Eknath Shinde On Rohit Pawar: फोटो म्हणजे पाठिंबा नाही, राजकारण करु नका, एकनाथ शिंदेंनी रोहित पवारांना सुनावलं
शेतकरी संकटात आहे, दुष्काळात आहे त्यांना मदत करा, शेतकऱ्यांना एक बिस्किटचा पुडा तरी द्या, ही राजकारण करण्याची वेळ नाही, त्यांना सर्वांनी मिळून मदत केली पाहिजे. त्यामुळे महाराष्ट्र सह देशातील जनतेला त्यांना खोटारडेपणा कळलेला आहे," असा घणाघातही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे.

DCM Eknath Shinde: “कोणासोबत फोटो असणे कोणाच्या लग्नात गेले म्हणजे त्यांना पाठिंबा देणे असे नाही. बोलणाऱ्यांसोबत किती जणांचे फोटो आहेत असे आरोप करणे चुकीचे आहे. दुष्काळ पडलाय, त्यांना मदत करा, राजकारण करु नका,” असं म्हणत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार रोहित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. यावेळी एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांनी अमित शहांवर केलेल्या टिकेचाही चांगलाच समाचार घेतला.
काय म्हणालेत एकनाथ शिंदे?
“ज्यांनी २०१९ ला महाराष्ट्रातील १४ कोटी जनतेसोबत थापा मारल्या, त्यांच्याशी खोटे बोलले त्यांच्या पाठीत खंजीर खुपसला. शिवसेना भाजप युती झाली.. २०१९ मध्ये युतीचे सरकार व्हायला पाहिजे होते. मात्र स्वतः खुर्चीसाठी, पदासाठी महाराष्ट्रातल्या जनतेशी खोटे बोलले. त्यांना अमित शाहांना थापाड्या म्हणण्याचा अधिकार नाही,” असा टोला एकनाथ शिंदे यांनी लगावला आहे.
तसेच “खरे एक नंबरचे थापाडे उद्धव ठाकरे आहेत. मोदी- शहांवर टीका केली की हेडलाईन बनते. खोटं बोला पण रेटून बोला आणि मीडियामध्ये रहा. शेतकरी संकटात आहे, दुष्काळात आहे त्यांना मदत करा, शेतकऱ्यांना एक बिस्किटचा पुडा तरी द्या, ही राजकारण करण्याची वेळ नाही, त्यांना सर्वांनी मिळून मदत केली पाहिजे. त्यामुळे महाराष्ट्र सह देशातील जनतेला त्यांना खोटारडेपणा कळलेला आहे,” असा घणाघातही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे.
रोहित पवार यांच्यावर टीका?
“कोणासोबत फोटो असणे कोणाच्या लग्नात गेले म्हणजे त्यांना पाठिंबा देणे असे नाही. बोलणाऱ्यांसोबत किती जणांचे फोटो आहेत असे आरोप करणे चुकीचे आहे. दुष्काळ पडलाय, त्यांना मदत करा, राजकारण करु नका. कुणासोबत फोटो असणे कार्यक्रमात जाणे याचा अर्थ पाठीशी घालणे होतं का? कुठल्याही पुराव्याशिवाय आरोप करु नका हे करु बरोबर नाही. त्यांना मोदीची- अमितजी यांच्याशिवाय कोणीही दिसत नाही. विरोधकांना मोदी फोबिया झाला आहे. त्यांना झोपही लागत नाही,” असं एकनाथ शिंदे म्हणालेत.
