AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अलर्ट! 1 डिसेंबरपासून बदलणार हे नियम, सर्वसामान्यांच्या खिशाला बसेल कात्री

1 डिसेंबरपासून एलपीजी सिलिंडरच्या किंमतींमध्येही बदल होणार आहे. जाणून घेऊयात नेमके काय बदल होणार आहेत.

अलर्ट! 1 डिसेंबरपासून बदलणार हे नियम, सर्वसामान्यांच्या खिशाला बसेल कात्री
| Edited By: | Updated on: Nov 24, 2020 | 12:14 AM
Share

नवी दिल्ली : सर्वसामान्यांच्या जीवनाशी संबंधित अनेक नियम 1 डिसेंबर 2020 पासून बदलले जाणार आहेत. एलपीजी सिलिंडरसह, रेल्वे आणि बँकांसंबंधीच्या अनेक नियमांमध्ये पुढच्या महिन्यापासून बदल होणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रिअल टाईम ग्रॉस सेटलमेंट (RTGS) ची वेळ डिसेंबरपासून बदलण्यात येणार आहे. 1 डिसेंबरपासून एलपीजी सिलिंडरच्या किंमतींमध्येही बदल होणार आहे. जाणून घेऊयात नेमके काय बदल होणार आहेत. (rtgs bank fund transfer lpg cylinder price insurance premium rules and railway rules will change from 1st december)

1) 24 तास मिळणार RTGS सुविधा बँकांच्या पैशांच्या व्यवहारासंदर्भातील नियम डिसेंबरपासून बदलणार आहेत. आरबीआयने आरटीजीएस सुविधा 24 तास सुरू ठेवण्याची घोषणा केली होती. सध्या ही सुविधा महिन्याच्या दुसर्‍या आणि चौथ्या शनिवार वगळता आठवड्यातील सर्व कामकाजाच्या दिवशी उपलब्ध आहे. पण ही डिसेंबरपासून आरटीजीएसमार्फत 24 तासांत कधीही पैसे ट्रान्सफर करू शकता.

2) एलपीजी सिलेंडरच्या किंमती बदलणार सरकार दर महिन्याच्या पहिल्या तारखेला एलपीजी सिलिंडरच्या किंमती बदलते. म्हणजेच 1 डिसेंबरपासून देशभरात गॅसच्या किंमती बदलल्या जातील. गेल्या महिन्यात व्यावसायिक सिलिंडर्सच्या किंमतीत वाढ करण्यात आली होती.

3) प्रीमियममध्ये करू शकाल हे बदल 5 वर्षानंतर विमाधारक प्रीमियमची रक्कम 50% कमी करू शकतात. म्हणजेच, अर्धा हप्ता देऊनही तुम्ही पॉलिसी चालू ठेवू शकाल.

4) 1 डिसेंबरपासून धावतील नव्या रेल्वे भारतीय रेल्वे 1 डिसेंबरपासून अनेक नवीन गाड्या चालवणार आहे. कोरोना संकटानंतर रेल्वेनं गाड्यांच्या वेळापत्रकात बदल केले आहेत. 1 डिसेंबरपासून गाड्यांच्या फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत. याचा परिणाम किमतींवरही पाहायला मिळेल.

इतर बातम्या –

तुमच्या खात्याला आजच बदला जनधन खात्यामध्ये, होईल लाखोंचा फायदा

आयकर विभागाकडून ई-मेल आला असेल तर दुर्लक्ष करू नका, होईल मोठं नुकसान

(rtgs bank fund transfer lpg cylinder price insurance premium rules and railway rules will change from 1st december)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.