरून पाहू शकता.

त्याच वेळी, आपल्या शहरातील पेट्रोल डिझेलची किंमत आपण बीपीसीएल ग्राहक RSP 9223112222 आणि एचपीसीएल ग्राहक यांना 9222201122 संदेश पाठवून जाणून घेऊ शकता. (Petrol Diesel rate today 08 march 2021)

संबंधित बातम्या : 

“मरणाऱ्याची शेवटची इच्छा पूर्ण करतात, कृषी कायदे मागे घ्या”, दिल्लीत आणखी एका शेतकऱ्याची आत्महत्या

मध्यप्रदेशात यूकेचा कोरोना, दिल्लीमध्ये रिकव्हरी रेट घटला; महाराष्ट्राची स्थिती काय?, जाणून घ्या कोरोना अपडेट

Follow Us
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?
नागपूर काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर, नेमकं घडलं काय?
Nagpur Congress : नागपूर काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर, नेमकं घडलं काय?
हरदीप पुरी-जेफ्री एपस्टिनचे फोटो शेअर करत संजय राऊतांचा मोठा दावा
Sanjay Raut on Hardeep Puri : हरदीप पुरी-जेफ्री एपस्टिनचे फोटो शेअर करत संजय राऊतांचा मोठा दावा; म्हणाले, ही तर....
हल्लेखोरांकडून अमिताभ, सलमान, अक्षय, आमीरच्या घराची रेकी- सूत्र
Tiger Shroff Case : हल्लेखोरांकडून अमिताभ, सलमान, अक्षय, आमीरच्या घराची रेकी- सूत्र
मनोज जरांगे यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप; संजय राऊत म्हणाले.
Sanjay Raut : मनोज जरांगे यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप; संजय राऊत म्हणाले....
येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात मर्दानी दसऱ्याला सुरुवात
Jejuri Dasara Sohala : येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात जेजुरीच्या मर्दानी दसऱ्याला सुरुवात
एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार, जो आडवा येईल.....
Shivsena : एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार, जो आडवा येईल.....; त्या बड्या नेत्याचं मोठं विधान
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा...
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा थेट सवाल, नेमकं प्रकरण काय?