मध्यप्रदेशात यूकेचा कोरोना, दिल्लीमध्ये रिकव्हरी रेट घटला; महाराष्ट्राची स्थिती काय?, जाणून घ्या कोरोना अपडेट

देशात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. पंजाब, महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि राजधानी दिल्लीमध्ये ही परिस्थिती आणखी बिकट होतेय. (india corona daily update maharashtra)

मध्यप्रदेशात यूकेचा कोरोना, दिल्लीमध्ये रिकव्हरी रेट घटला; महाराष्ट्राची स्थिती काय?, जाणून घ्या कोरोना अपडेट
corona virus news
Follow us
| Updated on: Mar 06, 2021 | 7:28 AM

मुंबई : देशात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. पंजाब, महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि राजधानी दिल्लीमध्ये परिस्थिती आणखी बिकट होतेय. मध्य प्रदेशमध्ये तब्बल 6 जणांना यूकेमध्ये आढळलेल्या कोरोना विषाणूची लागण झाली आहे. एकट्या महाराष्ट्रातसुद्धा कोरोनाग्रस्तांचा आलेख वर जाताना दिसतोय. 5 मार्च रोजी महाराष्ट्रात तब्बल 10 हजारपेक्षा जास्त नवे रुग्ण आढळले आहेत. देशभरात कोरोना संसर्ग वाढत असल्यामुळे आता आणखी काळजी घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे. (india corona daily update information of corona maharashtra delhi punjab madhya pradesh)

महाराष्ट्रात दिवसभरात तब्बल 10 हजार नवे रुग्ण

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची वाढ झपट्याने होत आहे. येथे दिवसाला हजारोंच्या संख्येने नवे कोरोनाग्रस्त आढळत आहेत. 5 मार्च रोजी येथे 10216 नागरिकांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. तसेच 5 मार्च रोजी एका दिवसात तब्बल 53 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांचा आकडा 21,98,399 वर पोहोचला असून आतापर्यंत 52,393 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यात एकट्या मुंबईत एका दिवसात म्हणजेच 5 मार्च रोजी 1174 जण कोरोनाग्रस्त आढळले. येथे कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 93.52 टक्के आहे.

दिल्लीमध्ये 591 कन्टेन्मेंट झोन

लोकसंख्येची घनता जास्त असल्यामुळे राजधानी दिल्लीमध्येसुद्धा कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. येथे सध्या 591 कन्टेन्मेंट झोन असून 1779 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. दिल्लीमध्ये सध्या संक्रमणाचे प्रमाण 0.53 टक्के असून येथे सक्रिय कोरोना रुग्णांचे प्रमाण 0.27 टक्के आहे. कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढत असल्यामुळे येथे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण घटले आहे. सध्या हा दर 98.01टक्के आहे. 5 मार्च रोजी दिल्लीमध्ये 312 रुग्ण बरे झाले.

पंजाबमध्ये 818 नवे रुग्ण

पंजाबमध्येसुद्धा कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून येथे शुक्रवारी म्हणजेच 5 मार्च रोजी 818 नवे कोरोना रुग्ण आढळले. यापैकी एकट्या जालंधर जिल्ह्यात 134 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

मध्यप्रदेशात यूकेचा कोरोना

सध्या कोरोनाच्या अनेक प्रजाती जगभरात आढळत आहेत. मध्य प्रदेशातसुद्धा यूकेमधील कोरोनाची लागण झालेले 6 जण आढळले आहेत. इंदोर येथील एकूण 100 जणांची चाचणी करण्यात आली होती. त्यापैकी 6 जणांना यूके येथील कोरोना स्ट्रेनशी साधर्म्य असणाऱ्या कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकारामुळे सध्या येथील आरोग्य विभागाची परेशानी वाढली आहे. या प्रकारानंतर मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहाण यांनी आपत्कालीन बैठक बोलावून कोरोना संसर्गाचा आढावा घेतला.

दरम्यान सध्या देशात कोरोनाग्रस्तांचा आकडा 1,11,73,761 वर पोहोचला असून 1,57,548 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाल आहे.

इतर बातम्या :

MSP पेक्षा 15 टक्के जादा दरानं कापसाची विक्री, पाढरं सोन्याचं तीन वर्षानंतर दराचं रेकॉर्ड

Non Stop LIVE Update
हे मटण खाणारे ब्राम्हण, देवेंद्र फडणवीसांवर कुणाचा निशाणा?
हे मटण खाणारे ब्राम्हण, देवेंद्र फडणवीसांवर कुणाचा निशाणा?.
भुताटकी, आत्मा, ढोंग आणि बरंच काही..., राऊतांचा मोदींवर हल्लाबोल काय?
भुताटकी, आत्मा, ढोंग आणि बरंच काही..., राऊतांचा मोदींवर हल्लाबोल काय?.
कॉलर उडवताना सकाळ की संध्याकाळ पहावं..., शरद पवारांचा उदयनराजेंना टोला
कॉलर उडवताना सकाळ की संध्याकाळ पहावं..., शरद पवारांचा उदयनराजेंना टोला.
ते टरबूज उन्हाळ्यात तरी कामी येतं, पण हे ..., ठाकरेंची फडणवीसांवर टीका
ते टरबूज उन्हाळ्यात तरी कामी येतं, पण हे ..., ठाकरेंची फडणवीसांवर टीका.
बारामतीनंतर शिरूरमध्ये तुतारीचा संभ्रम होणार? आयोगान कुणाला दिल चिन्ह?
बारामतीनंतर शिरूरमध्ये तुतारीचा संभ्रम होणार? आयोगान कुणाला दिल चिन्ह?.
खैरेंनी मुस्लिमांना सांगितल, 5 वेळा नमाज पडा; शिरसाटांनी व्हिडीओ लावला
खैरेंनी मुस्लिमांना सांगितल, 5 वेळा नमाज पडा; शिरसाटांनी व्हिडीओ लावला.
महाराष्ट्रातील नरेंद्र मोदींच्या सभांच्या झंझावातावर विरोधकांचा निशाणा
महाराष्ट्रातील नरेंद्र मोदींच्या सभांच्या झंझावातावर विरोधकांचा निशाणा.
महायुतीत मुंबईत 2 जागांवर सस्पेन्स, 'या' उमेदवारांची चर्चा, कधी घोषणा?
महायुतीत मुंबईत 2 जागांवर सस्पेन्स, 'या' उमेदवारांची चर्चा, कधी घोषणा?.
जप्तीनंतर भेट; लवकरच शरद पवार गटाच्या अभिजीत पाटलांचा भाजपात प्रवेश?
जप्तीनंतर भेट; लवकरच शरद पवार गटाच्या अभिजीत पाटलांचा भाजपात प्रवेश?.
ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला
ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला.