देशभरात 45 मिनिटे बंद राहणार UPI सर्व्हीस, कोणताही व्यवहार करता येणार नाही

जर तुमचे एसआयबी बँकेत खाते असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खूपच महत्वाची आहे. कारण उद्या १९ नोव्हेंबर रोजी स्टेट बँक ऑफ इंडियाकडून काही वेळ युपीआय सेवा ठप्प होणार आहे.

देशभरात 45 मिनिटे बंद राहणार UPI सर्व्हीस, कोणताही व्यवहार करता येणार नाही
UPI PAYMENT STOP
| Updated on: Nov 18, 2026 | 6:16 PM

देशाची सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या भारतीय स्टेट बँक ऑफ इंडियाचा सर्व्हर १९ नोव्हेंबर रोजी डाऊन राहणार आहे. याची माहिती स्वत:बँकेनेच दिली आहे. बँकेच्या वतीने या पोस्टमध्ये म्हटले आहे की मेटनन्सच्या कारणामुळे १९ नोव्हेंबर रोजी एसबीआयची युपीआय सर्व्हीसेस सुमारे ४५ मिनिटांसाठी बंद रहाणार आहे.

वास्तविक १९ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी १.१५ वाजल्यापासून २ वाजेपर्यंत एसबीआय बँकेची युपीआय सर्व्हीसेस ठप्प होणार आहे. या काळात एसबीआय बँकेच्या सुविधाचे मेटनन्स होणार आहे. यासंदर्भात बँकेनेच स्वत: सोशल मीडिया अकाऊंटद्वारे माहिती दिलेली आहे.

Loading...

सोशल मीडियावर पोस्ट

बँकेच्या वतीने त्यांच्या सोशल मीडिया एक्स अकाऊंटवर एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. या पोस्टमध्ये लिहीलंय की, ‘ निर्धारित मेटेनन्स एक्टिव्हीटीच्या कारणाने १९ नोव्हेंबर २०२६ रोजी दु. १.१५ वाजता ते दुपारी २.०० वाजेपर्यंत एसबीआयच्या युपीआय सेवा तात्पुरत्या उपलब्ध राहणार नाही. मात्र, हे कार्य वेळेच्या आधीही पूर्ण होऊ शकते. ग्राहकांनी विनाव्यत्यय सेवा मिळण्यासाठी युपीआय लाईट सेवेचा उपयोग सुरु ठेवू शकते. ग्राहकांना होणाऱ्या असुविधेसाठी आम्ही दिलगिर आहोत असे बँकेने म्हटले आहे.

UPI लाईटची सुविधा सुरु राहणार

या पोस्टद्वारे बँकेने म्हटले आहे की केवळ UPI ऐप्सद्वारे पेमेंट करण्यावर बंदी असणार आहे. मात्र बँकेचे ग्राहक युपीआय लाईटचा वापर करु शकतात. युपीआय लाईटला स्मॉल पेमेंट मॉडेलच्या रुपात डिझाईन केले आहे. युजर याच्या द्वारे आपल्या कोणत्याही बँक खात्यातून पैसे काढून सपोर्ट करणाऱ्या ऐप्सच्या वॉलेटमध्ये टाकू शकतात. वॉलेटमध्ये पैसे आल्यानंतर युजर प्रत्येकी व्यवहारासाठी आपला युपीआय पीन न टाकता त्या बॅलन्समधून पैसे भरु शकतात.

आरबीआयच्या फ्रेमवर्कच्या नुसार UPI लाईट पेमेंटसाठी प्रत्येक ट्राक्झंशनची कमाल सीमा हजार रुपये, आणि वॉलेटमध्ये कोणत्याही वेळी कमाल ५ हजारापर्यंतची रक्कम ठेवू शकतात. आरबीआयने डिसेंबर २०२४ मध्ये या मर्यादेला ५०० रुपये आणि २००० रुपयांनी वाढवले होते. मात्र, बँकेची ही सेवा केवळ ४५ मिनिटांसाठी बाधित होणार आहे. यानंतर तुम्ही कोणत्याही युपीआयने पेमेंट करु शकता.

 

 

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us