AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PNB मध्ये उघडा हे खास अकाउंट, 20 लाख रुपयापर्यंत मिळेल फायदा!

देशातील दुसर्‍या क्रमांकाची सरकारी बँक असलेल्या पंजाब नॅशनल बँकेने नोकरी करणारांसाठी खास ऑफर्स आणली आहे. PNB Salary Account get personal

PNB मध्ये उघडा हे खास अकाउंट, 20 लाख रुपयापर्यंत मिळेल फायदा!
| Updated on: Mar 12, 2021 | 12:40 PM
Share

मुंबई : देशातील दुसर्‍या क्रमांकाची सरकारी बँक असलेल्या पंजाब नॅशनल बँकेने (Punjab National bank) नोकरी करणारांसाठी खास ऑफर्स आणली आहे. पीएनबी माय सेलरी अकाउंट (PNB My Salary Account) ही ती ऑफर्स असणार आहे. हे सॅलरी खाते उघडताना पर्सनल अॅक्सीडेंट इश्युरन्सबरोबर ओव्हरड्राफ्ट आणि स्वीपची सुविधादेखील त्यात असणार आहे. (PNB Salary Account get personal Acident insurance Worth 20 lakh)

पीएनबी माय सॅलरी अकाउंट उघडल्यानंतर ग्राहकांना बरेच फायदे मिळतील. खातेधारकांना 20 लाखांपर्यंत अपघात विमा देखील मिळेल, ज्यामध्ये ओव्हरड्राफ्ट सुविधा 3 लाखांपर्यंत असेल, पीएनबीने ट्विटद्वारे ही माहिती दिली आहे.

हे खातं कोण उघडू शकतं…?

पीएनबीच्या वेबसाईट्सनुसार, हे अकाउंट्स केंद्र राज्य सरकार पीएसयू, गव्हरमेंट सेमी गव्हरमेंट, कार्पोरेट तसंच शिक्षण संस्थामध्ये काम करणारे कर्मचारी हे खाते उघडू शकतात. तसंच कॉन्ट्रॅक बेसिसवर काम करणारे कर्मचारी हे खाते खोलण्यास पात्र नाहीत.

पीएनबीने आपल्या ट्टिटरवर काय म्हटलंय तुमच्या सॅलरीला चांगल्या रितीने मॅनेज करण्याचा प्रयत्न करताय तर तुम्ही PNB MY SALARY ACCOUNT नक्की उघडा. पर्सनल अॅक्सीडेंट इश्युरन्सबरोबर ओव्हरड्राफ्ट आणि स्वीपची सुविधादेखील तुम्हाला मिळेल.

PNB MY SALARY ACCOUNT  विषयी खास…

पगार खातं झिरो बॅलन्सपासूनही सुरु केले जाऊ शकते. या खात्यात किमान त्रैमासिक सरासरी शिल्लक ठेवण्याचीही गरज नाही. यामध्ये नॉमिनी म्हणजेच नामनिर्देशन सुविधा उपलब्ध आहे. अकाउंट्सला सिल्वर, गोल्ड, प्रीमियम आणि प्लॅटिनम या चार विभागांमध्ये विभागल्या आहेत.

सिल्वरमध्ये 10,000 -25,000 मासिक वेतन. गोल्डमझ्ये 25,001 ते 75,000 रुपये मासिक वेतन. प्रीमियममध्ये 75,001 ते 1,50,000 रुपये प्लॅटिनममध्ये 1,50,001 पेक्षा जास्त पगार. रिटेल इंटरनेट बँकिंग आणि एसएमएस अलर्टसाठी कोणतेही शुल्क नाही. 20 लाख रुपयांपर्यंतचा वैयक्तिक विस्तार विमा. ओव्हरड्राफ्ट आणि स्वीप सुविधा उपलब्ध आहेत. सिल्वरसाठी 40 चेकबुक, गोल्डसाठी 50, प्रीमियमसाठी 100. प्लॅटिनमसाठी अमर्यादित.

ओव्हरड्राफ्टची सुविधा

खातेदारांना सिल्वर कॅटेगरीसाठी 50 हजार, गोल्डसाठी दीड लाख रुपये, तसंच 3 प्लेटिनमसाठी 3 लाख रुपयांपर्यंतची अमाऊंट आपण ओव्हरड्राफ्ट करु शकतो. या योजनेअंतर्गत उघडलेल्या खात्यात स्वीप फॅसिलीटी देखील देण्यात आली आहे.)

(PNB my Salary Account get personal Acident insurance Worth 20 lakh)

हे ही वाचा :

Gold Rate Today | सोन्या-चांदीची चमक पडली फिकी, Sensexमध्ये 400 अंकांनी तेजी! वाचा आजचे दर…

Petrol Diesel Rate Today : ग्राहकांना दिलासा, सलग 13 व्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत बदल नाही, तुमच्या शहरातील दर काय?

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.