AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SBI बँकेसोबत 4736 कोटींचा घोटाळा, कंपनी आणि संचालकांच्या घरांवर छापा

स्टेट बँकेने त्यांच्या तक्रारीत दिल्याप्रमाणे ही कंपनी रिअल इस्टेट व्यवसायात आहे. गंभीर म्हणजे 2013-2018 असे पाच वर्ष कंपनीने आपलं खातं पुस्तक आणि आर्थिक स्टेटमेन्ट चुकीचे दाखवलं.

SBI बँकेसोबत 4736 कोटींचा घोटाळा, कंपनी आणि संचालकांच्या घरांवर छापा
| Edited By: | Updated on: Jan 09, 2021 | 9:25 PM
Share

नवी दिल्ली : CBI ने हैदराबादस्थित कोस्टल प्रोजेक्ट लिमिटेड (Coastal Projects Limited) आणि त्याच्या संचालकांविरूद्ध 4736 कोटी रुपयांच्या बँक घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. यासंबंधी एसबीआयच्या अधिकाऱ्यांना काही पुरावेदेखील मिळाले असल्याचं सांगण्यात येत आहे. दिलेल्या माहितीनुसार, बँकांच्या संघटनेने कंपनीला कर्ज दिलं होतं. स्टेट बँकेने त्यांच्या तक्रारीत दिल्याप्रमाणे ही कंपनी रिअल इस्टेट व्यवसायात आहे. गंभीर म्हणजे 2013-2018 असे पाच वर्ष कंपनीने आपलं खातं पुस्तक आणि आर्थिक स्टेटमेन्ट चुकीचे दाखवलं. (sbi bank news cbi raided coastal projects premises and directors home for 4736 crore fraud)

हैदराबाद आणि विजयवाडामध्ये आरोपींच्या घरी आणि कंपनीच्या पत्त्यावर सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकली. यामध्ये महत्त्वाचे पुरावे हाती लागल्याची माहिती देण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीने बँकांच्या कन्सोर्टियमला प्रवर्तकांच्या हिस्सेबाबत ​चुकीची माहिती दिली आहे. या कंपनीने संबंधित पक्षाकडून येणारा निधी गुंतवणूक म्हणून दाखवला आणि बँकेच्या निधीमध्ये घोटाळा केला.

या घोटाळ्यात कोण आहे आरोपी?

कंपनीने कर्ज खात्यास रेट्रोस्पेक्टिव्ह रूलचा वापर करून 28 ऑक्टोबर 2013 ला नॉन परफॉर्मिंग असेट्स (NPA) घोषित केले होते. या कंपनीमध्ये घोटाळा झाला असल्याची माहिती 20 फेब्रुवारी 2020 ला देण्यात आली होती. सीबीआयने त्यांच्या एफआयआरमध्ये दिलेल्या माहितीनुसार, कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सब्बीनेनी सुरेंद्र, व्यवस्थापकीय संचालक गणपती हरिहार राव, संचालक श्रीधर चंद्रशेखरन, शरद कुमार, के रमौली, के अंजामा यांच्यावर घोटाळ्याचा आरोप करण्यात आला आहे. या व्यतिरिक्त रवी कैलास बिल्डर प्रायव्हेट लिमिटेड आणि त्याचे संचालक रमेश आणि गोविंद कुमार यांच्याविरोधातही एफआयआर दाखल करण्यात आली आहे. (sbi bank news cbi raided coastal projects premises and directors home for 4736 crore fraud)

इतर बातम्या – 

Gold Silver price : अमेरिकेतील हिंसाचारामुळे 6000 रुपयांनी स्वस्त झालं सोनं-चांदी, गुंतवणूकदारांसाठी Good News

ऑनलाईन व्यवहारात खातेदाराची चूक नसेल तर काय? NCDRC चा मोठा निर्णय

घरबसल्या बनवा पॉकिटमध्ये ठेवता येणारं नवीन Aadhaar PVC Card, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

(sbi bank news cbi raided coastal projects premises and directors home for 4736 crore fraud)

Follow Us
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...