AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Cabinet Decisions Today : राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 4 सर्वात महत्त्वाचे निर्णय, राज्याला नेमका काय फायदा होणार?

राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक पार पडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. दरम्यान, यावेळी विद्यार्थ्यांचे हीत लक्षात घेऊन एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला.

Cabinet Decisions Today : राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 4 सर्वात महत्त्वाचे निर्णय, राज्याला नेमका काय फायदा होणार?
cabinet meeting decisions todayImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 17, 2026 | 4:45 PM
Share

Maharashtara Cabinet Meeting Today : राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक पार पडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. दरम्यान, यावेळी विद्यार्थ्यांचे हीत लक्षात घेऊन एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. सोबतच नक्षलवाद्यांनी लुटून नेलेल्या शस्त्रांबाबत माहिती घेण्यासाठी सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत एकूण चार निर्णय घेण्यात आले. हे निर्णय कोणते, या निर्णयांमुळे सामान्यांना काय फायदा होणार, ते जाणून घेऊ या…

आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेले निर्णय?

नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलांकडून यापूर्वी लुटून नेलेल्या शस्त्रांबाबत माहिती देणाऱ्यांसाठी रोख बक्षीस योजना जाहीर करण्यात आली आहे. राज्याच्या गृह विभागाअंतर्गत हा निर्णय घेण्यात आलाय.

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियमात सुधारणा

राज्यातील उच्च व तंत्र शिक्षणाचा दर्जा उंचावण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, 2016 मध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या अनुषंगाने शैक्षणिक क्षेत्रात होऊ घातलेले बदल लक्षात घेऊन सुधारणा करण्यात येणार आहे. हा निर्णय उच्च व तंत्रशिक्षण विभागाअंतर्गत घेण्यात आला आहे.

वस्त्रोद्योग धोरणात सुधारणा करण्याचा निर्णय

एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरणात सुधारणा करण्याचेही आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत ठरवण्यात आले. पालघर जिल्ह्याचा आता झोन-1 मध्ये समावेश करण्यात आला आहे. झोन-4 वर्गवारी रद्द आणि विस्तारीकरण नियमातही बदल करण्यात आलाय. राज्य सरकारने वस्त्रोद्योग विभागाअंतर्गत हा निर्णय घेतलाय.

पालघर जिल्ह्याला आता सत्र न्यायालय

पालघर जिल्ह्यासाठी पालघर येथे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालय तसेच मुख्य दंडाधिकारी न्यायालयाची स्थापना करण्याचाही निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. सरकारी वकील कार्यालयांसह अनुषांगिक पदांच्या निर्मितीस यावेळी मंजुरी देण्यात आली. विधि व न्याय विभागाअंतर्गत सरकारने हा निर्णय घेतला.

दरम्यान, आजच्या बैठकीत दुष्काळावरही चर्चा झाली. राज्यातील शेतकऱ्यांना कोणत्या पद्धतीने मदत करता येईल. सोबतच दुष्काळ निवारणावर नेमक्या कोणत्या उपायोजना राबवता येतील, यावरही आजच्या बैठकीत चर्चा झाली.

Follow Us
शिवसेना पक्षाच्या सुनावणीत ध्रुव मेहतांचा मोठा युक्तिवाद; सुनील प्रभू
Shivsena : शिवसेना पक्षाच्या सुनावणीत ध्रुव मेहतांचा मोठा युक्तिवाद; सुनील प्रभूंच्या व्हीपमध्ये.....
....तर मी माझं दुकान बंद करेन, माझी शिवसेना मी बंद करेन; नरेश म्हस्के
Naresh Mhaske : ....तर मी माझं दुकान बंद करेन, माझी शिवसेना मी बंद करेन; नरेश म्हस्के असं का म्हणाले?
संजय राऊत प्रकरणात 8 डिसेंबरला पुन्हा सुनावणी; कोर्टात आज काय घडलं?
Sanjay Raut Hearing Update : संजय राऊत प्रकरणात 8 डिसेंबरला पुन्हा सुनावणी; सुप्रीम कोर्टात आज काय घडलं?
मी रोहित पवारांशी बोलणार, हा विषय...; मफलर मॅनवर सुळेंची प्रतिक्रिया
Supriya Sule : मी रोहित पवारांशी बोलणार, हा विषय...; मफलर मॅनवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
धनुष्यबाण कुणाचा? शिंदेंच्या वकिलांचा जोरदार युक्तीवाद, थेट... कोर्टात
Shivsena Hearing Update : धनुष्यबाण कुणाचा? शिंदेंच्या वकिलांचा जोरदार युक्तीवाद, थेट... कोर्टात नेमकं काय घडतंय?
प्रश्नांची उत्तरं नेत्यांनी द्यावीत, भक्तांनी नाही...; रोहित पवारांचा
Rohit Pawar : प्रश्नांची उत्तरं नेत्यांनी द्यावीत, भक्तांनी नाही...; रोहित पवारांचा कोणाला अप्रत्यक्ष टोला
माझ्या पप्पांना न्याय कधी मिळणार? प्रदीप पुर्णेकरांच्या मुलाची पोलीस..
Pradeep Purnekar : माझ्या पप्पांना न्याय कधी मिळणार? प्रदीप पुर्णेकरांच्या मुलाची पोलीस ठाण्याबाहेर बॅनरबाजी; तपासावर प्रश्नचिन्ह
महिलांच्या शोषणाविरोधातील चित्रपटाला पाठिंबा देण्याऐवजी अडथळे का?
Dipali Sayyad On Rupali Chakankar : महिलांच्या शोषणाविरोधातील चित्रपटाला पाठिंबा देण्याऐवजी अडथळे का? दिपाली सय्यदांचा रुपाली चाकणकरांना सवाल
अमित शाहांच्या टीकेला ठाकरेंचं उत्तर; थेट म्हणाले, माफी मागायला हवी...
अमित शाहांच्या टीकेला ठाकरेंचं उत्तर; थेट म्हणाले, माफी मागायला हवी होती, कारण...
बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी उद्धव ठाकरेंकडून शक्तीस्थळी अभिवादन
Uddhav Thackeray : बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी उद्धव ठाकरेंनी शक्तीस्थळी जाऊन केले अभिवादन!