Post Office Investment Schemes : पोस्ट ऑफिसची सरकारी बचत योजना! 5 वर्षांनी मिळेल 5 लाखांहून अधिक व्याज, जाणून घ्या आत्ताच या योजनेबद्दल

एका बाजूला महागाई वाढतीये तर दुसरी बाजूकडे पैसे सुरक्षित ठेवून त्यावर चांगला परतावा मिळवण्याचा विचार प्रत्येक जण करत आहे अशावेळी पोस्ट ऑफिसच्या काही सरकारी बचत योजना गुंतवणूकदारांसाठी उपयोगी ठरू शकतात.

| Updated on: Nov 17, 2026 | 4:59 PM
1 / 9
एका बाजूला महागाई वाढतीये तर दुसरी बाजूकडे पैसे सुरक्षित ठेवून त्यावर चांगला परतावा मिळवण्याचा विचार प्रत्येक जण करत आहे अशावेळी पोस्ट ऑफिसच्या काही सरकारी बचत योजना गुंतवणूकदारांसाठी उपयोगी ठरू शकतात.

एका बाजूला महागाई वाढतीये तर दुसरी बाजूकडे पैसे सुरक्षित ठेवून त्यावर चांगला परतावा मिळवण्याचा विचार प्रत्येक जण करत आहे अशावेळी पोस्ट ऑफिसच्या काही सरकारी बचत योजना गुंतवणूकदारांसाठी उपयोगी ठरू शकतात.

2 / 9

विशेष म्हणजे पोस्ट ऑफिसच्या नॅशनल सेविंग सर्टिफिकेट (NCC) एकदाच पैसे गुंतवून 5 वर्षानंतर व्याजातून 5 लाख रुपयांहून अधिक रक्कम करता येऊ शकते त्यासाठी किती गुंतवणूक करावी लागेल? आणि या योजनेचे नेमके गणित काय आहे? ते जाणून घेऊया

3 / 9

पोस्ट ऑफिसची नॅशनल सेविंग सर्टिफिकेट (NSC) म्हणजेच राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र ही केंद्र सरकारच्या अल्पबचत योजनांपैकी एक आहे या योजनेत सध्या ऑक्टोबर ते डिसेंबर २०२६ या ती माहितीसाठी वार्षिक 7.7 % व्याजदर दिला जात आहे विशेष म्हणजे या योजनेत व्याजाची गणना चक्रवाढ पद्धतीने केली जाते. म्हणजेच प्रत्येक वर्षी मिळणार व्याज मूळ रकमेत जोडला जातो आणि पुढील वर्षी ते ऐकून रकमेवर व्याज मिळतं. मात्र व्याजाची रक्कम दरवर्षी हातात मिळत नाही ती 5 वर्षांची मुदत पूर्ण झाल्यानंतर मुद्दलासह दिली जाते.

4 / 9

आता 5 लाख रुपयांहून अधिक व्याज कसे मिळू शकते हे समजून घेऊया दिलेल्या गणितानुसार या योजनेत एक रकमी 11 लाख 50 हजार रुपयांची गुंतवणूक केल्यास 5 वर्षानंतर ही रक्कम वाढवून सुमारे 16 लाख 66 हजार 389 रुपये होऊ शकते. यामध्ये गोंदवलेल्या मुद्दलात अतिरिक्त मिळणारे व्याज सुमारे पाच लाख 16 हजार 389 रुपये असेल म्हणजेच 5 वर्षांच्या मुदतीत केवळ व्याजातून पाच लाख रुपयांपेक्षा जास्त कमाई होऊ शकते. हे गणित 7.7 % कायम राहील या आधारावर आहे प्रमाणपत्र खरेदी करताना लागू असलेल्या व्याजदर त्या प्रमाणपत्राच्या 5 वर्षांच्या कालावधीसाठी निश्चित असतो.

5 / 9

या योजनेत गुंतवणूक सुरू करण्यासाठी मोठी रक्कम असण्याची गरज नाही फक्त 1000 रुपयांपासून NCC मध्ये गुंतवणूक करता येते. विशेष म्हणजे गुंतवणुकीची कमाल मर्यादा नाही त्यामुळे गुंतवणूकदार आपल्या आर्थिक क्षमतेनुसार रक्कम निवडू शकतात जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन आवश्यक कागदपत्र आणि KYC पूर्ण करून प्रमाणपत्र खरेदी करता येतं

6 / 9

एनसीसी मध्ये गुंतवणूक करण्याचा आणखी एक फायदा म्हणजे करसवलत जुन्या कर प्रणालीत या योजनेतील पात्र गुंतवणुकीवर आयकर कायद्यातील कलम 80 अंतर्गत एका आर्थिक वर्षात दीड लाख रुपयांपर्यंत वजावट मिळू शकते.

7 / 9

पहिला 4 वर्षात जमा होणार व्याज पुन्हा गुंतवलेले मानले जात असल्याने नियमानुसार त्यावरही कर सवलतीचा लाभ मिळू शकतो मात्र मी येणारे व्याज करपात्र असते त्यामुळे कर सवलत आणि प्रत्यक्ष कर यांचा विचार करूनच गुंतवणुकीचा निर्णय घ्यावा.

8 / 9

या योजनेत पैसे गुंतवल्यानंतर पाच वर्षांची मुदत पूर्ण होईपर्यंत प्रमाणपत्र कायम ठेवणे महत्त्वाचे आहे मुदतपूर्व पैसे काढण्यावर मर्याद आहे आणि ठराविक अपवाद वगळता सर्वसाधारणपणे खाते आधी बंद करता येत नाही त्यामुळे तातडीने पैशांची गरज भासू शकते अशी रक्कम या योजनेत गुंतवणे टाळावे.

9 / 9

एकंदरीत एक रखने गुंतवणूक करून पाच वर्षांसाठी पैसे बाजूला ठेवू शकणार यांसाठी एनसीसी हा विचार करण्यासारखा पर्याय आहे मात्र गुंतवणूक करण्यापूर्वी व्याजदर कराच नियमाने मुदतपूर्व पैसे काढण्याच्या अटी समजून घेणे आवश्यक आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us