ऑनलाईन व्यवहारात खातेदाराची चूक नसेल तर काय? NCDRC चा मोठा निर्णय

एनसीडीआरसी नुकतेच स्पष्ट केले आहे की, हॅकर्सने तुमच्या खात्यामधील पैसे लंपास केल्यास त्यास बँक जबाबदार राहील.

ऑनलाईन व्यवहारात खातेदाराची चूक नसेल तर काय? NCDRC चा मोठा निर्णय

नवी दिल्ली : राष्ट्रीय ग्राहक विवाद निवारण आयोगाने (एनसीडीआरसी) नुकतेच स्पष्ट केले आहे की, हॅकर्सने तुमच्या खात्यामधील पैसे लंपास केल्यास किंवा तुमच्या खात्यासंबंधित काही ऑनलाईन गैरव्यवहार केला तर त्यास पूर्णपणे बँक जबाबदार राहील. परंतु त्यासाठी एक गोष्ट सिद्ध व्हावी लागेल की, ग्राहकाची फसवणूक झाली आहे, किंवा याप्रकरणाशी ग्राहकाचा काहीही संबंध नाही. मात्र जर ग्राहकाच्या चुकीमुळे त्याचं नुकसान झालं तर त्यास बँकेला जबाबदार धरता येणार नाही. एनसीडीआरसीचे (National Consumer Disputes Redressal Commission) पीठासीन सभासद सी. विश्वनाथ यांनी याबाबतचा निर्णय दिला आहे. यावेळी ते म्हणाले की, आजच्या डिजिटल युगात क्रेडिट कार्ड हॅक होण्याची किंवा अनधिकृत मार्गाने बनावट क्रेडिट कार्ड बनवलं जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. (Bank Liable For Fraudulent Online Transaction If Account Holder’s Fault Not Proved : NCDRC)

एनसीडीआरसीने म्हटलंय की, ग्राहकासोबत कोणताही गैरव्यवहार झाला, त्याच्या खात्यामधील पैसे चोरीला गेले, हॅकर्सनी पैसे लुबाडले अथवा कोणताही ऑनलाईन फ्रॉड झाला तर त्याला ग्राहक नव्हे त बँक जबाबदार असेल. एखाद्या ग्राहकाने क्रेडिट कार्ड हरवलं आणि त्याच्या खात्यामधून आर्थिक व्यवहार होऊन त्याचं नुकसान झालं तर त्यालादेखील बँकच जबाबदार असेल. कारण जर असं होत असेल तर याचा अर्थ त्या बँकेच्या इलेक्ट्रॉनिक बँकिंग यंत्रणेत काहीतरी दोष असेल.

एनसीडीआरसीने नुकतेच एका खासगी बँकेला अशाच प्रकारच्या फसवणुकीत ग्राहकाला भरपाई देण्यास सांगितले आहे. हँकर्सने ग्राहकांचे पैसे लुबाडले तर ते पैसे आणि ग्राहकाचा मानसिक छळ झाला त्याबद्दल खासगी बँकेला त्या ग्राहकाला नुकसानभरपाई देण्यास सांगितले आहे.

सी विश्वनाथ यांनी या प्रकरणात बँकेला जबाबदार ठरवलं आहे. एका एनआरआय महिलेचं क्रेडिड कार्ड हॅक करुन तिचे पैसे लुबाडण्यात आले होते. याबाबत तिने एनसीडीआरसीकडे तक्रार केली. याप्रकरणात एनसीडीआरसीने बँकेला जबादार ठरवले. तसेच याप्रकरणी एचडीएफसी बँकेने दाखल केलेली याचिका फेटाळून लावली आणि आदेश दिले की, बँकेने पीडित महिलेला 6 हजार 110 डॉलर्स म्हणजेच जवळपास 4.46 लाख रुपये परत करावे लागतील, सोबतच तिला 12 टक्के व्याजही द्यावं लागेल.

याप्रकरणी तक्रारदार महिलेने म्हटले आहे की, ज्यावेळी तिचं क्रेडिट कार्ड हॅक झालं, तेव्हा ते कार्ड तिच्याच जवळ होतं. तसेच ज्या ठिकाणाहून तिच्यासोबत फ्रॉड झाला ते ठिकाण तिच्या घरापासून बऱ्याच मैलांच्या अतंरावर आहे. म्हणून एनसीडीआरसीने या प्रकरणात फैसला सुनावताना म्हटले आहे की, बँकेच्या इलेक्ट्रॉनिक बँकिंग सिस्टिममध्ये काही दोष असतील, ते त्यांनी दुरुस्त करावेत.

संबंधित बातम्या

Mediclaim Policy | ‘मेडिक्लेम पॉलिसी’ खरेदी करताय? मग ‘या’ 5 गोष्टी आधीच विचारून घ्या!

EPFO | जेवढे पैसे कट होणार, तेव्हढीच मिळणार पेन्शन, PF मध्ये मोठ्या बदलाच्या हालचाली

विना इंटरनेट साध्या मोबाईल फोनवरुनही Digital Payment होणार, जाणून घ्या कसे?

(Bank Liable For Fraudulent Online Transaction If Account Holder’s Fault Not Proved : NCDRC)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI