AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sharad Kapoor : शरद कपूरच्या अवस्थेबद्दल कळताच भाईजान ज्यासाठी ओळखला जातो ते काम पहिलं केलं, सलमानने स्वत: फोन केला आणि म्हणाला..

Sharad Kapoor : सध्या शरद कपूर चर्चेत आहे. शरद कपूरचे फोटो समोर आल्यानंतर अनेकांना धक्का बसला. हा तोच शरद कपूर आहे का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. आता स्वत: सलमानने या विषयात लक्ष घातलं आहे.

Sharad Kapoor : शरद कपूरच्या अवस्थेबद्दल कळताच भाईजान ज्यासाठी ओळखला जातो ते काम पहिलं केलं, सलमानने स्वत: फोन केला आणि म्हणाला..
Salman khan-Sharad Kapoor
| Updated on: Nov 18, 2026 | 5:56 PM
Share

बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांमध्ये खलनायकी भूमिकांमध्ये दिसलेला अभिनेता शरद कपूर सध्या चर्चेत आहे. शरद कपूरचे फोटो समोर आल्यानंतर अनेकांना धक्का बसला. शरद कपूर हाच का? असा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण झाला. शरद कपूरवर अशी वेळ का आली? हा प्रश्न अनेकांना पडला आहे. अभिनेता शरद कपूरची शारीरिक आणि आर्थिक स्थित ठिक नाहीय. शरद कपूरचे हे रुप पाहून अनेक जण हैराण झाले आहेत. शरद कपूरची मैत्रीण हेमा चौधरीने सुद्धा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. भावाने सुद्धा शरद कपूरची साथ सोडली. आता शरद कपूरनेच सांगितलय की, त्याची हालत बघून फिल्म इंडस्ट्री मधून मदत मिळतेय. बॉलिवूडचा भाईजान सलमान खानने स्वत: शरद कपूरला फोन केला. त्याला सांगितलं की, तुला कुठल्याही गोष्टीची गरज लागली तर मला सांग. स्वत: शरद कपूरने हा खुलासा केलाय.

सलमान माझ्याशी फोनवर बोलला असं शरद कपूर IANS शी बोलताना म्हणाला. काही गरज लागली तर मला फोन करं असं सलमानने आपल्याला सांगितल्याचं शरद कपूर म्हणाला. सलमानच्या या फोन नंतर मी त्याला बोललो की, काहीही लागलं तर भाई मी तुला नक्कीच सांगीन. शरद कपूरने सोनू सूदच सुद्धा कौतुक केलं. माझ्या या कठीण काळात सोनू सूदही माझ्यासोबत उभा आहे. सोनू सूद माझ्यासाठी खऱ्या भावासारखा आहे. एक फोन केल्यानंतर जी कुठली गोष्ट हवी असते ती तो लगेच आणून देतो असं शरद कपूर म्हणाला.

बऱ्याच लोकांकडून मला सपोर्ट मिळालाय

आता मी एकदम चांगला आहे असं शरद कपूरने IANS शी बोलताना सांगितलं. “माझ्या पाळीव श्वानाच्या मृत्यूनंतर मी खूप उदास होतो. तीन-चार वर्ष मी न्यू यॉर्क मध्ये होतो. भारतात परतल्यानंतर फिल्म इंडस्ट्री मधल्या बऱ्याच लोकांकडून मला सपोर्ट मिळालाय” जानेवारी 2027 पर्यंत पुन्हा काम सुरु करण्याची शरद कपूर यांना अपेक्षा आहे.

कुठल्या-कुठल्या चित्रपटात काम केलं?

शरद कपूर यांनी 1994 साली ‘मेरा प्यारा भारत’ चित्रपटातून अभिनयात करिअरला सुरुवात केलेली. त्यानंतर अनेक हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं. 1996 साली आलेल्या महेश भट्टच्या ‘दस्तक’ चित्रपटाने शरद कपूर यांना ओळख मिळवून दिली. सुष्मिता सेन सोबत तो प्रमुख भूमिकेत दिसला होता. त्यानंतर 2000 साली शाहरुख खान सोबतच्या ‘जोश’ चित्रपटात खलनायक प्रकाश शर्माच्या भूमिकेतून त्याला लोकप्रियता मिळाली. या चित्रपटातील भूमिकेसाठी निगेटिव रोलचा फिल्मफेयर अवॉर्डही मिळाला.

‘तमन्ना’, ‘हथियार’, ‘जानी दुश्मन: एक अनोखी कहानी’, ‘क्योंकि… मैं झूठ नहीं बोलता’, ‘एलओसी: कारगिल’ आणि फरहान अख्तरच्या ‘लक्ष्य’ चित्रपटात त्याने काम केलं. ‘लक्ष्य’ मध्ये त्याने मेजर बिनोद सेनगुप्ताची भूमिका साकारली. त्या शिवाय शरद कपूर यांनी सलमान खानच्या ‘ये है जलवा’ आणि ‘जय हो’ सारख्या चित्रपटांमध्ये काम केलं.

Follow Us
महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा; लोणार सरोवराला जागतिक भूगर्भीय..
Lonar Lake : महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा; लोणार सरोवराला जागतिक भूगर्भीय वारसा स्थळाचा दर्जा
सोनं एका दिवसात एवढ्या रुपयांनी स्वस्त, चांदीचे दरही घसरले....
Gold Silver Price Today : सोनं एका दिवसात एवढ्या रुपयांनी स्वस्त, चांदीचे दरही घसरले; जळगावच्या सराफ बाजारात मोठा दिलासा, पाहा आजचे भाव
शायना एनसी विधानभवनात दाखल; एकनाथ शिंदेंनी भेटीसाठी बोलावल्याची माहिती
Shaina NC : शायना एनसी विधानभवनात दाखल; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी भेटीसाठी बोलावल्याची माहिती, राजकीय चर्चांना उधाण
बाळासाहेबांचा फोटो अनावधानाने फाडला असेल तर...; शंभुराज देसाई नेमकं...
Shambhuraj Desai : बाळासाहेबांचा फोटो अनावधानाने फाडला असेल तर...; शंभुराज देसाई नेमकं काय म्हणाले?
शिवसेना सत्तासंघर्षात ध्रुव मेहतांचा मोठा युक्तिवाद; सुनील प्रभूंच्या
Shivsena Hearing Case : शिवसेना सत्तासंघर्षात ध्रुव मेहतांचा मोठा युक्तिवाद; सुनील प्रभूंच्या व्हिपच्या वैधतेवर उपस्थित केले प्रश्न
शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणातील सुनावणीला सुरुवात
Shivsena Hearing Case : शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणातील सुनावणीला सुरुवात
बाळासाहेबांच्या फोटोच्या मुद्द्यावरून ठाकरे गट आक्रमक; शायना एनसी.....
Shivsena UBT : बाळासाहेबांच्या फोटोच्या मुद्द्यावरून ठाकरे गट आक्रमक; शायना एनसींविरोधात मुंबई महापालिकेत जोरदार आंदोलन
हिंमत असेल तर फडणवीसांचे सरकारी GR फाडून दाखवा; वडेट्टीवारांचं शिंदे
Vijay Wadettiwar : हिंमत असेल तर फडणवीसांचे सरकारी GR फाडून दाखवा; विजय वडेट्टीवारांचं शिंदे सेनेला थेट आव्हान
बाळासाहेबांचा फोटो फाडल्याचे भानही त्यांना... सुषमा अंधारे संतापल्या
Sushma Andhare : बाळासाहेबांचा फोटो फाडल्याचे भानही त्यांना... शायना एनसी यांच्यावर सुषमा अंधारे संतापल्या
शायना एनसी यांच्या हातून बाळासाहेब ठाकरेंचा फोटोही फाटला.....
Shivsena : सोनिया गांधींच्या पुस्तकाची प्रत फाडताना शायना एनसी यांच्या हातून बाळासाहेब ठाकरेंचा फोटोही फाटला