AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

RBI Monetary Policy: पुन्हा पदरी निराशा… नाही कमी होणार तुमचा EMI, RBI चा रेपो दराविषयी काय फैसला?

RBI Repo Rate: भारतीय रिझर्व्ह बँकेने जून 2026 मध्ये पतधोरण समितीची बैठक घेतली. त्यात रेपो दरात कुठलाही बदल करण्यात आला नाही. आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी रेपो दरात तिसऱ्यांदा कोणताही बदल केला नाही. त्यामुळे देशातील कर्जदार हैराण झाले आहेत.

RBI Monetary Policy: पुन्हा पदरी निराशा... नाही कमी होणार तुमचा EMI, RBI चा रेपो दराविषयी काय फैसला?
RBI Repo RateImage Credit source: टीव्ही ९ नेटवर्क
| Updated on: Jun 05, 2026 | 11:20 AM
Share

Home Loan, Car Loan EMI: भारतीय रिझर्व्ह बँकेने जून 2026 मध्ये पतधोरण समितीची बैठक घेतली. त्यात रेपो दरात कुठलाही बदल केला नाही. आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी रेपो दरात एप्रिल महिन्यातील निर्णयाप्रमाणेच कोणताही बदल केला नाही. आता रेपो दर 5.25 टक्के इतका आहे. यापूर्वी केंद्रीय रिझर्व्ह बँकेने डिसेंबर 2025 मध्ये व्याज दारत कपात केली होती. तेव्हा 5.50 टक्क्यांहून रेपो दर 5.25 टक्के केला होता. रेपो दर कायम ठेवत भारतीय रिझर्व्ह बँकेने इतर प्रमुख व्याज दरात कोणताही बदल केला नाही. आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी स्टँडिंग डिपॉझिट फॅसिलिटी (SDF) दर 5% कायम ठेवला. तर मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी (MSF) रेट आणि बँक रेट 5.5% मध्ये सुद्धा कोणताच बदल केला नाही. केंद्रीय बँकेने चलनविषयक धोरण आणि इतर दराही जैसे थे ठेवले आहेत.

महागाईचा कहर नाही

RBI गव्हर्नर संजय मल्होत्रा म्हणाले की, जागतिक घडामोडी घडत असतानाही CPI महागाई दर उद्दिष्टापेक्षा कमी आहे. कारण घरगुती महागाई कमी आहे. किंमतींवर मोठा परिणाम झालेला नाही. तर यंदाच्या तिसऱ्या तिमाहीत Q3) महागाई दर हा लक्षित दरापेक्षा पुढे सरकत असल्याची चिंता आहे. पण अद्याप महागाई नियंत्रित असल्याचे म्हटले जात आहे. मल्होत्रा यांच्या मते आर्थिक स्थिती अजूनही मजबूत आहे. अर्थात मध्य-पूर्वेतील संकटामुळे संघर्ष आणि आव्हान आहे. ऊर्जा आणि इंधनाचे दर वाढल्याने तसेच पुरवठा साखळी विस्कळीत झाल्याने त्याचा परिणाम भविष्यात दिसून येईल असे गव्हर्नर संजय मल्होत्रा म्हणाले.

रेपो दर स्थिर ठेवल्याचा फायदा काय?

रेपो दर 5.25% वर कायम आहे. त्यामुळे ईएमआय कमी झाला नसला तरी तो वाढणार नाही. म्हणजे गृहकर्ज, वाहन कर्ज आणि वैयक्तिक कर्जाचा मासिक हप्ता तोच राहिल. त्यात वाढ होणार नाही. पण तो कमीही होणार नाही.

नवीन कर्ज घेणाऱ्यांना सुद्धा चटके सहन करावे लागणार नाही. व्याजदर वाढलेला नसल्याने नवीन घर, नवीन कार घेणे फायदेशीर असेल.

तर मुदत ठेवी आणि इतर आवर्ती मुदत ठेवीवर सुद्धा कमाई करता येईल. व्याजदर कमी झाले असते तर मुदत ठेवीवरील व्याज दर कमी झाला असता आणि बचतीवरील फायदा कमी झाला असता. गुंतवणूकदारांना आता सुरक्षित ठेवीवर चांगला व्याजदर मिळेल.

तर या निर्णयामुळे व्याजदर वाढण्याची आणि महागाई भडकण्याची भीती कमी झाली आहे. यामुळे रिअल इस्टेट आणि ऑटो सेक्टरला मोठा दिलासा मिळाला आहे. लोक घर खरेदी आणि वाहन खरेदीसाठी पुढे येतील.

Follow Us
विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
Vishakha Raut | विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला इशारा
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला कडक इशारा
20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर!
Nanded | 20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर! नांदेडमध्ये हजारो एकर पीक धोक्यात
तू तुझं तुझं बघ ना! सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर
Ambadas Danve On Gunaratna Sadavarte | तू तुझं तुझं बघ ना! बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोवरून सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर, पुढे म्हणाले...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी... त्या बड्या नेत्याने...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी अनेक जण आमच्याशी संपर्कात, त्या बड्या नेत्याने सगळंच सांगितलं
अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल...
Manoj Jarange | अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल, पुढे म्हणाले...
सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! सोयाबीन माना टाकू लागलं
Amravati | सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! अमरावतीत सोयाबीन माना टाकू लागलं; शेतकरी संकटात
पोलिसांनी अडवलं तर बाजूला सारून पुढे जा; हल्ला केला तर...
Manoj Jarange | पोलिसांनी अडवलं तर बाजूला सारून पुढे जा; हल्ला केला तर... जरांगेंनी सांगितली आंदोलनाची रणनीती!
विखे पाटलांच्या अध्यक्षतेखाली मोठी बैठक; कुणबी प्रमाणपत्रासाठी...
Kunbi Certificate Update | विखे पाटलांच्या अध्यक्षतेखाली मोठी बैठक; कुणबी प्रमाणपत्रासाठी महत्त्वाचे निर्णय, जरांगेंच्या डेडलाइनपूर्वी सरकारची तयारी
मागण्या तात्काळ मान्य करा, नाहीतर...अंबादास दानवेंचा सरकारला थेट इशारा
Ambadas Danve | मागण्या तात्काळ मान्य करा, नाहीतर... जरांगे पाटलांच्या खालावलेल्या प्रकृतीवर अंबादास दानवेंचा सरकारला थेट इशारा