MSP पेक्षा 15 टक्के जादा दरानं कापसाची विक्री, पाढरं सोन्याचं तीन वर्षानंतर दराचं रेकॉर्ड

पांढरे सोने म्हणून ओळखले जाणाऱ्या कापसानं यंदा शेतकऱ्यांना चांगले पैसे मिळवून दिले आहेत. Cotton sold higher level than MS

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 0:14 AM, 6 Mar 2021
MSP पेक्षा 15 टक्के जादा दरानं कापसाची विक्री, पाढरं सोन्याचं तीन वर्षानंतर दराचं रेकॉर्ड
कापूस

नवी दिल्ली: पांढरे सोने म्हणून ओळखले जाणाऱ्या कापसानं यंदा शेतकऱ्यांना चांगले पैसे मिळवून दिले आहेत. जागतिक बाजारपेठेतील तेजीमुळे देशात कापसाची खरेदी एमएसपीपेक्षा 15 टक्के जादा दरानं केली जात आहे. कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष अतुल गणत्रा यांनी पांढरे सोने खऱ्या अर्थानं सोन्यासारखं ठरल्याचं म्हटलय.कापसाची किमान आधारभूत किंमत एका क्विंटलसाठी 5 हजार 825 आणि मध्यम दर्जाच्या कापसासाठी 5515 रुपये निश्चित केली आहे. मात्र, शेतकऱ्यांना गुजरातमध्ये कापसाला 6 हजार 500 रुपये दर मिळत आहे. तब्बल तीन वर्षानंतर कापसाच्या दरात तेजी पाहायला मिळाली आहे. कापसाला चांगला दर मिळाल्यानं पुढील वर्षी 10 टक्के जादा क्षेत्रावर कापसाची लागवड वाढू शकते. (Cotton sold higher level than MSP after three years what is reason)

2018 नंतर कापसाचे दर वाढले

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कापसाचे दर 25 फेब्रुवारीला 95.57 सेट प्रति पौंड वाढले होते. तर 2018 मध्ये कापसाचा दर 11 जून 2018 रोजी सर्वाधिक 96.49 सेंट प्रति पौंड पर्यंत पोहोचले होते. गुरुवारी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कापसाचे भाव कमी झाले असून 88 सेंट प्रति पौंड पर्यंत पोहोचले होते.

केडिया अ‌ॅडवायजरीचे संचालक अजय केडिया यांनी कापसाचे दर वाढल्याचं सांगितलं. आता नफेखोर लोक सक्रिय झाल्यानं कापसाचे दर कमी झाले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कापसाच्या किमंती कमी झाल्यानं भारतीय बाजारपेठेतही त्याचा परिणाम दिसून आला. अतुल गणत्रा यांनी आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे दर 95 सेंटपर्यंत पोहोचले होते तेव्हा भारत आणि अमेरिकेचा कापूस यांच्यातील दरातील अंतर 14 सेंट होते ते आता कमी होऊन 7 सेंट राहिले आहे. निर्यातीत झालेली वाढ आता कमी झाली आहे.

भारत 60 लाख गाठी निर्यात करणार

अतुल गणत्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार भारतानं आतापर्यंत 34 लाख गाठींची (एक गाठ 170 किलो) निर्यात केली आहे. गणत्रा यांच्या अंदाजानुसार भारतातून 60 लाख गाठींची निर्यात होण्याची शक्यता आहे. कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाच्या अध्यक्षांच्या माहितीनुसार देशात 2020-21 मध्ये 360 लाख गाठी उत्पन्न झालं आहे. कापड मंत्रालयानं स्थापन केलेल्या समितीच्या अहवालानुसार देशात 2020-21 च्या हंगामात 371 लाख गाठी उत्पन्न होण्याचा अंदाज आहे.


संबंधित बातम्या:

आता रासायनिक खताला हिरव्या खताचा पर्याय, जाणून घ्या कसे तयार करायचे?

कोरोनाची झळ शेती-शिवारापर्यंत, बाजारपेठांमध्ये मागणीच नसल्यामुळे फुलशेती करणारे शेतकरी अडचणीत

(Cotton sold higher level than MSP after three years what is reason)