AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोरोनाची झळ शेती-शिवारापर्यंत, बाजारपेठांमध्ये मागणीच नसल्यामुळे फुलशेती करणारे शेतकरी अडचणीत

बहुतांश ठिकाणच्या बाजारपेठा बंद असल्यामुळे फुलांची मागणी घटली आहे. (nanded flower farming corona pandemic)

कोरोनाची झळ शेती-शिवारापर्यंत, बाजारपेठांमध्ये मागणीच नसल्यामुळे फुलशेती करणारे शेतकरी अडचणीत
तरुण शेतकरी मोसीन अत्तार आणि त्याची फुलशेती
| Updated on: Mar 05, 2021 | 12:19 PM
Share
नांदेड : राज्यात जवळपास प्रत्येक जिल्ह्यात कोरोना रुग्णांची झपाट्याने वाढ होत आहे. याचा फटका फक्त उद्योगधंदे, व्यवसाय यांनाच बसतोय असे नाही, तर कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे शेती व्यवसायसुद्धा होरपळून जात आहे. त्यातही फुलशेती करणाऱ्या शेतकऱ्यांची परिस्थिती तर अधिकच बिकट आहे. बहुतांश ठिकाणच्या बाजारपेठा बंद असल्यामुळे फुलांची मागणी घटली आहे. या कारणामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानाला सामोरे जावे लागतेय. (Nanded demand of flower has been decreased due to Corona pandemic market is closed)

कोरोनाचा बाजारपेठेवर परिणाम, फुलांना भाव नाही

देगलूर तालुक्यातील हणेगाव इथल्या मोसीन अत्तार या युवक शेतकऱ्याचीही अशीच परिस्थिती आहे. नेहमी घेतल्या जाणाऱ्या पिकाची लागवड न करता अभिनव उपक्रम राबवण्याच्या उद्देशाने या शेतकऱ्याने फुलशेती करण्याचा विचार केला. त्यांने आपल्या शेतात एका एकरामध्ये झेंडू, शेवंती, लिली अशा अनेक फुलांची लागवड केली. वेगवेगळे कार्यक्रम, समारंभांमध्ये फुलांना मोठ्या प्रमाणात मागणी असते, त्यामुळे त्याने हा पर्याय निवडला. मात्र, फुलांची विक्री करण्याची वेळ आली, तेव्हा कोरोनाने पुन्हा डोकं वर काढलं. राज्य सरकारने कोरोना प्रतिबंधक नियम म्हणून राज्यातील अनेक जिल्ह्यामध्ये कडक निर्बंध लागू केले. याचा परिणाम बाजारपेठांवरही झाला. परिणामी फुलांना बाजारामध्ये म्हणावा तसा भाव मिळत नाहीये.  शेतीमध्ये नवनवीन पिकं घेऊन काहीतरी वेगळं करु पाहणाऱ्या मोसीन अत्तार या तरुण शेतकऱ्याच्या हाती यामुळे निराशा आली आहे. फुलांना बाजारात मागणीच नसल्यामुळे मोसीनच्या शेतातील फुलं जागेवर सडून जातायत. थोड्याबुहत प्रमाणात फुलं विकली गेली, तरी म्हणावा तसा भाव मोसीनला मिळत नाहीये.
भाव नसल्यामुळे प्रचंड नुकसान 
याविषयी बोलताना मोसीन अत्तार यांनी आपले दु:ख बोलून दाखवले आहे. “वाढत्या कोरोनाच्या अफवेमुळे फुल बाजारात जात नाहीयेत. मी एका एकरात फुल लावलेले आहेत. शेवंती, झेंडू लिली या फुलांची मी लागवड केली आहे. मात्र बाजारात भाव नसल्यामुळे प्रचंड नुकसान होत आहे,” असे मोसीन या तरुण शेतकऱ्याने म्हटले आहे.
दरम्यान, कोरोनामुळे अचानक ओढवलेल्या या संकटामुळे फुलशेती करणारे शेतकरी संकटात सापडले आहेत. शेतात फुलं असूनही त्यांना बाजारात रास्त भाव मिळत नाहीये. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.

इतर बातम्या :
(Nanded demand of flower has been decreased due to Corona pandemic market is closed)
पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप
पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप.
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा.
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही.
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब.
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत.
शिंदे साहेब जी जबाबदारी देतील, ती...; बांगर यांनी स्पष्ट केली भूमिका
शिंदे साहेब जी जबाबदारी देतील, ती...; बांगर यांनी स्पष्ट केली भूमिका.
नाशिकमध्ये भाजपविरोधात शिंदे शिवसेना, दादांची राष्ट्रवादी एकत्र?
नाशिकमध्ये भाजपविरोधात शिंदे शिवसेना, दादांची राष्ट्रवादी एकत्र?.
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य.
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक.
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला.